Wednesday, August 30, 2023

Shree

 

Shree

How much are we going to consider ourselves responsible for things not in our control? Responsibility comes with the urge of controlling variables and that comes with the creation of ego from vibrations formed in consciousness. “Vrutti” or vibrations are the crux of all things that become, happen, experienced, changes and remain dependent.

In complex systems, currently it seems, people do not meet, they do not wish to say or discuss anything or initiate any change and come to a common value to be pursued. I get hyper about how things can get refined and coordinated well enough into a seamless unified output of a value or a feeling or a performance or a product or a realization. This is a ‘compulsion’ I induce myself into perhaps, because I feel it is a must and I remain unsatisfied, incomplete, and anxious with a feeling of loss if this is not accomplished. So I remain on turmoil for things that are subleted always thinking that they would happen in ways that are not in sync with the main aim or a value. This can happen with work or with relationships or with space or time or with people with whom I connect or perceive.

The inquiry is – can this be responded in a better way? As more things continue to fragment with more silence, less of public spirit and cluelessness about what people choose to be engaged with; the feeling of loss or isolation may increase for me IF I continue with the same expectation that everyone should sort and discuss things to “avoid” clash.

The problem with this expectation is why should “clash” be avoided and to keep thinking about how it can be avoided. I need to be comfortable with the feeling of letting go of clashes and they DO NOT mean that I was wrong or I need to be responsible for fragmentation or its responses or effects on the environment. Of course this is not an excuse to resign but there is a limit to what one can hope to do.

Further I need to concentrate on those things that give me peace – maybe time, writing, painting, walking, peace, trust in God and such things – little or big are immaterial. Maybe venting out feelings in some way is important for me to happen – all do it in different ways – I should find my way.

Why should I remain hyper about existence? This is the crux. Why should space and time indicate something about me? Why should they cause disturbance? Why should change be restricted in any way?

I am what I am. Incomplete maybe. Temporary maybe. But a part of the entire web of existence. Isolation is a construct born from dependence. That requires to be decoded philosophically. Do not run, do not compartmentalize, do not try to fix it. Do not pressurize yourself.

Regardless of “whatever” maybe the perception or the nature of change, consciousness and the soul is always there. Trust and harness that experience. Thoughts of any kind may come and go – but I am above or beyond thoughts.

Hari Om.

Tuesday, August 29, 2023

Shree: Lived Experiences

 

Shree: Lived Experiences

Lived experiences come from afar – shared, subconscious, vibrations, creations, mind, feelings and forms. Experience is creation from existence. As lived experience’s gaze gets longer, slower, comprehensive, subtle then it becomes stable or steady and feels presence of God – it itself becomes Godlike. Hence lived experiences or meaning of life or situations is very deep and connected with many things at many levels for generations. The inquiry is about realizing what are we made of? Where do these experiences come from, what creates them, what binds them, what changes them and how can they generate a feeling of belonging in this world?

It is not (only) a question of intellectual pursuit, although it can give a clarity about where we stand and what needs to be done critically and what ought to be accepted. It may not (only) be a matter of feelings at a deeper level, although I personally feel it is important to acknowledge role of deep feelings that are beyond any constructs or demands of space and time. It may not be (only) about a body or senses, that make us perceive space and time - or the ‘start’ of receiving begins from the body. The start of ‘creating’ however begins from consciousness. Thus ‘creation’ seems prior to receiving anything since receiving seems to be a function of creation.

Hence what is our ‘core’ of being? This inquiry will perhaps lead us to understand how do we see the world?

Hari Om.

Monday, August 28, 2023

Shree: Lived Experience

Shree: Lived Experience

One is not compartmentalized in space and time when one feels a “lived experience”. If one gets into the origin of a lived experience, then one may encounter so much depth of memory and the subtle variables that one will have to admit that it is relative and a constructed experience that encompasses several dimensions of existence.

Perhaps the intent of architectural thought is to be able to use the depth of lived experience to design sensitive spaces. Everything may assist in building a lived experience, but it is also clear that actual self presence in a demanded situation is not always a necessary requirement for conceiving quality spaces. That is to say, I may be required to respond to an unknown situation of designing for “something” (say a railway terminal) but the access to my hitherto lived experience can give guidance as to how the space ought to be conceived to include everyone and everything. So finally the issue rests on accessing the depth of one’s lived experience of “being” (in the world).

Therefore, then what of “presence” – what do you call “presence” in space and time? Presence does not always mean therefore, “physical” position of self in a given matrix of space-time. In fact, physical is only one attribute of perception – there might be many which makes a presence “felt”. Are we aware of such depths of being? Should we be aware?

This thought is not pursued in spirit in current times. Impacts of AI, compartmentalized times and achedules, enormous demands of work, individualized routines, systems, distances, imagination, livelihoods, environment, relationships, mindscapes have huge impacts on how spaces are conceived by us and what do we therefore offer people as designers. At the cost of commercial or material benefits, there is so much of a compromise that happens on levels of society, relationships, activities, private and public spaces, resources, design impacts that the damage seems irreparable.

As “isolation” creeps in all spheres of activity, it should be realized that the seeds of this lived experience (of isolation) spread across working norms, system behavior, routines, relationships, aspirations, consumtion cycles, production cycles, buiult environments, exploitation of resources and many other things.

It is time to think holistically. Healing is required.

Hari Om.

 

 

 

 


श्री: उद्भवणे

 

श्री: उद्भवणे

गोष्टी घडण्यामागे अनेक बाजू असतात आणि सर्वांच मुळ कारण बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे असत. हे दररोज आणि प्रत्येक परिस्थिती मध्ये किवा प्रसंगात स्वतःला आठवण करून द्यायला लागते  - कदाचित माझ्या बाबतीत “लिहिणे” आणि वाचन करणे हे माध्यम असेल. जे सत्य आहे, ते स्वीकारणे आणि जे असत्य आहे त्याच्यावर काहीही टीका न करणे महत्वाच आहे. सत्य आणि असत्य हा फरक तात्विक पद्धतीने आपण करतो म्हणजे आपण सत्याकडे जाणारा प्रवास सुरु करु शकतो. तरीही आपण अस्तित्वात असतो कायम, म्हणजेच निर्मितीच स्वरूप घेऊन वावर करत असतो. त्या निर्मोती मुळे अनेक वृत्ती, विचार, भावना “आकारास” येत राहतात आणि त्या आकारांना आपण प्रतिसाद देत राहतो.

हे सगळ्या गोष्टी कश्या होत राहतात आणि त्याचं एकमेकांशी काय संबंध आहे आणि तो सांगण्यासारखा आहे का आणि तो कळेल का आणि त्यावर कुणी सहानुभूती दाखवेल का – सगळे प्रश्न मला पडतात. त्यावर काहीही उत्तर नसतं आणि त्यामुळे अनेक वर्ष कदाचित मी बेचैन असायचो आणि वाटायचं कि ह्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर बाहेर “वस्तूंच्या हालचाली” मध्ये असेल. मुळात प्रश्न खोलवर आहे – वृत्ती उद्भवण्याचा आहे आणि “मी” निर्माण होण्याचा आहे आणि त्यावरून आपण विचार कसे करत राहतो ह्यावर आहे.  तरीही प्रकरण गूढ आणि पुसटस कळत राहत आणि काहीतरी सतत बदलत राहतंय आणि निसटतय आणि आपण तात्पुरतेच राहणार आणि परिस्थितीवर अवलंबून राहणार हि भावना राहते.

