Wednesday, October 29, 2025
Shree
Above article may be significant in some ways.
Fear or anything of the mind is a fundamental aspect of existence. The mind creates imagination and that sets relations, meanings, feelings, thoughts, actions, consequences. It can fragment or can evolve into truth.
In such a situation of existence created by the mind, there exist issues, questions, doubts, struggles, fears, urges and so on. Everyone has them and it is not the task of work or career to _resolve_ those. In fact they needn't be fixed. They are to be accepted and the thoughts are to go beyond the urge to fix things.
Since everyone has those, one shouldn't ridicule anything or anyone harbouring those. Acceptance is a mysterious process and perhaps paying gratitude to such tendencies may generate a state of tranquility in the self.
We resist ourselves too much. It is not required, for we don't come here to prove anything to anyone. Not are we supposed to be responsible for the whole world. Nor is the world supposed to depend on us.
We are on a journey. And that is all there is to it.
Hari Om.
श्री
श्री
"आपण" हा भाव होणे, हा एक प्रकारचा संबंध आहे अस्तित्वात होऊ पाहणारा...त्यात वृत्तीतून ते विचार धारा ते भावना ते देह ते दृश्याशी संपर्क अशा घटकांमधून संबंध प्रज्वलित होत राहतो. संबंध, हा इथे _शब्द प्रयोग_ वापरला आहे, त्याचा अर्थ खूप गूढ आहे आणि प्रवाह आणि स्मरण दर्शवतो. आपल्याला हे सर्व वरील कार्य "स्मरण" म्हणून अनुभवात येतं राहतं आणि त्याला आपण सत्यपणा देतो किंव्हा धरुन ठेवतो, त्याला मूल्य देतो, त्याचे परिणाम भोगतो, त्याला विषय करतो, त्याची चिंता करतो वगैरे..
कधीतरी वरील कार्याची जाणीव व्हायला सुरुवात होते आणि मग प्रश्न पडायला लागतो की शुद्धता म्हणजे काय आणि ती कशी आत्मसात करावी? तिथून नामस्मरणाला सुरुवात होते.
कार्य अनेक स्तरात स्थित असते आणि आपल्या पलीकडे कार्य असणे, ह्याची जाणीव नामस्मरण करून देते. त्या कार्य पर्यंत जाण्याची शक्ती (म्हणजे परिवर्तन) नामस्मरण करून देते, असे संतांचे सांगणे आहे. नामस्मरणावर श्रद्धा बसायला वेळ देणे जरुरी आहे, ते त्वरित होणे कठीण आहे.
ज्या पद्धतीने आपण वावर करतो, ती सवय खूप काळापासून आलेली असते, म्हणून तिला शांत करण्यास वेळ देणे जरुरीचा आहे. मौज अशी आहे की शांत होणे हा उलटा प्रवास आहे, म्हणून बुद्धीचे परिवर्तन होणे आहे...म्हणजे गनिमी काळापासून जो स्वभाव बुद्धीचा झाला आहे, तो "सोडून देणे" (त्यात परिवर्तन होणे) अभिप्रेत आहे. ते सोडून देताना श्रद्धा भक्कम लागते, जी सर्व शंकेतून पलीकडे नेईल स्वतःला. शंका येणे साहजिक आहे, कारण शांत होण्याची सवय बुद्धीला नसते. त्याचे विश्लेषण करून श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, की मार्गात गोष्टी चांगल्या असल्या का वाईट, त्याने जर आपण त्यात गुंतलो तर ते घातकच ठरते.
त्या विश्लेषणाचा सरळ अर्थ असा की मनाने स्थिर व्हावे, विचार धारा येऊ देणे आणि जाऊ देणे, कर्तव्य करणे, कार्य भाव ओळखणे, प्रारब्ध आणि भोग कसेही जरी वाटले, तरीही नाम घेणे सोडू नये, श्रद्धा वाढवणे, भगवंताच्या इच्छेने सर्व काही होते, हे ओळखणे...
हरि ओम.
श्री
श्री
सगळ्या गोष्टी विचारातून कळतील का, हे माहित नाही.
