Monday, March 31, 2025

श्री

श्री 

गोष्टी बदलत राहतात, त्यातच आपले भले आहे. दररोज आपल्याला एक कोरी पाटी हातात येते, कोरे संबंध, कोरी साखळी, कोरा क्षण, कोरा अनुभव. म्हणजे तसे पाहिले तर सर्व कोरच असतं, निरहेतू, स्वच्छ, शुद्ध, कायम, स्थिर.  म्हणजे जीवनाला ही छटा आहे, जी आत्मसात करायला हवी. 

पूर्वीचे संबंध, वासना, साखळी आणि गाठोडे घेऊन आत्ता निर्माण होऊ पाहणारा नवा क्षणात आपण रंग भरतो आणि त्यात गुंतून राहतो. तो रंग कायम राहील, अशी समजूत आपण धरून ठेवतो, पण परिस्थिती बदलत असल्यामुळे तो रंग टिकवण्यासाठी खूप आटापिटा करायला लागतात. इथेच दुःख निर्माण होतं. 

रंग म्हणजे "मी" ही समजूत स्वतःला त्रास देणारी आहे, हे मान्य करायला हवं. रंगाचा आभास होणे, हे विधिलिखिन आहे, पण त्याला धरून राहणे हे तापदायक आहे, कारण रंग निर्माण करणे, होळी खेळणे हे दैवी कार्य आहे, माझ्या स्वाधीन मुळीच नाही! ज्या रंगला "मी, मी" असे म्हणतो, तो रंग कोण देतो आणि कोण बदलत ठेवतो आणि कोण काढून ही घेतो?! 

 _नवा क्षण_ म्हणजे स्थिर स्थिती सतत अनुभवणे, शांत होणे, सत्यात राहणे, कुठल्याही रूपाला न धरून ठेवणे, श्रद्धेने जगणे, प्रतिभा शक्ती आत्मसात करणे...

हरि ओम.

श्री

 श्री 


भाव हा अस्तित्वाचा गुण धर्म आहे. भावाला जाणीव ही म्हणू शकतो आपण. म्हणजे कुठल्याही प्रकाराच्या शक्तीला, रूपाला, आकाराला, क्रियेला भाव _असतो_ किंव्हा _जाणीव_ असते. All forms - physical and invisible - have awareness. Therefore one can look at awareness in terms of refinement or grades - grosser awareness will create and continue the perception of _physical_ forms; whereas subtle awareness may make perception of forces or absolute medium possible.  All is action, and a sense of being. 

In that sense, science is also a kind of action which generates a sense of being. _Whatever_ one does with the mind, creates a sense of being. The question of truth or authenticity or origin is perhaps created by science. Other ancient fields prior to science may be concerned with only engagement with being. This also is said in a retrospective scientific way! 

असो, आहे ते आहे. मी कुठेच जाणार नाही आहे, फक्त रूप बदलेल, अनुभव बदलतील, प्रवाह जाणवेल वगैरे. इतक्या बदलाचं करायचे काय?! भेट किंव्हा प्रसाद म्हणून बघावे. हालचालींना तसा व्ययक्तिक हेतू नसतो, आपण तसे ठरवतो म्हणून गुंतून राहतो. 

हेतू किंव्हा इच्छा किंवा कार्य हे अस्तित्वाचे आहे, ज्याला *भगवंत* असे नाम दिले आहे. ते स्वीकारणे.

हरि ओम.

Friday, March 28, 2025

श्री

 श्री 


विचारां बद्दल काही गोष्टी मांडू शकतो...

दृश्यात, जन्मो जन्मी, संबंधांचे वावरणे, साखळीत अवतरणे, रुपात येणे आणि कार्य करायला भाग पाडणे, हे भगवंताच्या इच्छेतून होते. म्हणून परिस्थितीच्या रूपा बद्दल शंका घेऊ नये आणि शंकेतून मूळ शोधण्याचा प्रयत्न करू नये. भीतीपोटी, जे बऱ्याच वेळेला बुद्धीचा वापर तसा केला जातो, त्याने मूळ हाथी लागत नाही. आणि जे काही मूळ आहे, ते आहे सत्य आणि शांत होण्याचं. त्यात परिवर्तन अभिप्रेत आहे आणि त्याग देण्याचं. बुद्धीचा स्वभावही सोडायला हवा, त्याच्या पलीकडे जायला हवे, म्हणजेच श्रद्धेला योग्य ते स्थान द्यावे. 

घाई करून किंव्हा पळून जाऊन किंव्हा कृती करून किंव्हा खूप कष्टी होऊन उपयोगाचे नाही. त्यातून उलट असे काही संस्कार होऊ पाहतात की अजूनच वृत्ती मनाला घट्ट चिकटून राहतात! म्हणजे सत्य ओळखणे हे श्रद्धा आणि कृपेच्या मार्गानेच कळेल. योग्य वेळ आली, की भगवंत दर्शन देईल. 

कोडी सोडवण्याचा अट्टाहास करू नका. आपण कृती ह्यासाठी करतो की भगवंत कळवा, आपण सुखी होऊ ह्यासाठी नाही. म्हणजे भगवंत विषय नाही. भगवंत कळणे, म्हणजे सर्व विषय, गुंतणे, वावरणे पूर्णपणे शांत होणे. 