त्या भावनेचा उगम खूप खोल ठिकाणी आहे आणि ती भावना जरी “जागृत” झाली तरी आपल्याला काळजी करण्याच कारण नाही. ती भावना भगवंताने दिली आहे, जि आपल्याकडून कार्य घडवत राहते आणि त्या भावनेमुळे आपण भीती आणि राग बाळगतो आणि असहाय झाल्यासारखं वाटत राहत.

शांत राहणे म्हणजे ह्या सर्व गोष्टींच आकलन होणे आणि त्यावरून आपला मुळ स्वभाव जाणून घेणे. कुठलीही कृती आणि विचार आणि गोष्ट खूप सूक्ष्मातून आणि विशाल पातळीतून येत असते – त्याला “थोडक्यात” आणि “बिंदूत” उत्तराची अपेक्षा करून चालत नाही. म्हणजेच कि आपण सर्व शांत भावनेने स्वीकारतो. आपण नाही – सूक्ष्म शक्तीच अस्तित्व खरं आहे. ती शक्ति कळणार नाही, कळायला वेळ लागेल, ती सांगता येणार नाही, ती काय आहे हे दुसर्यांना कळणार नाही – पण आपण पूर्णपणे त्या शातीवर निर्भर असतो.

सूक्ष्माच महत्व एवढच कि आपण कोण आहोत हे स्वीकारतो आणि गोष्टींच्या उद्भवण्याला आपण स्वतःला त्रासिक करून घेत नाही. आपण अपुरे राहतो पण तोच जीवनाचा स्वभाव असल्यामुळे आपण स्वतःला दोष देण्याच कारण नाही. हे एकदा मान्य केल कि आपण शांत होऊ लागतो. म्हणून स्थळ, काळ, परिस्थिती, अनुभव, वृत्ती, विचार, भावना, नाती, लोक समूह, जीव – ह्या कुठल्याच अपुर्या गोष्टींवर “आपण” किवा आपल “अस्तित्व” ठरण्याची गरज नाही. सर्व भगवंताच आहे – त्याला परत सर्व द्यावे आणि विलीन व्हावे!

श्रद्धा ठेवा.

हरि ओम.

 

 

 

Friday, August 25, 2023

Shree: Vicious loop

 

Shree: Vicious loop

Presence of consciousness is default – so much so that It cannot be even thought about or argued! It comes prior to anything prior! Something happens in this medium (as a property of becoming), takes shape, vibrates, and creates a force and then a form. Since the medium is One, any form of manifestation from vibrations to forces and forms remain interconnected as a web – so there is no difference in forms and the validity of form is a phenomenon in itself – not something absolutely independent of consciousness. All that we see comes from consciousness and is connected with consciousness.

Despite all of this I remain connected with feelings and why they get generated and why they need to be expressed and how they are not addressed in the current system based world. Fragmentation, speed, disconnection, disorientation, purposeless creates stress and anxiety – as feelings. We do not remain calm, we want to get things done as soon as possible, we are not calm, we do not let things happen on their own, we expect control, we hurt many things, we are not clear as to what we want or don’t want. We may say many things and express many things – yet since the internal intent is not clear – we blurt out unstoppable jargon, out of fear and anger and even endorse it and justify it! Overall effect is a loss of sense of publicness, a dead silence in public thinking, loss of collective values and apathy towards collective will for the good of mankind or good of environment.

This is a new experience getting created in the mind – it is only going to accelerate and worsen. Many people perhaps believe to curb this feeling by inventing (so they say) more and more forms of absolute control in the name of coordination and management!

I have to say that their assumption is way off the mark of pacifying the agonies of the mind!  

If one wishes to know that mind means an intent then one should also inquire what does one mean by aligning the intent, what seems to be an intent that calms the mind, how it connects with the situation, how intent should get formed and what it means to belong in this world.

By more and more formation of connected or coordinated systems, it actually makes mind inflexible, unable to discuss any concept which may be triggered beyond a system, and unable to offer a solution in a complex web of system based performance. Ironically, to save oneself of the trouble of connecting or “changing the world” (whatever that may mean; one resolves to be concerned “only about the immediate self”. But that too is an illusion since the individual self is always connected with the collective and to remain self absorbed is a kind of a death knell for the individual and the collective!

So we are in a vicious loop of self doom!

 

Hari Om.

Shree

 

Shree

 

Whatever happens, in whatever intensity or character or impression on a mind, need not cause any disturbance to me. This is not to ignore what happens but it is not required to “identify” and base our conclusions and expect change to happen in some way – all such things happen at a very subtle level and that create certain thoughts and feelings within us. This requires patience and reminding oneself about this phenomenon. In the thick of things, we may absolutely forget this fact, but with the grace of God, we would automatically come to a state of reviewing the responses and knowing the impermanence of things and letting them go. So there is an emotion (such as fear or anger), then we analyze it, then we accept it and finally we let it go and we settle for love. With time, we may permanently settle in love.

 

Hari Om.


Shree: Change and to belong

 

Shree: Change and to belong

 

Time is required to be given for change of thoughts – there is generation of a thought due to many presences of intangible forces and tangible forces and things. Whatever gets perceived also changes (as a nature of vibration) and after some ‘time’, it may alter, evolve, change, merge, dissolve – many things may happen as far as a thought or a subject is concerned. This is a natural process and beyond any concept or a construct or a fabrication or you or me. Why things happen need not be stressed on or worried about or controlled in any way or defended or justified.

Many things are a part of this change – from scale to time to causal effects to subtle things – they create thoughts, feelings and reactions/ responses. Or “change” is perceived as thoughts, feelings, and body. Or change happens from vibrations generated in consciousness – as the Seers say to us.

Therefore, let thoughts come and go – that is what is bound to happen. There is no need to fight or hold on or argue or “identify” with a thought. Identification with a thought also defines a “scale” of existence – is it body or is it emotions or is it feelings or is it intellect or is it vibrations or is it pure consciousness? Larger scale means lesser change means more time means more subtle issues means closer to consciousness. The fact is about natural identification with some scale of existence – one “imagines” as a scale of existence. This imagination makes me or forms or experiences and relationships with many other things – which are my extensions, but which I may not be fully aware of.

Philosophically it represents three inquiries – I am incidental but not absolute, so what should be my engagement with life? Secondly need of belonging and connecting with all is a necessity and “will” happen – so in what way do people express their sense of belongingness? Thirdly, if I am incidental, then what is the origin of everything – this is about realization. This realization may make us become calmer in spirit.

Therefore as the inference goes, everything is God’s undertaking and His action. Life is an opportunity to realize this absolute fact.

 

Hari Om.

श्री: सूक्ष्म

 

श्री: सूक्ष्म

सूक्ष्म होणे हा एक अभ्यास आहे. म्हणजे तो ज्वलंत प्रश्न ठेवायला लागतो आणि तेच सर्वात महत्वाच कोड आहे हे पटवून घ्यायला लागत – तरच त्या प्रवासाला आपण पदार्पण करतो. म्हणजेच सर्व कोडांच मूळ तिथेच सापडत. सर्व प्रश्न तिथे येऊन थांबतात.