आपले रूप अनेक क्रियेतून होते, म्हणून सर्वांगीण जाणवणे आले. किंबहुना जाणीव क्रिया सर्व स्तरात पसरलेली असते किंवा सर्व स्तरात स्थित असते, म्हणून सर्व साखळीच्या घटकांचा आधार लागतो (perception is wholistic and not a point or not located at a single location), एखादी गोष्ट "पूर्ण" समजून घेण्यासाठी. म्हणजे "गोष्ट" देखील सर्व साखळीत स्थित असते, फक्त दृश्यात नाही! किंव्हा गोष्टींचे "गुण" सूक्ष्मापासून ते स्थूलपर्यंत प्रकट होत असतात! म्हणून गोष्ट "कशी आहे आणि तिचे वर्तन कसे आहे" त्यासाठी गूढ जाणीव व्हायला लागते, तिथे फक्त मर्यादित स्थूल बुद्धी वापरून चालत नाही.
ह्याचा दुसरा अर्थ असा ही होतो की सर्व घटकांच्या संबंधातून एक बिंदू म्हणजे बुद्धी. म्हणजे बुद्धी देखील तिचे रूप आणि गुण सर्व घटकांच्यातून घेते...ती स्वतंत्र नसते! म्हणून सर्व घटक एकमेकात गुंतले असल्यामुळे तात्पुरते, बदलणारे, अस्थिर वागतात. त्यातून म्हणून परिस्थिती तशी भासते, आणि कशाचाही तसा पूर्ण आधार मिळणे कठीण.
तिसरी गोष्ट अशी की ह्या सर्व साखळीचा परिणाम प्रत्येकात वेग वेगळ्या पद्धतीतून उमटत असतो. तो एकाच पद्धतीने सुरू करावे आणि शेवट व्हावा, असा अट्टाहास सोडून द्यावा...म्हणजेच की एकाच पद्धतीने जगाकडे बघावे, अशी समजूत योग्य नाही.
चौथा अर्थ असा की प्रत्येकाचे प्रश्न वेगळ्या रूपाचे निर्माण होतात आणि त्याचे उत्तर त्याला स्वतःच्या मार्गातून कालांतराने उमगतात. म्हणून दुसऱ्यांना दोष देऊ नये, सैय्यम ठेवावा आणि स्थिर व्हावे. प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने बहिर्मुख असते, प्रत्येकाला अपुरेपणाची भावना त्रस्त करते, प्रत्येकजण काळजीत असते, प्रत्येकाला आधाराची भूक असते...ते कोड स्वतःला आत्मसात करायला लागते - इथे दुसरा काही करू शकत नाही विशेष. आपण शांत रहावे ह्या परिस्थितीत.
पाचवी गोष्ट अशी की मनाने दाखवलेला मार्गात _परिवर्तन_ होणे अभिप्रेत आहे (transformation and evolution). त्यासाठी मनाच्या त्या भाषेला "पकडून" राहणे योग्य नाही, कारण भाषेचे मर्यादा असतात, त्यातून पूर्ण सत्य रूप जाणवत नाही.
प्रपंच आहे तसा असू द्यावे. कोडी सोडवण्यातून सुरू करत, शांती भावाकडे जवळ जाणे, स्वतःचा परिवर्तन करणे.
हरि ओम.
श्री
प्रपंच असा का आला, त्यातील संबंध, लोक, वृत्ती, काम, काळ, बालपण ते आत्ताची परिस्थिती, बुद्धीतील वाढ, संकल्पना, धरणे असे का येतात, हे सर्व अस्तित्व कार्य म्हणून ओळखावे. त्या कार्यात "मी" एक घटक म्हणून झालो किंव्हा आलो.
अनुभवांचे वावरणे, साखळीतील घटक, सूक्ष्म शक्तीचे वावर ते स्थूल स्थितीचे संबंध, काळातील निर्णय, समस्या, प्रश्न, भावना, जबाबदाऱ्या, कामाचा वेग, बदल, चक्र, ऐकणे, बोलणे, गिळणे, बघणे, देह... हे असे का येते बरोबरीने, तेभगवंत भावनेवर सोपवावे, म्हणजे शुद्ध भावनेने स्वीकारावे.