विषय नाशवंत आहे. म्हणजे आपण त्याला मुल्य देतो, म्हणून विषय निर्माण होतात आणि मनाला गुंतून ठेवतात. विषयाचे मूळ दृश्यात कदापि नाही आणि सर्वांचे मूळ शांत होण्यात आहे. तसे पाहिले तर "मूळ" ह्या संकल्पनेवर इतका भर आपण देतो, की त्यामुळे त्रासच होतो स्वतःला. 

दृश्याने आपण ठरत नाही. काहीही केल्यामुळे किंव्हा न केल्यामुळे आपण ठरत नाही. विचाराने आपण ठरत नाही किंव्हा कुठल्याही रूपात आपण ठरत नाही. माझे रूप निर्माण होते, म्हणून त्यावर संबंधित रूपे निर्माण होतात. जे दिसते किंव्हा अनुभवात येते, ती एक अस्तित्वाची प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेचं स्थान असतं. तसंच शांत असण्याचंही स्थान असत. 

वरील पार्श्वभूमीवर _निर्णय_ घ्यावा लागतो. निर्णय ही देखील संकल्पना आहे अस्तित्वात असलेली. ती प्रकट होऊ पाहणार.

हरि ओम.

Shree

Shree

From one perspective, all maybe a matter of mind and what it means, how does it evolve, what becomes of it, where does it go and so on. Why should certain things keep becoming something and how those become connected to the mind and so on.

The issue of self has been from the beginning I suppose. And this has generated what we call as evolution, history, continuity and the future. Beginning is a constructed idea. The reality is that beginning in truthful ways means – apriori (from where things “emerge” or take some shape and keep creating a loop).

There is a search which creates everything of lines, circles, spirals, loops. And there is a search that expands awareness and makes one subtle. These two searches are linked. The manner of linking is not known, but the link is there. This unknown nature of link is called “Grace”.

The focus of most of the time we have in our lives is on the first search – defined by our own forms of perceptions. That has led to where we are – fragmented, confused and fearful. No matter what is “fed” to us as things or situations, they can never satisfy the manifested idea of satisfaction, because that is precisely the nature of the mind. What is to be done in this scenario?

The other mysterious link called trust or grace or patience should be triggered as often as we can. With practice, the trigger has the desired effect – of calming us. This may require eons of lifetime commitment. No problem, what’s the hurry?!

Hari Om.

Shree

Shree

Origins of being are mysterious and we are yet to know the feel of “apriori”. This is the search for the pure being and which also means the pure intent of form making and creation. The search “happens” without our intellect’s knowledge and therefore the place of trust is there. This is mysterious question to respond – search happening outside the circle of the intellect’s efforts and mysterious probably means to just let the situation be as it is and fully accept the predicament as it presents itself to us and yet, relax.

Above realization of being calls for “engagement”. Perhaps a human is the only form “capable” of this search and perhaps he/she could know the truth of being. In that sense, the opportunity presented is a novel and a precious one. That does not mean of course that the path is going to be a bed of roses – far from it. Engagement will generate dilemma, confusion, helplessness, acceptance, prolonging which should be done, need for action, learning, application, expectations, letting go - all contributing to the realization of the truth. Every step of this process is necessary to take this journey closer to the truth, even if we do not understand the complete meaning of what we are doing. The incomplete feeling and temporariness are important to become complete, again.

In engagement there is some form of action born from some state of awareness of existence. Action means any things and not just production at all. Action may mean connection, relation, intent, idea, expectation, dilemma, response, fear, approach, knowledge, perception, truth. All these create an act. Therefore, we are a mix of many things and there is no boundary to this mixture and it extends infinitely in all directions. In a nutshell, the idea of “we” is an imagination.

This brings us to one of the most important parts of existence – imagination. There is bound to be imagination of existence – that includes engagement, perception, action and so on. Imagination in this sense, can be said as a “process of being” and His Will to become. Therefore, imagination “happens” and how does this take place is all about realization.

We come full circle.

Hari Om. 

श्री

 श्री 


सर्व क्रिया, त्याचे सर्व घटक, साखळीचे स्वरूप, संबंध जोडण्याची क्रिया, रूप, आकार हे सर्व जाणिवेवर, अस्तित्वाच्या शक्तीवर अवलंबून आहे. हे मला विचारांच्या पार्श्वभूमीवर कळते, प्रत्यक्ष व्यवहारात आणताना बऱ्याच क्रियांचा समावेश होणे गरजेचे आहे. त्यातून परिवर्तन घडते आणि सर्वांगीण अनुभव प्रकट होतो. म्हणजे ज्याला आपण अनुभव मानतो, तो खूप साऱ्या घटकांमधून, साखळीतून, सूक्ष्मापासून, येत असतो (तो फक्त बौद्धिक नाही). 