आता हा ज्वलंत प्रश्न होण्यासाठी देखील श्रद्धा वाढवावी लागते आणि खूप काळ भगवंत म्हणजे काय आणि त्याच नामस्मरण का कराव हे समझुन घ्यायला लागत. कुठलीही गोष्ट असली किवा आली किवा गेली – त्यावरून आपली शांतता अवलंबून असता कामा नये. आपण जग नाही, विचार नाही, वृत्ती नाही – म्हणजे आपण ह्यातून सध्या बनलेलो जरी असलो तरी मुळचा स्वभाव आपला तो नाही.

अनेक जन्म वृत्ती, भावना, विचार आणि कार्य मध्ये गुन्तून असल्यामुळे आपल मन आणि अनुभव दृष्यमय झाले आहेत. आपल्याला गोष्टी “दिसतात” आणि आपण त्यावर काहीतरी प्रतिक्रिया देतो म्हणजे काय करतो नेमक आणि का? हा गूढ प्रश्न आहे, वरवरचा नाही आणि तो गूढ जाणवला कि त्यावर काम करणे आल. “दिसणे” कसं घडत आणि प्रत्येक आकार दिसणे म्हणजे काय? आकार काय आहे, काश्यानी दिसतं राहतो, आणि काय विचार मनात उमटवतो? म्हणजे ह्यामध्ये स्व आहे, दिसणे हि क्रिया आहे, दुसरा आकार आहे आणि हे सर्व घडत असतांना काहीतरी प्रतिक्रिया आहे. स्वतंत्र अस काहीच नाही आणि एकमेकात गुंतलेल प्रकरण आहे. ह्या सर्व गोष्टीना आपण स्थळ आणि काळ संबोधित करतो. आणि ह्या दोन्ही शब्दाना एकत्र करण्यासाठी शब्द आहे – “अस्तित्व” किवा “शक्ति”.

म्हणजेच अस्तित्व किवा शक्ति कार्य करते – आपल मन नाही किवा बुद्धी नाही किवा डोळे नाही किवा आकार नाही किवा बदल नाही. बाकी सर्व घडामोडी त्या शक्तीचे प्रतिक आहेत. म्हणून “मी” अस काही वस्तू नाही – ती तात्पुरती आहे. आकार सत्य नाहीत, दिसणे खर नाही, प्रतिक्रिया त्यावरून खरी नाही. म्हणजेच त्यावरून ठरवलेल्या भावना योग्य नाहीत.

मग भावना कशी हवी? भावनाचा खरा अर्थ आहे अस्तित्व-भावना किवा त्या शक्तीची सत्य जाणीव. भावना निर्दोष पाहिजे आणि स्थळ + काळाच्या चौकटीच्या पलीकडे हवी. त्या भावनेला कसलाच धक्का बसता कामा नये, म्हणजे ती स्थिर पाहिजे.

आता प्रश्न आपल्यासाठी असा आहे कि काय केल्यामुळे आपण त्या भावनेत रुपांतर होऊ?

हरि ओम.

Shree: Form and function

 

Shree: Form and function

Does form follow function and how does one even define a function? Are the two things different or are they one and the same or are they related or they aspects of the same coin?!

In its largest meaning, “function” means existence and anything that it beholds or creates. Hence we are then referring to the existence of consciousness that creates vibrations and then finally “forms” that are dependent and appear separated (as a state of mind). Hence all forms communicate the existence of consciousness and the phenomenon of creation – in whatever state of mind we can imagine.

Thus there is an intent behind any form and philosophically the intent should either liberate the mind (expand it) or may contract it or attach itself to the form. As egos, we are to reframe from binding ourselves with any “form” and by this statement I mean that a form is not static or not even dead or even permanent or not changing. It is alive by meanings we create for the form and if it exists in our consciousness, then it has come into existence”out there”.  Form can be said as coming from “vibrations” of Energy or a Force of Existence and hence it is an imagination. It is a construct, temporary and changing. This is its philosophical stance. And that is the Truth.

ह्याचा अर्थ कि “दिसणे” किवा “दृश्य” हे सूक्ष्म प्रकृतीतून उद्भवत असत. त्या दिसण्याला बरेच कंगोरे आहेत आणि बरेच हेतू आहेत आणि ते एकप्रकारच विलक्षण जाळ आहे – जे आपल्या ध्यानी येत किवा नाही येत. अध्यात्मिक दृष्ट्या “प्रेम” हि एकमेव सत्य भावना मान्य आहे कि त्याला कुठलीही परिस्थिती लागत नाही आणि ती बदलत नाही आणि ती सत्याकडे नेते. ह्याचाच अर्थ असा कि खूप प्रेम केल तर आपण सूक्ष्म होत जातो आणि बदलत नाही आणि दृश्यातीत अस्तित्व जाणून येत. त्या भावनेला कुठलाही आकार लागत नाही, स्थळ लागत नाही आणि काळ लागत नाही – त्या सर्वांच्या पलीकडे ती भावना असते – म्हणजेच त्यातून सार विश्व निर्माण होत राहत. थोडक्यात सत्य प्रेम म्हणजे स्थिरावणे; वृत्ती उमटू न देणे (किवा उमटण्याची गरज न भासणे) आणि भगवंताची शक्ति होणे. भगवंत म्हणजे एक अस्तित्वाची स्थिती आहे – जिला आपण “सत्य” संबोधित करतो.

दैनंदिन त्याचा परिणाम कसा असला पाहिजे? गोष्टींबद्दल किवा परिस्थिती बद्दल तक्रार करून नये; “का” ह्या प्रश्नांनी त्रासिक किवा कष्टी होऊ नये; अर्थ जरी कळला नाही तरीही शांतीत राहणे आणि श्रद्धा ठेवणे; स्वतःला सिद्ध करण्याची खुमखुमी गळून पडणे; भगवंताला जे आवडत, वेळा बद्दल आणि स्थळाबद्दल आणि वागणुकी बद्दल – तसच करणे. दुसर्यांना नाही दुखावणे; स्पष्टीकरण देण्याची इच्छा नाही येणे; शांत राहणे; सैय्यम बाळगणे वगैरे. हेतू अभिमानातून नसणे. स्वार्थ सोडणे. जे काही होईल त्यावर श्रद्धा ठेवणे – जे घडेल त्यालाही श्रद्धायुक्त स्वीकारणे.

सध्या घडामोडी इतक्या झपाट्याने बदल आहेत कि भावना आणि विचार आणि हेतू ह्याची सांगड करायला त्रास होतोय. भावना म्हणल्या तर मी म्हणतोय अस्तित्वाची खुण – जि भावनीक आणि विचारात उमटते आणि कृती मध्येही येते. हे तिन्ही पेहेलू एकमेकात सहज गुंफलेले हवेत आणि एकच भाषा बोलायला हवेत. मन विशाल होत जाणे किवा सूक्ष्म होणे हि गोष्ट भावना, विचार आणि कृती मध्ये येणार आहे, म्हणून सर्व ठिकाणी लक्ष केद्रित करायला लागत.

जगाचा विचार करून नका – तुम्ही भगवंताचा करा म्हणजे आपल्याला जगात कसं वावरायचं आहे ते कळायला लागेल.