शुद्ध म्हणजे भगवंताची जाणीव, त्याच्या कार्याची जाणीव आणि अनुभवांचे *स्थान* (कार्य, साखळी, स्थिती, भाव, संबंध, चक्र, परिणाम). शुद्ध म्हणजे सत्य, एक, व्ययक्तिक न करणे, निरहेतू, आपुलकी भाव, परिवर्तन, स्थिर. ते आपोआप जाणीव ठेऊन होत राहील, शुद्धतेची चिंता नसावी. जे काही प्रारब्ध येऊ पाहील, ते स्वीकारावे शांतीने. प्रारब्ध, परिस्थि, परिणाम, संबंध, रूप - हे भगवत इच्छेने येत राहते, ते ओळखावे आणि शांती भाव मनात संक्रांत होऊ देणे.
शांत होऊन काहीही बिघडत नाही, काहीही निघून जात नाही, काहीही हरवत नाही, काहीही कमी किंव्हा जास्त होत नाही. ते असण्याचा नैसर्गिक टप्पा मानावा, म्हणून हे भोग असतात योग्य _परिवर्तन_ होण्यासाठी.
हरि ओम.
श्री
श्री
गोष्टी _आठवणे_ ही क्रिया आहे, साखळी दर्शवते, हेतू सिद्ध करते. तसंच, गोष्टींच्या _करण्या_ बद्दल आपण बोलू शकतो. जो काही हेतू असावा, जो आतून प्रकट होतो, त्यातून संबंध, परिस्थिती, बदल, भाव, गोष्टींचे वावरणे सिद्ध होते किंव्हा स्थित होते. हेतूवर सर्व आधारित आहे. म्हणजे हेतू एक प्रकारे कार्य दर्शवते - हेतू राहणार. त्यातून साखळी, चक्र, परिणाम, प्रारब्ध अशा गोष्टी स्थित होणार. आणि त्यामुळे विचार चक्र आणि भावना चक्र.
ह्याचा असा ही अर्थ निघतो की चक्र _स्थित_ असतेच, आणि जे काही स्थित असते, ते दैवी उद्भवत असते...म्हणजे त्या माध्यमाच्या असण्यामुळे हे कार्य _प्रकट होत राहते._ ते आपल्या अगोदर असणार आहे आणि नंतरही...म्हणजे आपण एक प्रवाह आहोत, तात्पुरते आहोत, निर्माण झाले आहोत आणि अशी एक अफाट शक्ती स्थित आहे, जिच्या कार्यामुळे आपण "इथे" येतो...
वावर असणे, _स्थित_ असणे म्हणजे कार्याचे अनेक रूप असणे, नुसते बसणे होत नाही! किंबहुना _फुकट_ असा क्षण नसावा. प्रवाह चालतोच... आणि त्या बरोबर प्रवाहाचे सर्व गुण धर्म आलेच.
माझे असणे किंव्हा होणे, हे हेतू पूर्वक नसते, ते _होते_. त्या दृष्टीने सर्व जग असतेच. त्याला हेतू नसतो, तो दैवी इच्छेचा भाग आहे. म्हणजे जग होणे, हे कार्य असणारच किंव्हा होणारच. ज्या भावनेतून जग होते, ते *शांत* असतो. शांती भावनेतून हे सर्व कार्य घडत किंव्हा स्थित होत. म्हणून शांती भावाची देखील क्रिया असते!...
हरि ओम
श्री
मतभेद होणार. कुठलीही गोष्ट होणार. विचार नको, संबंध नको, भावना नको, त्यांचे परिणाम नको, प्रश्न नको, असे म्हणून चालत नाही. "नको" अशी संभावना अस्तित्वात नाही. अस्तित्व शांत तरी असते किंवा दृश्य तरी - कुठल्यातरी स्थितीत आपण स्थित असतो. म्हणजे दृश्यातून पुढे जाण्याचा मार्ग म्हणजे शांती भाव आत्मसात करावं. मागचं मला काही ठाऊक नाही, ते माझ्या ध्यानी येत नाही, पण त्याचे परिणाम होत असणार. पण पुढचा टप्पा म्हणजे शांत होणे, हा आहे. त्यासाठी विचारांच्या आणि भावनेच्या मर्यादेतून शांत भाव आत्मसात करायला लागते. आपल्यासाठी *मन*, हाच मार्ग आहे शांती अनुभवण्याचा.