ह्याचा दुसरा अर्थ असा की बुद्धीला मर्यादा नाही. शुद्ध जाणिवेला मर्यादा आले, की बुद्धीची शक्ती प्रकट होते. बुद्धीच्या शक्तीच्या मर्यादा शिथिल केले, वाढवले, शांत केले की शुद्ध जाणीव होते. प्रत्येक घटकेला मर्यादा किंव्हा आकुंचित कवच म्हणू शकतो. त्यातून त्याचा स्वभाव किंव्हा गुण धर्म प्रकट होतो आणि त्या पद्धतीतून ते दृश्याशी भिडतो. त्या अर्थाने "दृश्य" हे काल्पनिक प्रकरण आहे, सत्य नाही. अस्तित्वाच्या शक्तीवर जर मर्यादा घातले तर त्या शक्तीचे _रूप_ किंव्हा क्रिया दिसून येते किंव्हा भासते आणि त्याचे "मन" होते, जीव होतो, स्वतःवर विचारांचा परिणाम होतो, भाव होतो, "मी" होतो. ह्याला "घसरणे" असे ही म्हणतात. 

असो, घसरलो तर घसरलो! ते का, माहीत नाही. माहीत जर असते, तर घसरण्याचा प्रश्नच आला नसता! आत्ताच्या क्षणापासून जाणीव शुद्ध करणे हा हेतू बाळगणे, म्हणजे मार्गावर चालू लागणे. 

त्यासाठी नामस्मरण.

हरि ओम.

Wednesday, March 26, 2025

श्री

 श्री 


वृत्ती खूप खोल ठिकाणी असते, जी परिणाम करते पण दिसत नाही. ह्याचा अर्थ की परिणाम सूक्ष्म प्रकृतीतून उद्भवतात, एका साखळी प्रमाणे आणि त्याच्या रूपात फरक होत जातो  - अदृश्य आणि शांत स्थिती ते दृश्य आणि अस्थिर. 

म्हणून सर्व दिसणाऱ्या गोष्टींचा उगम अदृश्यातून होत राहतो आणि अदृश्य इच्छा कारण बनते रुपात येण्यात. म्हणून गोष्टींचे किंव्हा वृत्तीचे घडामोडी स्पष्टपणे बुद्धीला उमगत नाही, आणि कदाचित हे नैसर्गिक आहे, म्हणून श्रद्धेला स्थान निर्माण होते. 

हा नियम किंव्हा हा मार्ग सगळीकडे अभिप्रेत आहे, कुठल्याही स्थळात आणि काळात आणि क्रियेत. 

मी ह्या संकल्पनेवर सुद्धा श्रद्धा ठेवायला लागते  - आपले होणे, वावरणे, अनुभव येणे, निघून जाणे, काहीतरी वाटत राहणे, अर्थ निर्माण होत राहणे, कृती करणे, परिणामांना सामोरे जाणे  - हे सर्व श्रद्धेने ओळखणे.

हरि ओम

श्री

 श्री 


दृश्याबद्दल काहीही वाटणे ही आपल्याच मनाच्या _स्थितीचे प्रतीक_ आहे. ते प्रतीक गुंतलेले, क्रियाशील आणि बदलणारे असते, म्हणून अस्थिर असते. हा झाला अनुभव आणि त्यातून होणारे निर्णय, म्हणजेच चक्र. 

अनंत रूपे येऊ पाहतात, गुंतून राहतात, भासतात आणि निघून जातात. येणे आणि जाणे ही क्रिया कायम राहते आणि त्याला चालना देणारी शक्ती आणि त्यातून होणारे परिवर्तन आहे *नाम*. 

नाम आपल्या बरोबर कायम असते, आपण तिथून आलो आहोत आणि तिथे जाणार आहोत. दृश्य जग ही मधली स्थिती आहे, जिथे भाव आणि अनुभव हे घटक बघायला मिळतात जीवाला. जीव कायम नाही, त्यावर कुठलीच गोष्ट कायम नाही किंव्हा सत्य नाही. म्हणजेच ती तात्पुरती, निर्माण झालेली आहे. म्हणजे हा सर्व देखावा आहे, ज्याला टीका न करता, शांत मनाने स्वीकारावा लागतो. 

तो देखावा रेघ म्हणुन आढळेल, कधीतरी चक्र म्हणून, कधीतरी जाळ म्हणून (म्हणजे कुठलेही रूप घेऊन) आणि तसे आढळण्यास आपल्यावर परिणामही करेल किंवा कार्य करायला भाग पाडेल. देखावा आणि भाव हे एकाच प्रवाहाचे गोष्टी आहेत. 

प्रवाह हे भगवंताचे कार्य आहे. कार्य म्हणलं तर ते कायम राहणार. 

प्रवाह शांतीतून प्रकट होतो. प्रकट होणे म्हणलं, तर त्या कार्याला हेतू नसतो, तो त्या असण्याचा गुण धर्म आहे, म्हणजे तसे होणे आहेच. 

हरि ओम

श्री

 श्री 


मला काय वाटत आहे, ते सांगून किंव्हा करून मोकळे व्हावे. ते सरळ नसेल, वाकडे असेल, त्यात बरीच संकल्पना असतील, बदल असतील, गुंतागुंती गोष्टी असतील, विषय असेल, संबंध असतील, चिंता असेल, त्रास असेल, भावना असेल...काहीही असो, ते सांगणे, कार्य करणे, भगवंताला शरण जाणे, त्याचे स्मरण ठेवणे. त्याचा विचार कसा राहील, ते ध्यानात घेणे. मग हे लिहिणे जरी निमित्त झाले, त्रास जरी निमित्त होत असले, तर मग तसे होऊ देणे. 

