श्री
रूप स्थित असणे दृश्यात, हा अस्तित्वाचा गुण
आहे. म्हणून स्मरण, भाव, क्रिया,
साखळी, स्तर, स्थिती,
संबंध, परिणाम - अशा गोष्टी उदयास येते राहतात. कार्य.
रूप निमित्त आहे दृश्यात वावरण्यासाठीचे. तसे पाहिले तर दृश्याचे स्थान
किंव्हा अनुभव देखील निमित्त आहे भगवंताचे कार्य ओळखण्यासाठी किंव्हा जाणून
घेण्यासाठीचे. ओळखणे किंव्हा जाणणे हा अनुभव जीव संपादन करतो. वास्तविक अस्तित्व
शक्तीला त्याचाही आधार लागत नाही.
पण आपण रूपातून आल्यामुळे, त्याच्या आधारे
शांतीकडे वाटचाल करायला लागते. थोडक्यात रूपाच्या निमित्ताने,
सर्व घटक अनुभवास येत राहणार, ज्यांना निमित्त
ओळखून पुढे जात रहावे. _हालचाली_, जे रुपामुळे जाणवत राहतात,
त्यांना सोडवण्याचा अट्टाहास करू नये किंव्हा त्यातून सिद्ध होण्याचा किंवा
काळजीत राहण्याचा किंव्हा व्याकुळ होण्याचा किंव्हा त्यातून सतत काहीतरी अर्थ
सांगण्यासाठीचा.
भगवंताचे कार्य ओळखल्यामुळे, त्या कार्याच्या
सारे परिणामांना तसेच राहू द्यावे, चक्राना तसेच वावरू
द्यावे, रूप आणि आकार तसेच राहू द्यावे.
त्याची आठवण राहण्यासाठी नामस्मरण करत राहावे.
हरि ओम.
श्री
रूपाचे किंव्हा दृश्याचे _स्वभाव_
दिसून येतात. ते स्वभाव _विषय_
सोडवण्यासाठी नसावे, पण स्वीकारून शांत होण्यासाठी असावे.
म्हणजे विषय स्वभावातून येतात आणि शांत होणे, हे देखील स्वभावातून
साकार होते. ठरवणे आले की स्वभाव कुठल्या नजरेने बघितले जाणार आहे...
असो, आपल्याला असे दिसून येईल की dnyan
किंव्हा अभ्यास देखील वरील दोन पद्धतीने व्यवहारात आणता येतो. एक प्रकाराचा
अभ्यास असा झाला आहे की प्रगती, स्मरण,
पर्यावरण, समाज, मनुष्य जीव,
जीवन, नाती, मनाचे प्रश्न,
ध्यान, अध्यात्म ह्या सर्व गोष्टींना "विषयाचा"
रंग चढवलेला दिसतो - म्हणजे की प्रश्न सोडवण्याचे साधन/ गुरू किल्ली/ हेतू/
व्यवहारात उपयोग वगैरे. इथे मूळ प्रकार आहे तो अहं वृत्तीचा आहे,
जो कुठल्याही गोष्टीला विषय करतो, कुठल्याही गोष्टीकडे
त्या नजरेने बघतो, तसा उपयोग करून घेतो, आणि तसे परिणाम
भोगतो. म्हणजे शेवटी अहं वृत्ती प्रज्वलित राहते आणि कष्ट,
दुःख, त्रास देते. "चक्र" ही संकल्पना देखील तशीच
बघितली जाते की "आपण त्यातून बाहेर कसे येऊ"...?
ह्यातून होते असे की स्वतःच्या सर्व छटा ह्यांना आपण स्वीकारत नाही (किंव्हा
अवघड जाते) आणि त्यातून सतत पळून जाण्याची भूमिका आपण घेतो. किंव्हा पुर्वी होऊन
गेलेल्या गोष्टीनं बद्दल खंत आणि येणाऱ्या गोष्टीनं बद्दल काळजी. किंव्हा रेषे
सारखे सगळीकडे बघणे, मर्यादित बघणे, वेगळे बघणे,
सिद्ध होण्याचा अट्टाहास धरणे वगैरे.