म्हणून सर्व काही मन, जे दाखवते, ज्यात गुंतून राहते, जसे व्यवहार करते, ते स्वीकारावे आणि दोष देऊ नये किंव्हा तसा विचार निर्माण होऊ देऊ नये.
मन म्हणजे आपण किंव्हा अस्तित्व नाही. मनाच्या स्वभावाला, निर्मितीला, धरून राहण्याची गरज नाही, त्यात गुंतून राहण्याची गरज नाही, विषय मांडण्याची किंव्हा कोडी सोडवण्याची गरज नाही. विषय कुणीही मांडू शकते, कोडी कुणीही सोडवू शकते, क्रिया कशीही होऊ शकते....त्यात विशेष ते काय?!!
शांत होण्यात कौशल्य आहे, कारण दररोजच्या प्रपंचात मनाचा तसा स्वभाव नसतो.
वरील गोष्टीतून असे स्थित होते, की भांडणाला घाबरू नये, तो टाळता येईल, असा अट्टाहास बाळगू नये. खंत बाळगू नये, जबाबदाऱ्यांचे ओझे करू नये. सांगितल्या प्रमाणे मनाच्या स्वभावाला धरून राहण्याची गरज नसते, त्यात तसे काहीही तथ्य नसते, ते खरे किंव्हा सत्य नसते.
म्हणून भगवंताचे सतत चिंतन करावे, म्हणजे सत्य काय आहे आणि ते कसे ओळखावे, हे जाणवेल.
हरि ओम.
श्री
सर्व गोष्टी आकारात नसतात आणि ते वेगळेपणाने बघता येत नाही, ते इंद्रियांना ओळखता येतीलच, असे काहीही नाही...तरीही त्याचा वावर मात्र असतो. दुसऱ्या अर्थाने ते भगवंताकडून स्थित असते, म्हणून प्रत्येक गोष्टीचे दैवी कार्य - कारण असते. म्हणून सर्व गोष्टींचे सरळ उत्तर नसते, ते गूढ असते. ते सैय्यमाने स्वीकारायला लागते.
लोकं आपल्या पासून काहीतरी लपवतात, असे विचार करणे म्हणजे भ्रम आहे, समजूत केली गेली आहे. ती सत्य नाही. सत्य ओळखण्यासाठी, मन शांत करायला हवे. काहीतरी दृश्य येणे, तसा स्वभाव होणे, निघून जाणे, अदृश्य होणे, स्तर असणे - ह्या गोष्टींचा वावर राहणार. त्यामुळे लोकांचे स्वभाव होतात, व्यवहार होतो, आपुलकी होते, दुरावा होतो, दुःख होतं, भोग येतात, निर्णय घ्यायला लागतो, कर्तव्य करायला लागतं वगैरे.
कुणी काहीही लपवत नाही, कारण लपवायला जागाच नसते! वेगळेपण किंव्हा तात्पुरतेपण, ही निर्माण झालेली स्थिती आहे. ते एक स्थितीच दर्शन आहे. ते *खरे नाही.*
हरि ओम
श्री
जीवाचे अनुभव हे स्थित असते अस्तित्वात. म्हणजे त्या अनुभवातून, त्या परिणामातून, त्या "मी" स्वरूपातून आपल्याला जायला लागते, त्यात पळवाट नाही. त्या प्रवासात अनुभवाचे रूप कसेही असेल, ते भगवंताच्या कार्यातून निर्माण होते, हे ध्यानात ठेवणे.
त्यासाठी नाम घेत राहावे. ती त्याची आठवण आहे कुठल्याही स्थितीत प्रज्वलित ठेवण्याची. भगवंताचे नाम कार्य करते मन परिवर्तन करण्याचे. नाम हे भगवंताशी *संबंध* जोडत राहते. ते करत राहावे.