लिहित असताना संबंध रेगे सारखे वाटतात. प्रत्यक्ष विचार प्रकट होताना बऱ्याच दिशांत मधून रूप, आकार, कार्य, हेतू, संबंध निर्माण होत राहतो. म्हणून लिहिण्यात, बोलण्यात, ऐकण्यात, कार्य करण्यात नेहमी थोडा फरक राहणार. त्या फरकाला त्रास मानून न घ्यावे आणि हे नैसर्गिक आहे, हे ओळखणे. म्हणजे भगवंत सर्वांगीण पद्धतीने ओळखावा लागतो किंव्हा जाणिवेत आणायला लागतो. किंव्हा जाणीव क्रिया सर्वांगीण, सर्व स्तरात, सर्व स्थितीत, सर्व रूपात पसरलेली असते, ती फक्त विचारात नसते. म्हणजे जिवंत प्रकरणाला बरेच रूप आणि साखळ्या असतात  - सूक्ष्म रूप ते स्थूल रूप - सर्व भगवंत दर्शवत आहेत असे संत ज्ञानेश्वरांचे सांगणे आहेत _(7,5,3 दशकांचा मेळा, एकत्तवी कळा दावी हरि)_ म्हणून जाणीव स्थिर होऊ देणे, ह्याला सर्व पद्धतीने आत्मसात होऊ द्यावे लागते. त्यासाठी वेळ द्यायला लागतो. म्हणून सत्य काय आहे, हे जाणवायला लागते, अनुभवायला लागते - ते बोलून सुरुवात केली असते. 

हरि ओम.

Friday, March 21, 2025

Shree

 

Shree 

To exist means to become visible as space and become related or connected with it. Existence has spatial, temporal and experiential dimensions and which comes first is a mute point. 

If any experience of some kind (vibrations) want to become "something", it has to be made *_visible as_* space and time. 

I am also a space and time starting from vibrations, to thoughts, to feelings to the outside medium. 

Therefore to assume that space is neutral and physical is a misconception. I and space are integral in thoughts, feelings, senses, movements, changes and interactions. The sense of a grounded place can be created if the same seed of intent is within me. 

Can a diagram have all above realizations and can a diagram be seen as a method to also uncover or discover more realizations? Can realizations be spoken about? Can they help to connect? Can they help in designing? 

How do ideas in planning on site or compositions depend on _perceptions_ of space? A physical way of considering 'site' may lead to a response in designing that would be different than a symbolic spatial idea that awaits expression. How does one deal with these ideas and shouldn't they be entertained and accepted in academic institutions?

Hari Om.

Wednesday, March 19, 2025

श्री

श्री 

निर्माण होत राहणे, साखळी असणे, एकात एक रूप प्रकट होणे, बदल होणे, पसरणे, वावरणे, घटने, विघटन होणे, एकत्रित होणे - ह्या सर्व क्रिया अस्तित्वाच्या शक्तीने साकार होत राहतात. त्या क्रियांचे बीज वासनेत असल्यामुळे, तशी ढवळाढवळण आपणही अनुभवतो आतल्या आत. त्या गुणामुळे दृश्याशी संबंध जोडले जातात आणि त्या भावनेतून आपण वावरत राहतो. दृश्यात असणारे ढग काय, समुद्र काय, वाळू काय, झाड काय, मुंगी काय आणि मी काय - बीज एकच आहे. ढग आले आणि गेले पण आकाश तसंच स्वच्छ राहत. तसे वृत्ती आणि आकार किंव्हा साखळी असतात, वावरत राहतात, बदल पावतात आणि निघूनही जातात, पण शुद्ध माध्यम तसंच राहत. शक्ती भगवंताचीच आहे, तीच सर्व जग चालवत राहते. तिच्यातून अनंत पदार्थ घडतात आणि मोडतात आणि परत प्रकट होतात. तो त्या शक्तीचा गुण आहे आणि त्याला आपण "नाम" असे म्हणतो. 

पदार्थ कुठून आला आणि त्याचे रूपाचे घटक कोणते आणि ते कसे निर्माण झाले, हे विचारण्यात काही विशेष तथ्य नाही. सारे प्रवाह असेल, तर पदार्थ केव्हाही, कुठेही, कसेही होईल...ते शांत होऊन बघणे. बदल कधीही होईल, रूप कसेही असेल, अनुभव कसाही येईल. आपण विचलित होऊ नये, कारण कार्य करणारा तो आहे आणि त्याच्या इच्छेतून आपण होतो. त्याची इच्छा, म्हणून आपण आहोत आणि कार्य करतो. 

सर्व स्वीकारावे.

हरि ओम.

Tuesday, March 18, 2025

श्री

 श्री 


जाणीव आणि विचार चक्र ह्या मध्ये संबंध नक्की आहेच, पण तो गूढ आहे, फक्त बौद्धिक नाही. ज्या प्रकारची जाणीव शक्ती असते, त्या रूपाचे संबंध चक्र विचार निर्माण करते, किंव्हा तशी विचार करत राहते. 