हरि ओम.

Thursday, August 24, 2023

श्री: मी कोण?

 

श्री: मी कोण?

सत्य जाणणे हे दर्पण ठरू शकत. मला माहीत नाही कि सत्य काय आहे, पण अस्तित्व मला त्रास देत – प्रश्न बरेच पडतात कि आपण कोण आहोत, आपल्याला राग का येतो, आपण का दुखावतो, आपण कश्यासाठी इथे आलो आहोत, जग म्हणजे तरी काय, आपण कशाला घाबरतो आणि काय मिळण्याचा प्रयत्न करत राहतो वगैरे...आपण बेचैन का असतो सतत, कसली भीती मनात आहे. आपण स्वतःला “सिद्ध” करण्याचा अट्टाहास का बाळगतो? सिद्ध करणे म्हणजे तरी काय आणि का आणि कुणासाठी? कुठल्या प्रकारे स्वतःला सिद्ध करणे – हा प्रश्न सुद्धा भेडसावून सोडेल अधिकाधिक.  

सध्याच वातावरण किवा बदलांचा वेग खूप आहे आणि एक गोष्ट दुसर्याला कशी कारणीभूत असते हे कळत नाही. व्यवहाराच्या दृष्टीने अनेक गोष्टी आपल्याला कळायला हव्या असतात – अशी अपेक्षा आपण धरतो – वस्तूचा स्वाभाव काय, काय अपेक्षित आहे, आपल कार्य काय, ते कसं त्या वस्तूवर आधारित आहे, आणि अशे असंख्य परावलंबित गोष्टी ज्यावरून आपण आपल अस्तित्व निर्माण करत राहतो. “निर्माण करतो” – हे होणारच आहे – त्याला मी किवा तुम्ही किवा ती वस्तू थांबवू शकणार नाही. म्हणजे निर्माण होणे हि गोष्ट समझणे महत्वाच आहे आपल्या शांततेसाठी.

दुसरी गोष्ट अशी कि आपण काहीही विचार केला – सात्विक किवा तामसिक – तो एकाप्रकारच्या इच्छांना बळकट करत राहणार आहे आणि त्याच प्रकारच्या वस्तूंना किवा परिस्थितींना निर्माण करत राहणार आहे. म्हणजे निर्माण शक्तीच्या मुळाशी “वृत्ती” चा उगम आणि मावळणे कारणीभूत असावेत. आपल्याला कल्पना नसते कि आपण जेव्हा अनुभव निर्माण करतो किवा वस्तू बघतो, किवा व्यक्ती अनुभवतो – त्याच्या पाठीमागे कितीतरी सूक्ष्म आणि विस्तारलेले विचार असू शकतात – जे दृश्याला कारणीभूत ठरवतात. म्हणून गोष्टी घडण्याला ठोस एका बिंदूच कारण नसत आणि ती का निर्माण होते हे हि बुद्धीला कळत नाही – आणि तीच “भीती” ह्या भावनेला जन्म घालते! थोडक्यात, बुद्धी हि मनाची स्थिती आहे, जिच्या पलीकडेही सूक्ष्म स्थिती असतात आणि जे बुद्धी आणि वस्तू निर्माण करतात. म्हणजे बुद्धीच्या आधीही (ऊर्ध्वगती) काहीतरी आहे. ती अवस्था बर्याच गोष्टींना नर्माण करते किवा बर्याच गोष्टींच्या मुळाशी असते आणि ती विशेष बदलत नाही. म्हणजे गोष्टी कश्याही झाल्या तरी त्यातून “मी” सिद्ध होण्याची गरज नाही आणि त्यातून “मी” चं अस्तित्व ठरत नाही. “मी” कारणीभूतही नाही आणि “मी” अनुभवही नाही. “मी” आकारही नाही आणि “मी” वृत्ती देखील नाही.

अस लिहून सुद्धा तशी भावना जागृत करायला लागते. काहीही झाल तरी बिघडत नाही. कुठल्याही प्रकारचा बदल झालाच किवा जाणवला आणि तो समोर आला तरी आपल्याला उद्देशून नसतोच आणि त्यातून आपण काहीतरी ठरत नसतोच! हे जाणणे फार महत्वाच आहे – खूपच. व्यवहारामध्ये किवा अस्तित्वात भगवंताच्या शक्तिमुळे असंख्य गोष्टी होत राहतात (त्यात आपणही होतो) आणि ह्या सर्वांच एक घट्ट जाळ तैय्यार होत. त्या ओघाने आपल कार्य होत राहत – विचार, भावना, कृती वगैरे. हे सर्व गोष्टी भावनिक पद्धतीने जाणून घेतल्या तर आपण शांत होऊ शकू. सध्या आपण अपुरे आहोत म्हणून मनात गोंधळ आहे आणि सतत काहीतरी करत राहण्याची इच्छा आहे. तसं राहूदे आणि त्यातून परत आपल भवितव्य किवा आपल व्यक्तिमत्व ठरत नाही किवा आपण त्या गोष्टीचा ठेका काही उचललेला नाही.

गोष्टी होणार, ते उद्भवणार आणि मावळणार. त्याच्या मध्ये आपल्याला काहीनाकाहीतरी वाटत राहणार आणि आपण काहीतरी कार्य करत राहू. हे जरी असलं तरीही ह्या जाणीवेला भगवंताची जोड दिली तर आपण शांततेकडे वळू.

“वेळ गेला” अस समजू नका. कारण वेळ आपण निर्माण नाही करत – तो होत राहतो. आत्ता अस कार्य केल कि त्याच फळ अस होईल पुढे हे काही ठोसपणे सांगता येत नाही आणि येऊ घातलेलं फळ काहीकेल्यास टाळता येत नाही (आणि टाळूही नये). म्हणजेच आपल्या मर्जीने काहीच होत नसत! मग मर्जीच जर ठेवली नाही तर आनंद नाही का येणार? म्हणजेच सर्व आपलच आहे हि भावना वाढवणे. अर्थात दिसत तेवढ सरळ नाही, कारण सध्या आपण सूक्ष्म नाही. सूक्ष्म बनत गेलो तर मार्ग सरळ होत जाईल आणि श्रद्धा वाढत जाईल. “आपलच आहे”  हि भावना सध्या अपूर्ण आहे (परिस्थितीशी संबंधित आहे) म्हणून श्रद्धा नाही त्या शब्दावर. ती खोलवर भावना व्हायला हवी कि मग आनंदाचा स्त्रोत निर्माण व्हायला लागेल.

हरि ओम.

Tuesday, August 22, 2023

Shree: Movement and belonging.

 

 

Shree: Movement and belonging.

 

Movement and experience of feelings (or its creations and its connections) happen by our senses and physical movement in space and time. This movement on foot is essential. We have speed, touch, smell, taste, air, body – all rolled as mechanisms to create perception of architecture.

Such perceptions over a period of time perhaps condense to create values of environment that are expressed as ideas and through activities undertaken by people and the architecture that gets formed by it. Hence architecture is a response to many things – handed down by generations, role of memory in our lives, concerns of environment and the need to connect and anchor – all these become very important I guess. Yet this is not a formula wherein humanity was engaged with.