परिवर्तन कसे होते आणि शुद्धता कशी येते अनुभवास, ह्याचा विचार खूप करू नये. ती होते. परिवर्तन काळाने येईल, त्वरीत येणे कठीण. पण येईल, हे नक्की, कारण तो भगवंताशी एकरूप होण्याचा नैसर्गिक गुण आहे. एकरूप होण्यास परिस्थिती, प्रसंग, प्रारब्ध, भोग काहीही येऊ शकतील...त्यातून श्रद्धा डळमळीत होऊ देऊ नये. कर्तव्य करावे. त्याचा अर्थ स्वतःच्या बायकोला देखील सांगता येईल असे नाही. आपण स्वस्थ रहावे. स्वस्थ म्हणजे श्रद्धा ठेवणे कार्यावर.
नाम म्हणजे मुख्य ध्येयाची आठवण कुठल्याही परिस्थितीत. परिस्थिती म्हणजे विचारांचे सैरबैर धावणे आणि खूप विषय निर्माण करत, अहं वृत्ती मिसळून, त्यात गुंतून राहणे. ही स्मरण आहे, ज्यामुळे मुख्य ध्येयाचा विसर पडतो. आपण इथे कशासाठी आलो आहे, हे विसरतो आणि क्रियेत स्वार्थीपणाने गुंतून राहतो.
तसे होऊ नये, स्थिर होण्यासाठी, नामस्मरण करत राहावे.
हरि ओम.
श्री
कुठल्याही क्षणात खूप सारे क्रिया आतून घडत असतात किंव्हा स्थित असतात. त्यामुळे संबंधांचा वावर सूक्ष्म स्थिती ते स्थूल स्थिती पर्यंत होतो....हे समजून घेण्यासाठी वापरलेले शब्द. अनुभव गूढच असतो. म्हणून आपल्याला काहीही वाटो, आत अनंत प्रवाह, वृत्ती सुरू असतात आणि त्यांचा परिणाम होत असतो.
ते सर्व शांत होण्यासाठी, नाम सतत घेत रहावे. नाम खूप आत जाऊन, सारे क्रिया शांत करते, जाणीव शुद्ध करते. आत जात राहताना, बाहेरील परिस्थितीचा काहीही संबंध नसतो, म्हणून बाहेर काहीही चालू जरी राहिले, तरी नाम घेत राहावे.
हरि ओम.
श्री
क्षण सत्यात पहिले, तर भगवंत भाव आहे. त्याच्या व्यतिरिक्त पाहिले, तर आपला विचार काय सुचवतो, तसे दिसते.
I think I bother myself too much about authenticity and it's justification as if my worth depends on it. I think that history is where truth is, or philosophy is where truth is, or creation is where truth is, or feelings are where truth is, or responsibility is where truth is, or patience is where truth is....That's the problem or where I am stuck. All above answers are partly correct, for an alignment of all of them is a search I may be engaged in....that all above things would somehow dissolve or collapse to make a perfect realization. That experience of realization may not be linear or sequentially addressed.
I think worth (of self) is Existential truth and it *shouldn't be dependent* on any form of imagination. Imagination is always incomplete, changing, construct, situational, sequential, variable and so on. That is its _nature_, so why should the idea of worth be made dependent on imagination?!!
Worth म्हणजे खरं स्वतः सिद्ध असण्याची जाणीव. म्हणजे संपूर्ण अंतर्मुख असण्याची स्थिती आणि शांती भावना. स्वतः सिद्ध होण्यास स्पष्टीकरण नाही, दुसरा नाही, वेगळे नाही, तात्पुरते नाही, परावलंबन नाही, संबंधांचा प्रकार नाही, हेतू नाही, हालचाल नाही, परिणाम नाही.
प्रपंच हा स्वतः सिद्ध भाव आत्मसात करण्यासाठीचा *टप्पा* आहे. It is a pit stop and a journey to realization. As suggested above, it can happen at any moment but effort is required - which is how I may be pursuing at the moment. In this pursuit, justification of anything is *not* required at all. I am allowed to create thoughts in any manner. जसं सत्य स्वतः सिद्ध आहे, तसंच त्यातून आलेले विचारही स्वतः सिद्ध असतात...म्हणजे ते कार्य असल्यामुळे तैय्यार होऊ द्यावे आणि शंका घेऊ नये.
Relax. Things work out.
हरि ओम.
Saturday, October 25, 2025
श्री
श्री
गोष्टींचे होणे, संबंधात येणे, बदलणे, निघून जाणे, नवीन काहीतरी येत राहणे आणि त्यातून गहन भावना निर्माण होत राहणे - हे शांतीने घ्यायला लागते.