विचार ही साखळीतून आलेली क्रिया आहे. म्हणून साखळी काय हवी, आणि तिने काय दाखवायला हवे, ते आपण ठरवावे, कारण साखळी एक रूप दर्शवत राहणार आहे आणि तसे आपले स्मरण होणार आणि तशी प्रतिक्रिया. तरीही साखळी कुठून येते, ह्याचे उत्तर आहे _जाणीव_ किंव्हा आणखीन सूक्ष्म शक्ती. सूक्ष्माचा स्वभाव निराळा असतो आणि तो वेगळे चक्र साकार करतो, अस्तित्वच वेगळं स्मरण प्रकट होत, म्हणून आपण सूक्ष्म व्हावे. थोडक्यात _अस्तित्व_ जाणणे म्हणजे त्याचे स्तर असतात जाणिवेचे. 

प्रत्येक जीव जाणिवेचे रूप घेऊन आला असतो आणि त्या प्रमाणे अर्थ मांडतो जीवनाचा. मला तुझे रूप माझ्या रूपावरून दिसणार आहे आणि तुलाही माझे रूप तुझ्या रुपावरून. ह्याचा सरळ अर्थ असा आहे की प्रत्येकाचा सूक्ष्म होण्याचा प्रवास आहे, जो त्याला करू द्यावा. त्या प्रक्रियेत पूर्णत्वाचा अर्थ मला जरी माहित नसला, तरीही आपण प्रवासात आहोत, हे ध्यानात ठेऊन शांत राहू शकतो. कधी न कधीतरी शांती लाभेल, ही श्रद्धा बाळगावी. 

वरील सांगणे सोपे आहे, तितकेच अरचरणात येऊ देण्याला वेळ देणे महत्वाचे आहे. किती जन्म लागतील, किती रुपात आपण वावरू, कुठे जाऊ, काय धरण होईल हे सगळ अनुभवात येऊ पाहणार आहे. त्याला सामोरे जाणे शांतपणे. माझ्यातील गुंता ह्याचे स्वरूप मला माहिती आहे आणि तुला ही वेगळ्या पद्धतीने माहिती आहे. पण शेवटी आपण दोघेही गुंता म्हणून एकमेकात वावरतो! कुणी कुणाला समजावे?!! म्हणून जीवाचा गुंता हा संतांना बरोबर दिसतो आणि त्याचे ऐकणे आपल्या हिताचे ठरते. 

मनाचे स्वरूप धारण करण्याचे आहे. गोष्टीचे संस्कार होऊन आपण तसे त्यात गुंततो आणि त्या गोष्टीला खरे मानतो, विषय बनवतो. हा मनाचा स्वभाव आहे, त्याच्यातून कुणीही सुटलेलं नाही. तसेच भगवत स्वरुप आपण होण्याचा प्रयत्न करू. 

क्रिया, कार्य, बदल, सांगणे, न सांगता येणे ह्या सर्वांना महत्वाचे घटक समजा प्रवासातले. ते येणार. त्याला त्रासुन न जाणे.

चिंतन करत राहणे. त्याचा परिणाम व्यवहारात कसा होईल, ते श्रद्धेने स्वीकारावे. 

हरि ओम.

श्री

 श्री 


बदल आपल्या आत ही घडत असतो. जे सर्व दृश्यात आहे, त्याचे बीज आपल्या आत ही आहे, ज्याला वासना किंव्हा वृत्ती म्हणतात. दृश्य भोगण्याचे कारणच ते आहे जे आपण बीज प्रकट करत राहतो किंव्हा त्या क्रियाशी समरस असतो. त्यात परिवर्तन होत विचार, भावना आणि आकार असा काहीसा क्रम निर्माण होतो जो इतर गोष्टींमध्ये गुंतून राहतो. रूपाच्या दृष्टीने आपण त्याला "गुंतून राहणे" असे म्हणू कारण तशीच जाणीव झाली असते किंव्हा तसा भाव असतो. तो भाव वेगळेपण आणि तात्पुरतेपण ह्याचे स्मरण ठेवतो, म्हणून स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे लागतो, प्रपंचात खूप गुंतून राहतो, चक्रात चिकटतो, विषयात दंग राहतो, अट्टाहास धरतो, सुख आणि दुःख भोगतो, वगैरे.

भगवंताच्या दृष्टीने सर्व आकार एकमेकात गुंतून राहणे, हे त्याचे कार्य आहे, त्याची इच्छा आहे, त्याची संकल्पना आहे, त्याची शक्ती आहे. शक्तीचे असणे, ह्याच्यातून हा सर्व _परिणाम दिसून येतो_. त्याला विश्र्वरूप भाव म्हणता येईल. 

हे का ते असा प्रश्नच नाही आहे, कारण एका स्वतंत्र निर्माण झालेल्या बिंदूवर लक्ष कायम कसं ठेवता येईल जीवाला? दृश्यावर लक्ष किंव्हा भगवत वस्तूवर लक्ष असा काही निर्णय नाही, बुद्धीच्या दृष्टीने. भगवंतावर लक्ष म्हणजे त्याच्या असण्यावर श्रद्धा वाढवणे आणि तिथे मनाला स्थिर करणे. स्थिर होणे ही क्रिया आहे ज्यावरून हेतूचे सर्व गुण गळून पडतात आणि कुठलीही वृत्ती उठत नाही. म्हणजेच मन सूक्ष्म होते. 