Belongingness or a sense of connect is a very deep rooted notion that has also undergone change in its character but the need itself will never go away. This belongingness has been expressed in many ways across times and scales and across generations and across depth of the mind. Perhaps the understanding of humanity may be said to be how this sense of “belongingness” got expressed in our environment.

The need to belong stems from the need to connect and become calm and also the need to counter some deep fear. This issue is so subtle and deep that we have remained in this exercise of expressing these deep vibrations since the beginning and if that is the case, we may look at such fundamental triggers of expressions that imply a connect of some kind. Such deep feelings are even beyond the horizon of the intellect but which inform the behavior of intellect. Therefore intellect by itself becomes quite useless if the triggers of its making are not acknowledged.

Everyone does this. The fight we encounter and the abuses that are hurled are also from this need of connecting, although some approaches are preferred over others since it results in the welfare of life.

To go deep down requires time and more than time, it requires vibrations to be seen and observed till they become steady. Is there a single way to do this? May be no. But we need to keep trying.

 

Hari Om.

Shree: God’s will

 

Shree: God’s will

I think all is made from consciousness and vibrations. The vibrations are hardened to create forms that appear separated, dependent and forever changing. Vibrations deep inside create a hardened visible forms on the outside and hence answers to the outside world lie within us. This is still symbolic understanding and what that means in terms of “lived experience” remains a lifelong journey. Some say that we come here to inherit existence or to belong to this life and this sense of belongingness should be expansive, subtle and interconnected. If that is the basis of existence, what does that mean for our time and scale and activities and the self?

I have no answers here – probably only some approach that is constantly getting modified. People should “do” what they feel like doing. Doing happens by God’s will – we are only come channel to have His will expressed onto a form based reality. As channels we may be in dilemma, confusion, struggles, alignment – but all is His will. His will means a form it is a matter of self-discovery and it is the path that is chalked out for a human birth. One cannot ignore it or dismiss it.

Hari Om.

Monday, August 21, 2023

Shree: Silence is Killing

 

Shree: Silence is Killing

Silence is killing nowadays – or at least the collective experience seems to suggest! The engrossment in individual worlds of imaginations, systems, tasks, sequences have ruptured the connection or formation of what does an idea of collective mean! Without this anchor, I am not really sure how would individual survive spiritually?!

Engrossment in individual worlds means individual sense of time, activities, routines, spaces, tasks and so on. That has effects on abandoned public ideas of spaces and time – sharing, debating, discussing etc., abandoned common/ natural resources and exploitations of those, abandoned collective values of morality and so on. This also had terrible effects on nurturing and caring values or anything that is empathetic and values of family breakdown and so called “institutions” are required to take care of issues that we face as humanity!

There is no dissent over “public spaces, time, values etc.” (or perhaps the dissent is a cold non verbal dissent expressed in AI platforms and that platform itself has overtaken real time-space imagination. That the virtual platform can become so powerful a force can be seen by making things viral or by any written word that can spark off a wordy debate and bring something “out” into real space-time matrix.

Instead of sub conscious vibrations informing real space-time imagination, is it the AI that informs subconscious patterns of existence that get expressed in the visible domain?!

A new form of weapon has come – compliance, control, surveillance, isolation of all kinds and thereby making one feel very weak. By following the pulls of “desires”, it leads one nowhere.

This also means that the mind can make anything “real” and in this reality the notions of connections, consciousness, relationships, publicness and private, anchors, belonging, feelings matter a lot.

If AI can be seen as an extension of the mind, then how should it actually work to strengthen connections, instead of disrupting them?

Hari Om.

 

 

Shree

 

Shree

People are engrossed in their activities. System seem to overwhelm people’s lives, imagination, performances, livelihood to such an extent that “time”, “relationships” and “intercommunication” seem to take a severe beating. Is there any way out of this self-created mess?

I can choose to stay engaged with these thoughts or just transcend them. Just as systems and egos and loops and perceptions, we hold steadfastly on the concept of “life” of causal relationships and that may become hard to break or go beyond. Yet this is said as an intellectual expression – what about feelings?

Can feelings be made the anchor to connect with life? Should feelings be contained and compartmentalized and polarized and politicized – in short – should they be “contaminated” by fear or ego or systems? Non contaminated means to exist unconditionally and to soak in those feelings which connect or are common to all and hence the division between all forms eventually can vanish.

This may mean many things in terms of thoughts, feelings and actions. Does this acceptance assure security? It does spiritually but may not materially. And hence the true meaning of security – is it being spiritually aware of materialistically rich?

Hari Om.

Saturday, August 19, 2023

श्री: अपेक्षा

 

श्री: अपेक्षा

एखादी गोष्ट मी सांगितली किवा नाही किवा कुठल्या शब्दात मांडली गेली आणि कुणासाठी आणि केव्हा – हे विचार करणे पूर्ण आनंद देत नाही. कारण आपण स्वतः मुळात अपूर्ण असतो म्हणजे पूर्ण सत्य माहीत नसत आणि जे काही होत राहत ते अपूर्ण सत्यच्या आधारे होत राहत – म्हणून ते आपल्या गुंतून ठेवत. ह्या सर्व जाणीवा धिक्कारुन चालत नाहीत तरीही. हि मनस्थिती आहे जि स्वीकारावी लागते आणि स्वीकारणे हि देखील एक मोठी क्रिया आहे. म्हणून भगवंताच स्मरण, वृत्तींची उद्भवती, त्यांचा परीणाम, सूक्ष्माच अस्तित्व ह्या भावना जाणवल्या कि आपण शांत होत जातो.

गोष्टी होत राहतात – मी असेन किवा नसेन; कारण मी स्वतः खरा नाही आणि माझ्यावरून काही जग चालत नाही. कुठल्याच बाबतीत माझ्यावर गोष्टी अवलंबून नाही तर माझ्या भावना आणि विचार परिस्थितीवर का अवलंबून ठेवावेत? काहीतरी करणे अपेक्षित असत का? काय अपेक्षा आहेत स्वतः कडून? अपेक्षा ठेवणारा ‘मी’ कोण? अपेक्षा म्हणजे तरी काय आणि तिला आपण एवढे महत्व का देत राहतो?

हरि ओम.

श्री: स्थिर राहणे

 

श्री: स्थिर राहणे

विचार निर्माण करतांना आणि त्यावरून आतल्याआत निर्णय घेण्याच्या प्रक्रीये मध्ये बरच काही उलथापालथ होत असते किवा असावी. सूक्ष्म होत जाणे म्हणजे हि उलथापालथ जाणवणे आणि त्यावरून आपण स्वतःला कारणीभूत किवा धर्यावर न  धरणे! काही विचार येतांना, जेव्हा आपण शब्द ऐकतो, तेव्हा आपण हे हि विचार चक्र निर्माण करतो कि – वेळ वाया चालला आहे का?; का मी इथे वेळ देत आहे?; माझ अस म्हणण नव्हत त्याला; मी हे काम करायला पाहीजे होत; माझ्यामुळे ह्यांना त्रास झाला; मी अपुरा पडलो; उद्या काय होईल?; जे मी करत आहे त्याचा परिणाम उद्या साठी योग्य ठरेल का?; मी स्वार्थी आहे का?; मी स्वार्थी नाही आहे!; ते चुकले आहेत!; मी बरोबर आहे!; मला नीट शब्दात मांडता येत नाही माझ्या भावना; नाही मांडता आले भावना तर मी त्यांच्या लेकी अपुरा ठरीन का?; मी वेगवान नाही तर मी अपुरा ठरलो का?; माझ्याकडे पैसा बेताचा आहे तर तो पुरेल का?; मी अस वागत आहे कारण पूर्वी अश्या घटना घडून गेल्या होत्या आणि मला सुरक्षित व्हायचं आता; ह्या क्षणात आणखीन कितीतरी गोष्टीना मी मुक्त आहे, तर मी मागे नाही का पडणार?; मी आत्ताचा घेतलेला निर्णय योग्य आहे का कि जुनी परिस्थिती बरोबर होती?.....