त्यात कर्तव्याचे भान जागृत ठेवायला लागते. स्थिर होणे शक्य आहे, तो भाव आत्मसात करणे शक्य आहे. त्या मार्गावर राहणे. कुठली परिस्थिती कशी होते, कोण काय बोलते आणि घडामोडी कशा होत राहतात, ह्याने आपली शांतता अवलंबून होता कामा नये. शांती भाव भगवत अस्तित्व भाव आहे, म्हणून तसे होणे आपल्याला शक्य का नाही?!
एका मर्यादे पलीकडे कोडी किंव्हा विषय बघणे सोडून द्यावे...त्याने काही हिताचे होत नसते. कोडी मानसिकता आहे, ते खरे नाही किंव्हा खोटेही नाहीत. ते निर्माण करतो आपण आणि त्यात गुंतून राहतो. म्हणून जे काही होते, ते भगवंताच्या कृपेमुळे होते, हे सदैव ध्यानात राहू द्यावे.
हरि ओम.
श्री
बोलण्याचे खूप सारे हेतू असतात लोकांचे. काहीना नुसती बडबड करायची असते, सल्ला ऐकून घ्यायला नको असतो. मी असा विचार करतो की समस्या कुणी मांडली माझ्या समोर, तर ती "आपण" तातडीने सोडवायला हवी, हा मीच केलेला भ्रम आहे. आपण शांत रहावे.
संवाद कोडी न सोडवता देखील होऊ शकतो. किंबहुना संवादाचा विस्तार कोड्यांपेक्षा खूप मोठा आणि सूक्ष्म आहे. शांत राहून ते कळते.
कुणी ओरडले, तर त्यात पूर्ण सत्य नसते. त्यातून आपण बिनडोक ठरत नाही किंव्हा काहीच ठरत नाही! कुणी का ओरडते, त्यात खूप गूढ कारण असेल, जे गनिमी काळापासून आत्ता ते एक रूपात आपल्या समोर व्यक्त होत असेल. म्हणजे कुठल्याही भावनेला "प्रवाह" मानावा, म्हणून ते नुसते बघावे.
परिस्थितीमुळे खूप भावना व्यक्त करायच्या वाटत राहतात काही जणांना. भावना मांडू नये किंव्हा व्यक्त करू नये, अशी अपेक्षा करणे योग्य नाही. भावना येणारच. तो अस्तित्वाचा गुण आहे. ज्या व्यक्तीला इतरांचे भावना शांतीने ऐकून घेता येतात, तो महान आहे. भावना म्हणजे पूर्ण सत्य नाही...ती एक निर्मिती आहे स्थळ आणि काळाची. त्या प्रमाणेच सगळं असायला हवे, असे काहीही नाही.
स्वतः काम करताना हेतूने बघू नये. आपण शांतीने काम करत राहावे.
हरि ओम.
Friday, October 24, 2025
श्री
श्री
अस्तित्व आणि त्याचे परिणाम हा आपल्यासाठी एकच महत्त्वाचा विषय आहे. जो पर्यंत ते सत्य (संबंध आणि कार्य) जाणिवेला उलगडत नाही, तो पर्यंत मन आणि तिच्यातील विचार आणि भावना चक्र प्रज्वलित राहतील. कार्याचा परिणाम गूढ आहे, तो वृत्ती निर्माण करतो आणि प्रकार वृत्तीतून सुरू होऊन अनेक स्तर ओलांडून शेवटी देहात प्रकट होतो. _प्रकट_ हा अर्थ इथे _स्मरण_, असा ही वापरू शकतो.
क्रियेतून स्मरण होते, जे होणारच. स्मरणातून अनुभवाचे स्वरूप जाणिवेत येते. आपण त्याच्या मार्गे, वरील क्रिया प्रमाण मानून परत त्याच्या पलीकडे जाऊन स्थिर होऊ शकतो.