जाणीव गोष्ट अशी समजून घ्यायला हवी की ती सूक्ष्म स्थिती अस्तित्वात असते,
जिच्यामुळे सर्व घटक, स्तर, स्थिती
"स्वीकारल्या" जातात...ते आपल्यातच आहे, हे ओळखता येते आणि
आपण स्थिरावतो किंव्हा रेषे सारखे संबंध जोडण्याचा अट्टाहास धरत नाही,
किंवा गुढत्व जाणवतं, कार्याची ओळख स्पष्ट होते,
ध्यान एकाग्र होते, न खंत न काळजी कसलीच, दृश्याचा प्रभाव
शीथिल होतो, विषय म्हणून प्रश्नांकडे बघितले जात नाही,
सर्व भगवंत करतो अशी श्रद्धा वाढत राहते, सत्य दिसून येते,
स्थळ आणि काळ ह्या गोष्टी सूक्ष्म होतात आणि विलीन होतात,
वासना शांत होते, आपल्यात आतून परिवर्तन होते वगैरे....इथे चक्र,
संबंध, पूर्वीच्या गोष्टी किंव्हा पुढच्या गोष्टी "एकच
सत्य" दर्शवतात असे स्वीकारले जाते म्हणून सर्वांची विभागणी किंव्हा विघटन
किंव्हा साचा असे होत नाही.
हरि ओम.
श्री
तात्पुरतेपण, हालचाली, बदल हा विषय असू शकतो
का? आपण येतो, वावरतो,
जातो... हे तात्पुरते का मानावे? स्तर बदलतील,
पण *अस्तित्व राहणार*.
तरपूरतेपणात विषयाची, हेतूची, वृत्तीची,
कोडी ह्यांची, अट्टाहासाची, सिद्ध होण्याची
संकल्पना मांडली जाते - त्या स्वभावाला आपण धरून राहतो का?
प्रवाहात, स्तरात, शांती भावात वरील
संकल्पना गळून जातात. कार्य भाव, सूक्ष्म स्थिती,
स्थिरता, विशालता, पलीकडे स्थित असणे -
हे सर्व भाव प्रकट होतात आणि स्थिरावतात. म्हणजे जाणीव किंव्हा स्मरण सूक्ष्म
होते.
दर रोजच्या क्रियेत विचार, भावना,
शब्द, व्यक्त होणे, हेतू,
कार्य ह्या सर्वांचा सतत मनावर परिणाम होत राहतो... जसं की शक्ती स्वतःशी बोलत
आहे. त्या परिणामातून परिवर्तन घडते. म्हणून वावर दृश्यात असा हवा की सतत
क्रियांचा प्रभाव स्वतःवर काय होईल, ह्याची जाण हवी.
थोडक्यात अंतर्मुख ते बहिर्मुख प्रकरण चक्राचे आणि गूढ संबंधाचे असते,
हे ओळखावे आणि स्वीकारावे.
हरि ओम.
श्री
तात्पुरतेपण, ह्या भावनेत आपण होतो. पण त्या भावनेला आपण धरून
ठेवले आहे. तो भाव कधीही परिवर्तित करून शांत करता येईल.
त्यासाठी नामाचे चिंतन करावे, काहीही जरी झाले
तरीही. दृश्यात घडामोडी, हालचाली, बदल ह्यांचा आपल्या
आतील शांततेशी काहीही संबंध नसतो, हे जाणून घ्यावे.
त्याला बुद्धीची पूर्ण जोड देऊ नये. सर्वांगीण स्थितींची जोड किंव्हा संबंध लागतो.
जाणीव अंतर्मुख स्थितीशी स्थिर व्हावी लागते.
हरि ओम.
श्री
विषय खूप आतून येत राहतात. त्यांचा उगम वासनेतून होतो (शांतीत विघटन). ते
आणखीन इतर स्तरात रूपांतर होऊन विचार आणि भावना जागृत करत आणि दृश्य ध्यानात आणत. _रूपांतर होणे_
हे अपरिहार्य आहे, असे वाटते. म्हणून त्यातून उर्ध्व अवस्थेत येणे हा
मार्ग ओळखावा.
म्हणजे विषय ह्याचा अर्थ किंवा निर्मिती शांती मध्ये _परिवर्तन_
होण्यात स्थित असते. त्या परिवर्तन क्रियेत खूप गूढ पद्धतीने स्मरण प्रकट होते,
ज्यात संबंध असतात, बदल होतात, प्रतिक्रिया होते,
चक्र येतं वगैरे. ह्यालाच *भगवंताचे कार्य* म्हणावे.
थोडक्यात शांत भाव स्वतः सिद्ध असते आणि ते कायम आणि स्थिर असते. ते सर्व
रूपाच्या पलीकडे असते आणि एक सत्य असते.
त्याची ओळख होण्यासाठी नामाचे चिंतन करावे असे सुचविले आहे.
हरि ओम.