असे असंख्य विचार सतत मनामध्ये घोळत राहतात. ह्याचा अर्थ हे सर्व विचार आपल्याला बेचैन करतात आणि त्यामध्ये राग, काळजी, मीच अस्तित्व भावना, अहंकार, अज्ञान भासत राहणे, ते पूर्ण करण्याचा अट्टाहास, सिद्ध करण्याचा अट्टाहास, खूप काही मिळवण्याचा अट्टाहास, खूप व्यस्थापन करण्याचा अट्टाहास, दुख, नाईलाज, उणीवा – ह्या गोष्टी दिसून येतात.

हे मान्य असेल तर पुढचा प्रश्न असा आहे कि हे विचार का निर्माण “होत राहतात”? आणि त्या विचारांचं आणि परिस्थितीच काय नात असत? आणि ते नात आपण प्रयत्नपूर्वक बदलू शकतो का?

ह्या सर्वाच उत्तर अध्यात्म मध्ये आहे. अध्यात्म म्हणजे मनस्थिती बदलण्याची प्रक्रिया हातात घेणे. ती अस म्हणते कि सर्व गोष्टी वृत्तीन्मधून, प्रकृतीमधून घडत राहणार आहेत आणि भगवंत हा एकमेव सत्य आहे आणि तेच आपल खर स्वरूप आहे. अस असल्यास, गोष्टींच कर्तेपण आपण स्वतःवर ओढून घेतो म्हणून वरील सर्व विचार येतात. करत आपण नाही, वृत्ती आहे. त्या का निर्माण होतात त्याच ठोस उत्तर आपण देऊ शकणार नाही, म्हणून वृत्ती फक्त बघायच्या असतात, त्यातून गोष्टींना खर मानणे किवा कार्याला चिकटणे अभिप्रेत नाही. आणि हेच शिकायचं असत. दुसरी गोष्ट कि सर्व एकच आहे, म्हणून वेगळेपणाने वागणे बरोबर नाही किवा कुठलातरी अहंकारग्रस्त हेतू बाळगून कार्य करणे योग्य नाही. करता भगवंत आहे, म्हणून सर्व गोष्टींचा उगम आणि बदलणारी शक्ति भगवंताकडेच आहे. निर्माण होण्याची शक्ति म्हणजे भगवंत.

तुम्ही निर्धास्त रहा. भगवंताची आठवण जोपासा आणि कार्य करत रहा. तो योग्य आपला सांभाळ करेलच.

हरि ओम.   

श्री: वेळ घ्या.

 

श्री: वेळ घ्या.

खरच, आपल्याला दुसर्यांच्या मनातल कळत का? कळण्याचा तरी प्रयत्न करतो का? का आजकालच्या आवेगामुळे आणि गती मुळे आणि भरमसाठ कामांच्या यादीमुळे हि सूक्ष्म गरज दुर्लक्षित केली जाते?

आपल्या मनात बर्याच सूक्ष्म घडामोडी (वृत्ती) निर्माण होत असतात आणि ते इतर बर्याच वस्तूंशी आणि गोष्टींशी आणि आकारांशी आणि प्रकृतीशी निगडीत असतात. “प्रकृती” हा छान शब्द आहे कारण त्यात “दिसणारी वस्तू” अभिप्रेत नाही – पण त्याच्या निर्मितीच्या पाठीमागचे उलाढाल अभिप्रेत आहेत. ते उलाढाल बर्याच स्थळ आणि काळाच्या स्तरावर होत असतात आणि म्हणून एकमेकांशी संबंध किवा नात दर्शवत असतात. थोडक्यात म्हणायचं तर आपण श्रुष्टी म्हणून एकचं आहोत. त्यावरून ओघाने आलच कि प्रकृतीचा उगम काही ठोस कारणामुळे होत नसतो आणि प्रकृतीच्या बळावर सर्व काही कळू शकत किवा सर्वांशी नात निर्माण होऊ शकत.

ह्या संकल्पनेचा प्रभाव आपल्या वागणुकीत जाणवायला हवा. थोड जरी विचार केला कि सध्याचा ताण कसा निर्माण होतो, त्याच कारण “वेळ आणि स्व” ह्यावर केंद्रित असाव. कुठेतरी पुढे जात रहावं, मिळवाव, अजून जोरात काहीतरी करत रहावं, सांगत रहावं, सिद्ध करत रहावं – हि वृत्ती उंचावत आहे. त्या मध्ये online रहाण्याचा आणि तंत्रज्ञान माहितीचा परिणाम मानसिकतेवरती खूप होत आहे ह्यात शंका नाही. ह्या बद्दल कुणी विचार मीमांसा करण्याचा प्रयत्न तरी केला आहे का?

आपल्याला सध्याच जीवन आणि तंत्रज्ञान माहिती “स्वस्थ” बसू देत नाही. “स्वस्थ” बसणे किवा असणे हि मनाची स्थिती आहे. त्यात माझ/ तुझ/ अधिकार/ वेळेची टंचाई/ हिशोबी असणे/ व्यावहारिक रहाणे/ उज्व-डाव/ नजर अंदाज करणे अश्या काहीही कृती नसतात. वेळेचा अभाव जाणवल्यामुळे आपण इतरांशी बोलणे चक्क टाळतो, समजून घेण्याची क्षमता मर्यादित ठेवतो, ऐकून घेत नाही, त्वरित बदल घडण्याची अपेक्षा ठेवतो, अपेक्षांचं डोंगर चढवतो आणि अपेक्षा भंग सहन करू शकत नाही, रागवतो, नंतर क्षमाही मागत नाही आणि आणखीन बराच काही वेड्यासारखं वागत राहतो. आपण कसे वागत सुटलो आहोत ह्याच देखील भान ठेवत नाही – नाहीतर आपल्याला कळून चुकेल कि कितीतरी वेळा, कितीतरी मन आपण दुखावली आहेत.