वरील क्रियेला तसा काही हेतू नाही. म्हणून त्याला कार्य म्हणायचे. निर्मिती होणे हा त्या कार्याचा एक परिणाम. प्रपंचात आपण हेतुला धरून असतो, म्हणून कार्याचा भाव मनात नसतो व्यवहार करत असताना. हेतू व्ययक्तिक आहे, कार्य भगवत स्वरूप आहे. हेतुला परिस्थिती आणि विचार लागतात, कार्याला दोघांचीही जरूरी नसते. हेतू वरून वेगळेपण किंव्हा तात्पुरतेपण प्रज्वलित राहते, कार्यामुळे अशा भावना प्रकट होत नाही. हेतूमुळे सर्व विश्व स्थूल भासते, कार्यामुळे सर्व विश्व सूक्ष्म असते.
कार्याचा अनुभव मनात संक्रांत होण्यासाठी किंव्हा मन कार्याचे रूप घेण्यासाठी, आपण कर्तव्य करत राहावे, चिंतन करत राहावे, नामस्मरण करत राहावे, श्रद्धा वाढवत रहावे - असा मार्ग सुचविला आहे.
हरि ओम.
श्री
प्रपंच, ह्या अनुभवाला आपण पकडून असतो. जस अस्तित्व गूढ आहे, तसे पकडून राहण्याचा गुण खूप खोलवरून उमटत राहतो, म्हणून त्याचा ठाम पत्ता कळायला प्रयास लागतात.
स्वतःला ह्या वरील प्रकारामुळे दोष देऊ नये. प्रपंच, हा अनुभव मनात संक्रांत होणारच. किंबहुना "मन" ही वस्तू असणारच. त्यातून मार्ग आखून मनाला भगवत स्वरूप करायचे आहे. हा मार्ग देखील सरळ रेषा सारखा असेल, असे नाही. तो कसा होईल, कधी होईल, केव्हा होईल, कसा परिणाम होईल - हे सर्व प्रश्न भगवंतावर सोपवावे. प्रपंचातून पलीकडे होण्यासाठी सध्या आपल्याकडे जे महत्वाच्या गोष्टी आहेत, ते म्हणजे - कर्तव्य, प्रयत्न, प्रयास, श्रद्धा, चिंतन.
हरि ओम.
श्री
श्री
आपण जो प्रपंच _अनुभवतो_, त्याला अनेक स्तर, चक्र, स्थिती, बाजू असतात. सर्वांचे कार्य चालू असते आणि त्यातून तसा अनुभव स्थित होतो. जसे आपले त्या कार्याशी संबंध असतात, तशी आपली भूमिका असते प्रपंचात आणि तसा परिणाम होत राहतो आपल्यावर. कार्याचे घटक आणि अहं भाव (मी) हे खूप गुंतले असतात, म्हणून त्याला _निरहेतू_ पद्धतीने बघणे, ह्याला प्रयत्न लागतात. ते फक्त बुद्धीच्या भाषेत मर्यादित नसते. म्हणजे बुद्धीने समजून घ्यावे, पण त्याच्या व्यतिरिक्त इतर घटकांच्या माध्यमातून देखील जाणून घ्यावे लागते.
जाणून घेणे ही क्रिया परत फक्त मुद्दामून नसावी. त्यात निष्ठा, श्रद्धा, कृपा हे भाव लागतात जाणून घेण्यात. थोडक्यात "आपोआप" होण्यामध्ये श्रद्धा ठेवावी.
ह्याचा लहानसा घटक म्हणजे कुठल्या गोष्टी आपण लक्षात ठेवतो आणि कुठल्या गोष्टी नगण्य वाटू शकतात. हे ज्याने त्याने बघावे. गोष्टींचा संबंध आपण कसा लावतो, त्यातून स्मरण आणि लक्षात राहणे क्रिया प्रकट होते. तरीही हे प्रकरण गूढ आहे. म्हणजे गोष्टींवरून दुसऱ्याला लेखू नये. प्रत्येक जीव त्याच्या प्रवासात असतो, म्हणून परिवर्तनाचे स्वरूप प्रत्येकास वेगळे असते आणि एकमेकांवर बुद्धीने पूर्णपणे अवलंबून नसते. हे एकदा मान्य केले, की श्रद्धेने सैय्यम ठेवावा. त्रास करून घेऊ नये. त्याची गरज नसते.
हरि ओम.