हा प्रवास गूढ आहे, आणि पूर्णतः श्रद्धेवर अवलंबून आहे. इथे श्रद्धा म्हणजे प्रयास, सैय्यम आणि कृपा ह्याचे मिलन. 

हरि ओम.

Sunday, March 16, 2025

श्री

 श्री 


वासनेचे रूप किंव्हा उगम किंव्हा भाव हे गूढ प्रकरण असावं, कारण त्याने दृश्यात सरळ बौद्धिक उत्तर मिळत नाही. म्हणजे सर्वसामान्य स्थितीतून अनुभव घेताना, उत्तराची व्याख्या ही बौद्धिक चक्रावर आधारली जाते, म्हणून अट्टाहास, चिंता, त्रास, अहं ह्या गोष्टी त्यातून येऊ पाहतात आणि ते स्पंदने आतून प्रकट होत राहतात. उत्तर मिळवण्यासाठी त्यात स्वीकार, सैय्यम, शुद्ध होणे, श्रद्धेचा भागही तेवढा मौल्यवान असावा. त्यातून आतील परिवर्तन होऊन सत्य काय आहे ते उमगु शकते. उत्तर मिळणे म्हणजे परिवर्तन होणे आणि शांत राहणे. "मी म्हणजे काय आणि कोण आहे मी" ह्याचे उत्तर मिळणे म्हणजे भगवत स्वरूपात विलीन होणे. मीच न राहिल्यामुळे त्या संकल्पनेवरील स्थित साऱ्या गोष्टी विलीन होतात. 

आता प्रश्न असा आहे, की हे कसे साध्य करावे? त्यात असे सांगणे आहे की नामस्मरण करावे. त्याचे महत्व एकदा पटले की त्या मार्गाच्या आड काहीही येऊ शकत नाही. साहजिकच तरीही मन अपेक्षा करते. ते ही बाजूला सारून, शुद्ध भावनेनं नामस्मरण करावे.

हरि ओम

श्री

 श्री 


वासना चंचल असते आणि त्याने विविध चक्र, विचार, भावना आणि त्यातून संबंध, क्रिया, आकार, अहं भाव ह्या गोष्टी _निर्माण_ होतात. कुठून निर्माण होतात, असा जर प्रश्न असेल, तर एका अस्तित्व माध्यमातून. ते मध्यम एकच असते आणि सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी असते. संबंध, गुंतणे, गती, बदल, परिणाम, अनुभव, चक्र, चढ आणि उतार, डाव आणि उजवे ह्या संकल्पना आणि अनुभव त्या केंद्रस्थाना पासून _प्रकट_ होतात. आपल्याला _प्रकट_ होऊ पाहणे समजत नाही आणि भावनेत वाहत जातो. त्याला चंचलपणा म्हणतात. 

अभ्यास जो आहे, तो स्थिर होण्याचा आहे, एकदम स्थिर. तो दृश्य माध्यमातून होणे आहे. जे आहे, ते आहे. दृश्य माध्यम असे का आणि असे का आपल्या वाट्याला आले आहे, हे विचारण्यात आपली शक्ती वाया जाते. दृश्य पूर्णपणे स्वीकारून, भगवंताची इच्छा ओळखून त्याचे चिंतन करावे. योग्य मार्ग मिळेल.

हरि ओम.

Friday, March 14, 2025

श्री

श्री 

संबंध किंव्हा स्पंदनाच्या साखळीतून अदृश्य ते दृश्य ही क्रिया काय असते आणि त्यात कुठले घटक आहेत, हे जाणून घ्यायला बुद्धी, भावना आणि कार्य लागते. स्पंदन भगवंताच्या अस्तित्वातून प्रकट होत राहतात आणि त्यामध्ये परिवर्तन घडून इतर स्थिती निर्माण होत राहते, रूप घेते, भाव आणते, जाणीव आणते, गुंतून राहते, वावरते आणि दृश्य वस्तू बरोबर संबंधित राहते. जे डोळ्यासमोर आहे, ते सर्व एका क्रियेतून निर्माण होते आणि त्यात आपण इतके गुंतून राहतो, की त्याला "खरे" मानतो आणि त्याचा परिणाम भोगतो. मूलतः सर्व साखळी आणि प्रवाह आहे - pattern. ते तसे वाटत नाही आणि बदलणारे, तात्पुरते, वेगळे वाटते ह्याचाच अर्थ की त्या स्पंदनाचा आपल्यावर खूप परिणाम झाला आहे. 

ती धुंदी उतरवण्यासाठी नामस्मरण हे एकमेव औषध आहे. भगवंताची जाणीव आत्मसात करा. 

हरि ओम.


श्री 

परिणाम कसे होतात आणि आपण कसे गुंतून राहतो, ह्याने चिंता किंव्हा विषय करून काही उपयोगाचे ठरत नाही. स्वतःला विलीन करणे, म्हणजे भगवंताचे दर्शन होणे, हे ध्येय आहे. कितीतरी गोष्टी बाधक ठरत राहतात  - विशेषतः आपली बुद्धी चक्र. जर तर या परिभाषेत सतत वावरल्यामुळे, सत्य किंवा श्रद्धेची शक्तीचा अंदाज येणे अवघड होते. बुद्धी चक्राला शांत करणे पहिली गोष्ट आहे. ते होत राहताना इतर अवलंबून असणाऱ्या गोष्टी देखील शांत होतात. 