अस का होत असेल? कुठेतरी आपण असा विचार करतो कि माझ आणि इतर वृत्तींच काहीही नात असण्याची गरज नाही. हे फार घातक आहे. आपल्यापेक्षा दुसरा जीव किवा परिस्थिती हि खूप वेगळी असू शकते आणि ती समजण्यासाठी विलक्षण सैय्यमाची गरज भासू शकते. काही माणसांच्या समस्या खूप सूक्ष्म पातळीच्या असतात (मानसिक/ शारीरिक दुखणे) आणि हे कळण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आणि सहानुभूती देण्यासाठी आपल्याला स्वतः त्या पातळीपर्यंत जाऊन सूक्ष्म व्हायला लागत. ह्यासाठी वेळ नको का काढायला? का ह्यावरून मला काय मिळणार आहे, अस विचार करून माणसांना तोडून टाकायला पाहिजे?  तसं म्हणल तर आपल्याला काहीच मिळत नसत आणि प्रत्येक गोष्टी फायदा-तोटा असा विचार करत बसल तर डोक्याला त्रासचंत्रास  मिळत जाणार आहे. मुलाचं जग, सध्याच्या परिस्थितीचा मानसिकतेवर परिणाम, वार्ध्क्यांची समस्या – हे न बोलता येण्याचे विषय आहे आणि तरीही आपण सैय्यमाने समजून घेऊ शकतो.

कुठल्या पद्धतीने आपण “आधार” म्हणून होऊ शकतो? उत्तर देण्याच्या आधी इथे स्पष्ट करायला हरकत नाही कि हि काही “वेगळी” (unique) विचार शरणी नाही आहे, कि त्याच्यामुळे कुणाला बक्शिस मिळेल वगैरे. एक तर मनसोक्त सर्व काही बोला – सर्व भावना व्यक्त होऊ द्या, त्या भावनांचा असा ठोकताळा असू नये, आणि कुठलाही  भावनांवर बंधन असू नये, मन कुठेही भटकू द्या – एखादा मुद्दा सांगण्यासाठी थेट बोला किवा फेरफटका मारून त्या मुद्द्याला हाथ घाला. न्यून बाळगू नका, लगेच उत्तर देण्याच टाळा, हाथाने स्पर्श करा, डोळ्यात बघा, काहीही न सांगता एकमेकांच्या समोर बसा, एकत्र काम करण्याच्या पर्याय शोधून काढा वगैरे. म्हणजे कुठल्याही विचारांना आणि भावनांना बंधनात जकडू नका आणि त्याच तोल्मापन करून नका किवा स्वतःला त्यावरून धर्यावर धरू नका. एक जमाना होता कि वेळेच नियोजन करायला खूप महत्व होत कारण नियोजन नसेल तर गोष्टी नीट होणार नाही अस असायचं. पण आता इतक्या भरमसाठ गोष्टींना तोंड द्याला लागत आहे कि “नियोजन” ह्या शब्दाचा नवा अर्थ शोधून घ्यावा लागत आहे – तो अर्थ म्हणजे कदाचित जे महत्वाच वाटतंय तेच करणे, योग्य तितका वेळ देणे, वेळेची संकल्पना लवचिक ठेवणे, घाई न करणे, शंका न धरणे किवा श्रद्धा वाढवणे.  

वरील विचार भावनांच्या पातळीवरून मांडलेले आहेत. त्याला अध्यात्मिक वळण सुद्धा देणे शक्य आहे. खोलवर भीती आपल्याला खुपकाही करायला भाग पाडते आणि भीतीचा उगम वृत्ती मध्ये असतो. त्यावरून अभिमान येतो आणि आपण विचारांच्या चक्रात अडकतो. जसं चक्र वाढत जात तस आपण एकलकोंडे होतो आणि दुसर्यांच्या अस्तित्वाची जाणीव अजिबात रहात नाही. त्या स्थितीला बदलायचं असेल तर भगवंतावर आपली श्रद्धा वाढवल्या सिवाय पर्याय नाही.

हरि ओम.

 

Friday, August 18, 2023

श्री: सर्वांची भाषा एक करावी

 

श्री: सर्वांची भाषा एक करावी

विचार करणे सुटत नाही आणि ते करत रहावं अस वाटत. विषय तुम्ही निवडा कारण त्या विषयायच्या रुची मधूनच भगवंताची वाट असावी. मन म्हणल तर विषय आलाच आणि त्यावरून प्रश्न आले, बदल आले, परावलंबन आल, आणि वृत्ती आल्या, अनेकपणा आला, कर्तेपणाचा अभिमान आला, आणि शांत करण्याची गरज निर्माण झाली. हे कदाचित गरजेच असावं. कारण भगवंत आपल्याला दृष्याच्याच्या पलीकडे जाऊन शोधावा लागतो.

आजकाल बुद्धी भेद इतका झालेला दिसून येतो कि बुद्धी स्थिर राहणे अवघड झालेलं आहे. विचारांचा वेग आणि सत्यपणा आपण ठरवतो. वेग कमी केला किवा वाढवला तरीही भगवंत हाती लागेल कि नाही हे प्रत्येकाने ठरवावं.

असो. भगवंत सोडून काहीही केल तरी मन आणि शरीर “कष्टी” होतात – म्हणजे आपल्याला त्रास, भय, चिंता, अशांती लाभते, म्हणजे वृत्ती अजूनच फोफावतात. कुठलाही कार्य आणि विचार भगवंताला स्मरून करायला लागतो तरच तो आपल्या शांत करतो.

शांतीचे अनेक अर्थ आहेत – वृत्ती शांत होणे, कामात लक्ष केंद्रित करणे, अभिमान जाळणे, मदद करणे, श्रद्धा वाढवणे, सत्य ओळखणे, प्रेम करणे, एक होणे किवा समरस होणे, खम्बिर होणे आणि इतर काही. कुठल्याही गोष्टीला वेळ द्यायला लागतो – मनात विचार आला म्हणजे लगेच परिवर्तन होईलच अस नाही. अर्थात परिवर्तन आतल्याआत होत असतातच (सूक्ष्म पातळीवर) पण त्याचा परिणाम सर्व स्तरांवर व्हायला वेळ द्यावा लागतो – कारण सर्व काही एकच आहे आणि सर्व पातळ्यांची भाषा एकच सत्य बोलते तेव्हा आपल्याला भगवंत दिसतो. म्हणजेच प्रत्येक शब्दाची आणि अनुभवाची किवा भावनांची भाषा निरनिराळी असते प्रत्येक स्तरावर. हे सर्व भाषा एकमेकात गुंफून आपल्याला जग दाखवत राहतात. म्हणून शांत व्हायला वेळ लागतो आणि भगवंत दिसायला श्रद्धा खूप प्रखर आणि खोलवर उद्भवायला लागते. सध्या सर्व पातळ्यांची भाषा “अभिमानाला” धरून आहे म्हणून आपल्याला दृश्य जग दिसतं राहत आणि ते अत्यंत खोल ठिकाणी जाऊन परिणाम करत राहत. त्याला हलवण्यास किवा ढिले करण्यास सहाजिकच खूप काळ द्यावा लागेल.

सर्व गूढ प्रकरण आहे एकंदरीत. आपण हे का करतो, कुणासाठी, कशासाठी, आपण कोण आहोत, हे जग म्हणजे काय, कोण भगवंत, त्याचा आणि माझा काय संबंध आहे – निश्चित हे प्रश्न पडणार आणि त्याची उत्तरे सोप्पी नसावीत. जो कोण म्हणत कि त्याला भगवंत कळला आहे, मला शंका आहे कि त्याला नक्की तरी कळला आहे का?! भगवंत कळला किवा आपल्याला सत्य कळल हे सांगण्याची गरज नाही – आपल्या कार्य मुळे सिद्ध होणारच.