म्हणून शांत होणे ही क्रिया गूढ आहे. आपण नाम घेत राहणे. त्यावर श्रद्धा वाढवत ठेवणे होय. 

हरि ओम.

Thursday, March 13, 2025

श्री

 श्री 


शक्ती हे अस्तित्व आहे, जे अनंत रूप निर्माण करत राहते आणि गडप करते. हे कार्य आहे (action). कार्य, किंव्हा ज्याला शुद्ध कार्य आपण म्हणतो, ते हेतूच्या पलीकडे असते. म्हणजे ते असणार. अस्तित्वाला सूक्ष्म, कार्य आणि स्थूल असे तिन्ही अंग आहेत, आणि जे दिसते ते एक दिवस जाणार आहे आणि जे नाही आहे, ते एक दिवस दृश्यात येणार आहे. म्हणून ह्या हालचाली दिव्य आहेत आणि त्याने चिंता करण्याची गरज नाही. 

दृश्याच्या पाठीमागे आणि नंतरही अदृश्याची शक्ती वावरत असते, परिणाम करत असते. म्हणून _दृश्य_ ही _स्थिती_ आहे, स्टेशन नाही. किंबहुना कुठलीच गोष्ट स्टेशन नसते, भगवंत सोडून. 

अस्तित्वाच्या भाषेत स्टेशन म्हणजे स्थिर होणे. बाकी सर्व गोष्टी बदलणाऱ्या आहेत, जो पर्यंत आपण त्यात वावरत राहतो. 

हरि ओम.

Wednesday, March 12, 2025

श्री

 श्री 


विचार ही वेगळी स्थिती आहे, असे अनुभव आणते. म्हणजे वेगळेपण, तात्पुरतेपण, चक्र, साखळी, बदल ह्या सर्व क्रिया आतून प्रकट होऊ पाहतात आणि त्या क्रियांमध्ये आपण किंव्हा भाव गुंतून राहतो. त्याचं एक स्वरूप म्हणजे विचार प्रकट होणे. 

विचार हे स्थळ आणि काळ आणि अनुभव किंव्हा भावना आणतात. जे विचार प्रकट होतात शक्तीमुळे, त्याने अस्तित्वाचे अर्थ निर्माण होतात. आपण होणे, वावरणे, जाणे हे अस्तित्व शक्तीमुळे होते, ज्याचा परिणाम "मी" असतो आणि चक्रात वावरतो. ही भगवंताची इच्छा. 

म्हणून कार्य त्याच्या अनुसंधानात करावे असे संत सांगतात. ते केल्याने जाणीव शुद्ध होऊ शकते. 

हरि ओम.



श्री 

 *कार्य असणे* हा अस्तित्वाचा गुण आहे. तसे पाहिले तर अस्तित्वाला तीन गुण आहेत - शक्ती, भाव आणि कार्य. हे तीन गुण एकाच साच्यात वावरतात आणि त्यावरून योगाचे प्रकार येतात. अस्तित्व शक्ती आणि जीव ह्या मध्ये वरील तीन गुणांच्या आधारे फरक असतो, म्हणून जीवाला अनुभव वेगळ्या प्रकाराचे येतात. आपला मार्ग योग करण्याचा आहे, जेणेकरून जीव शेवटी भगवत स्वरूप होतो. म्हणजे अस्तित्वाच्या गुणात जीवाचे परिवर्तन होते किंव्हा जीव त्यात विलीन होतो. 

म्हणून अभ्यास जो आहे, तो जाणिवेचा आहे, स्वतःचा आहे, कार्याची सत्य व्याख्या ओळखण्याचा आहे, शांत होण्याचा आहे, सत्य होण्याचा आहे, स्थिर राहण्याचा आहे. 

त्यासाठी नामस्मरण. 

हरि ओम.

Thursday, March 06, 2025

श्री

श्री 


दृश्य जग _हालचाल_ म्हणून दिसते, अनंत गोष्टी घडणे, तात्पुरतेपण वाटणे, बदल वाटणे. ह्याचे मूळ साखळी सारखी क्रिया मध्ये आहे, जी सूक्ष्मापासून ते स्थूल स्थिती पर्यंत राहते आणि _भाव_ निर्माण करते किंव्हा जाणीव देते. 

मन हे शक्तीचे चिन्ह आहे. प्रकट होऊ पाहणारी क्रिया मनाला वावरत ठेवते म्हणून तश्या वृत्ती, विचार, भावना, अनुभव प्रकट होऊ पाहतात आणि त्यातून _दृश्याशी संबंध_ जोडले जातात. _एकाच वेळेला_ साखळी, भाव, मन (मी), दृश्य, वेगळे वाटणे, अर्थ, प्रक्रिया ह्या साऱ्या गोष्टी निर्माण होत राहतात. 

त्या चक्रात गुंतून राहिल्यामुळे स्मरण तसे टिकून ठेवतो आपण आणि तसेच संस्कार मनात घट्ट करत राहतो. दुसरे नाव त्याचे म्हणजे "माया". ह्या टप्पा पर्यंत येणे किंव्हा समजून घेणे हा ही प्रवास आहे. त्यातून पुढचा मार्ग शोधणे आले. 