आपण श्रद्धा तेवढी वाढवावी – खोलवर जाऊदे आणि सूक्ष्म पातळी पासून ते स्थूल पातळी पर्यंत मनाचं परिवर्तन होऊदे.

हरि ओम.

Shree: point = web

 

Shree: point = web

We are made of many things – from consciousness to vibrations to forces to forms – all of them informing our perceptions or the nature of our thoughts or simply put – reality for us. Reality therefore is a construct born from existence. Existence is “default”; not reality as a construct. Hence existence is either non changing and non conditional and One or it can be wavering and many and interdependent and form oriented. Thus existence can be “felt” as thoughts or non thoughts. And the Truth is thoughts stem from the zone of non vibrations.

As a mind entangled in thoughts or intellect, it will try to separate things to a tiny particle – separation of only body or only mind or only intellect or only vibration and so on. Separation may be necessary to know the components as causal relationships but absolute separation does not exist in motion. Which means absolute compartments do not exist or an absolute “point” does not exist in motion. This means we encounter a web of things that change and we can only know the contours of the web, but not individual points. Any attempt to locate a point may lead to disaster. One of the aims of production or efficiency is to single out a “point” so it can get refined or perfected and a perfect situation can be created. This craze for finding a point is a mistake we commit. A situation or a person or an aspect of memory or an object is a web – it is not an individual separated point. Definition or existence of something also depends on many things of the web. So the particular situation is a compliment to the entire web and viceversa. By accepting the point i accept the entire cosmos and viceversa. Both are inseparable.

So complains of anything vanish if all is accepted. The generator of the web is of course consciousness. To become consciousness, trust is to be enhanced.

Hari Om.

Wednesday, August 16, 2023

श्री: वाट शोधणे

 

श्री: वाट शोधणे

भगवंत हि एक वस्तू नाही आहे, किवा ती होण्या करता अनेक वस्तूमधल प्रेम - ही भावना केंद्रित करायला लागते. प्रेम हि भावना कुठल्याही गती किवा आकाराच्या पलीकडे आहे (पलीकडे जाते/ परावलंबन होत नाही/ हेतू नसतो/ शंका नसते/ भीती नसते/ अहंकार नसतो/ वृत्तीतून नसते). म्हणजेच ती स्थळ आणि काळाच्या चौकटीच्या पलीकडे जाऊ शकते.

आपले सर्व व्यवहार स्थळ आणि काळाच्या चौकटीतून सुरु होतात पण तिथेच मर्यादित राहिले तर आपण माणूसच राहू आणि असंख्य जन्म घेऊन सुद्धा आपल्या विकासात काही फरक पडणार नाही. स्थळ आणि काळ हि अस्तित्वाची एक स्थिती आहे जि बदलत राहते, पण जि परमात्मावस्तू मधून घडत राहते. स्थळ आणि काळ – ह्या “वस्तूच” आहेत आणि त्यांचा स्वभाव आहे. त्याचा निर्माता कोण? तर भगवंत. आपल्या मनातल्या सर्व वृत्तींचा उगम आणि प्रश्न आणि कार्य – हे देखील स्थळ आणि काळाच्या अस्तित्वामुळे उद्भवत राहतात, पण ह्या सर्वांच खर अस्तित्व भगवंतावर सर्वस्वी अवलंबून आहे. स्थळ आणि काळाला स्वतंत्र अस्तित्व नाही – तसच आपल्या मनालाही नाही. म्हणून जे दृश्य जग आपल मन अनुभवत ते सत्य नसत किवा तात्पुरत ठरत आणि असंख्य हेतू किवा वृत्तींमुळे उद्भवत राहत. जो वृत्तींचा स्वभाव, तोच दृश्य जगाचा.

तरीही, भगवंत होणे हि एक अखंड प्रक्रिया ठरते. भगवंताची शक्ति आणि ते होण्याच ज्ञान खूप गूढ आहे. अशक्य नाही, पण गूढ आहे. सुक्ष्मतेच अस्तित्व आहेच, त्याची शक्ति सर्वव्यापी कार्य करत राहते आणि तीच पूर्णपणे जग चालवते. त्या अस्तित्वाची जाणीव आत्मसाद करणे हे आपल कर्तव्य आहे, तरच पूर्ण समाधान लाभेल. समाधान हि स्थिती आहे, बाकी सर्व स्थिती अशांत ठरतात. विश्वा मध्ये द्वैताची रचना असल्यामुळे, भगवंताच्या शक्तीच्या व्यतिरीक्त, स्थूल शक्तींचा वावर आणि परिणाम आपल्या बुद्धीवर होत असतो. अस का हे ठाऊक नाही. भगवंत हि जाणीव मनुष्य स्वतः मध्ये वाढवू शकतो आणि कदाचित दृश्य जगातूनच त्याच्या वाटा शोधून घ्यायला लागतात.

हरि ओम.

Tuesday, August 15, 2023

श्री

 

श्री

सर्वच गोष्टी सांगायला हव्यात आणि सर्वांना कळायलाच पाहिजे (त्यातला हेतू) अस विचार करणे योग्य नाही. एक तर फार थोड्या गोष्टी जाणवतात आणि त्याच सांगता येतात पण सर्व गोष्टींच्या पाठीमागे बर्याच सूक्ष्म स्थिती असतात, सूक्ष्म शक्ति उद्भवतात आणि तेच दृश्य जग निर्माण करतात. निर्माण करणे हा मनाचा किवा अस्तित्वाचा स्वाभाव आहे. अस्तित्व  - हि एक जीवंत वस्तू आहे ज्याच्या मध्ये सतत काहीतरी क्रिया करण्याच कौशल्य आहे. आपण त्याला ज्ञानमय आणि आनंदमय म्हणतो. आपल्याला त्या शक्तीच एकच रूप – द्वैत जग दिसतं राहत ज्याला आपण सत्य मानतो. जग काय, आपण काय किवा इतर वस्तू काय – हि एक मनाची धारणा आहे. एकच माध्यम आहे जे अनेक्पणाने भासत राहत म्हणून एकमेकांचा संपर्क येतो आणि जाणीवा येतात आणि सहकार्य येत. भगवंत सोडून इतर कुठलीही गोष्ट स्वतंत्र नसते आणि सर्वस्वी भगवंताच्या स्फुरणाने उद्भवत असते. सर्व एकच आहे – पण जस आपण सूक्ष्म होतो, तसतसा त्या एक्तत्वाचा साक्षात्कार जास्तीजास्त होत जातो. म्हणजेच आपण स्वतः भगवतस्वरूप होतो. बाकी सर्व गोष्टी विलीन होतात किवा शांत होतात. त्यालाच भगवंत संबोधित केल आहे.

वूत्ती फार आतून आल्या असतात – त्याचा हेतू किवा कारण सांगता येत नाही आणि आपण कसे विचार करतो हे हि ठोस सांगता येत नाही. स्थिर होणे म्हणजे ह्या दृश्य जगात आपल संतुलन बिघडू न देणे. हि एक क्रिया आहे – आणि ती काय दाखवेल आणि कुठली परिस्थिती निर्माण करेल हे फक्त भगवंताला ठाऊक! आपल्याला पूर्णपणे भगवंतावर श्रद्धा ठेवण्याची गरज आहे.

हरि ओम.