तो मार्ग म्हणजे नामस्मरण.

हरि ओम.



श्री 

आपण काहीतरी विसरू आणि साखळी तुटेल सिद्ध होण्याची, अशी समजूत करून घेतल्यामुळे घाबरायला होते. मग ताबा, सिद्ध करण्याची क्रिया, अट्टाहास, बेचैनी अशा वृत्ती निर्माण होतात. 

आपण क्रिया नाही साखळी नाही. अस्तित्व त्याच्याही पलीकडे असते. ते आपल्या आत असते, म्हणून ते कायमच आपल्या बरोबर येते. घडामोडी काहीही हो, आपण कुठेही जावो हालचालीत, परिस्थिती काहीही असो, भगवंत आपल्या बरोबर आहे, कारण तोच आपल्या रूपाला निर्माण करत राहतो. 

त्याचेच चिंतन करावे.

हरि ओम.

श्री

 श्री 


मनात कार्य घडत असते आणि ते काही अनुभव प्रकट करतात, आणि ती साखळी कायम राहते. 

आपल्याला कुठल्या पद्धतीने कार्य करायचे आहे, ते ठरवावे. प्रेमातून केले तर फार उत्तम, कारण त्याचे परिणाम चांगल्या पद्धतीने वृत्तीला शुद्ध करतात आणि विश्वभर पसरतात. ते कसे, ह्याकडेही चिकित्सा खूप करू नये. ते होते, असे मानून श्रद्धेने शुद्ध कार्य करत राहावे. 

श्वास, काळ, स्थळ, साखळी, कार्य हे सतत निर्माण होणारे, बदलत राहणारे, परिणाम करणारे घटक आहेत. सत्य जाणून घेणे म्हणजे ह्या सर्व घटकांच्या द्वारे स्थिरता मिळवणे. स्थिरता म्हणजे काळजी, चिंता, त्रास न होऊ देणे ह्या हालचालींमुळे. 

त्यासाठी नामस्मरणात राहण्याची सवय लावून घेणे.

हरि ओम.


श्री 

जगात कुठलीही गोष्ट किंव्हा कुठलेही रूप कायम नसतं - असे लिहिणे ही नाही! 

नाही म्हणणे ह्यात खूप मोठी शक्ती आहे आणि सत्य आहे. आपल्या बरोबर पुढे कुठलेही रूप येत नाही आणि जे काही येते, त्याला आपणच उत्तेजीत किंव्हा प्रकट केलेले असते. म्हणून जे येऊ पाहते, ते येऊ देणे - _कारण_ त्यातूनच बदल, अर्थ, मार्ग, शांती भाव प्रकट होईल. तोच आपला मार्ग.  

गोष्टी येणे आणि जाणे हे दैवी कार्य आहे, आपण निमित्त ठरतो. It is only a pause, called life. Pause itself is a phenomenon of existence and it will continue as a journey. 

सर्व स्वीकारावे श्रद्धेने.

हरि ओम.

Tuesday, March 04, 2025

श्री

श्री 

जाणीव सूक्ष्म होऊ देणे म्हणजे फक्त शुद्ध शक्ती राहणे, सिद्ध होण्याची गरज न बाळगता. 

सध्याची जाणीव अशी आहे की ज्यामध्ये द्वैत आहे, वेगळेपण आहे, तात्पुरतेपण आहे, आकार आहे, संबंध आहे, गुंतून राहणे आहे, क्रियाशी एकरूपता आहे, अनुभव येणे आहे, संकल्पना आहेत, चक्र आहे, विचार आणि भावना आहेत, विघटन आहे, अनेक स्तर आहेत. एकंदरीत ह्या क्रियेमुळे भाव उत्पन्न होतो, जो प्रतिक्रिया देण्याचा अट्टाहास धरतो, किंव्हा स्वतः निर्माण केलेल्या दृश्यात गुंतून राहतो, परिणाम भोगतो. ज्यात मी वेगळा वावरतो आणि त्यात तू वेगळा असतो, म्हणून तुझ्या बरोबर संबंध जोडून प्रपंच थाटतो. हे संबंध अनेक जन्म - मरणाच्या हालचालीत किंव्हा प्रवाहात गुंतून ठेवतात, म्हणून मूळ शक्तीकडे लक्ष विशेष जात नाही. 

शक्तीचे "जागे होणे" अभिप्रेत आहे. म्हणजे मूळ प्रकार ध्यानात यायला हवा, की जे आपण समजतो ते सर्व एकाच शक्तीचे कार्य आहे जी सगळीकडे स्थित आहे, जिला असे स्वतःचे काही रूप नाही, स्थळ नाही, काळ नाही, क्रिया नाही, हेतू नाही, स्वभाव नाही. ह्या सर्व अर्थाच्या पलीकडे ती शक्ती आहे, जिच्यातून हे सर्व अर्थ प्रकट होतात. अर्थ होणे म्हणजे मी होतो. शक्ती असणे, म्हणजे अर्थ होऊ पाहण्याच्या अगोदरची शांत स्थिती.

हरि ओम.