श्री
अस्तित्वात सर्व गोष्टी *राहणार* - म्हणजे बदल, स्तर, साखळी, भाव, स्मरण, संबंध, क्रिया, विचार, भावना, संकल्पना, प्रश्न वगैरे. ह्याचा वावर सदैव अनुभवात होत राहणार. होणे, रूप घेणे, तात्पुरते वाटत राहणे, स्थिरावण्याचा मार्ग पत्करणे, सत्य ओळखणे हे होणार. काही लोकांनी त्याला _विधिलिखित_ म्हणलं आहे, म्हणजे *कार्य* दैवी उद्भवत आहे, म्हणून त्यातून सर्व काही दैवी इच्छा किंव्हा संकल्पना मानावी...तशी ती असतेच.
वरील गोष्टीतून आपल्यासाठी दोन संकल्पना प्रत्ययास येतात - कर्तव्य आणि कार्य.
कार्य दैवी उद्भवत असल्यामुळे, त्याला अमुक एक कारण नसते स्थित होण्यास. तसे सारे घटक स्वीकारावे लागते. होण्यास आणि असण्यास गूढ भाव आहे, म्हणून खूप चिकित्सेत पडण्यात विशेष उपयोगाचे ठरत नसावे. जे आहे, ते आहे. जसे आहे, तसे आहे.
व्यवहारात हेतूच्या पलीकडे वृत्ती स्थिरावली, की कर्तव्य उदयास येते. कर्तव्य, ह्याच्या सर्व घटकांचा पलीकडे संबंध असतो, म्हणून त्याला महत्व आहे. तोच कर्तव्यशील असू शकतो ज्याचे मन अत्यंत स्थिर झाले असते.
जर आपला भाव स्थिर होऊ शकला, तर त्याला कशाचीही लागण होणार नाही.
हरि ओम.
Thursday, October 23, 2025
श्री
श्री
वास्तव्य जाणवणे "इथे", हा अतिशय महत्त्वाचा भाव असतो. Learning to Dwell...(Heidegger).
आपण जरी "होतो", तरीही मूळ स्वभाव स्थायी असतो - इथेच असतो.
मनाचा एक स्वभाव वळवळ करण्याचा आहे, म्हणजे विघटित क्रियेत गुंतून राहण्याचा आहे. त्यामुळे त्या क्रियेचा _परिणाम_, म्हणजे वेगळेपण आणि तात्पुरतेपण आणि अस्थिर भावना, ह्याला सामोरे जाणे भाग पडते. त्यावरून असंख्य रूपे , आकार दृष्टीस येतात, हालचाली भासतात, बदल जाणवतात, परावलंबी प्रतिक्रिया देत राहतो आपण आणि बेचैनी वाटत राहते. असा प्रकार तर आणखीनच AI मुळे किंव्हा virtual environment मध्ये अधिक प्रखर होताना दिसत आहे....वेगवान, त्वरित, व्यक्तित्व/ खाजगी, संबंध तोडणे, सत्याचे भान हरवणे, आपुलकी संपुष्टात येणे, वगैरे असे काही "अवगुण" अंगी आत्मसात करताना दिसत आहेत.
ह्याची रेष जर आपण मागे वळून बघितली इतिहासात, तर असे दिसून येईल की कुठल्या ना कुठल्यातरी स्वरूपात असा स्वभाव मनात असायचाच. आणि तीच रेष जर स्वतःचा आत डोकावून पाहिली, तर खूप आतील वृत्ती पर्यंत तो भाव प्रज्वलित होताना दिसेल. ह्याचा अर्थ की आपण त्या वृत्तीला "धरून" राहिलेलो आहोत, मग सुधारणा ती कसली?!!
त्याच पद्धतीने, ह्या वृत्तीला शांत करण्याची विवेक बुद्धी देखील आपल्या आत आणि इतिहासात कायम दिसून येते. संस्कृती, पर्यावरण, सामूहिकता, सहानुभूती, सैय्यम, आपुलकी, समाज भान...असे त्यात संकल्पना दिसून येतात आणि त्यावरून कृती, कलाकृती, नात्यांचे स्वरूप, समाज व्यवस्था असे ही रेखाटन केले गेलेले दिसते त्या त्या काळात.
वरील दोन्ही गोष्टी आपल्या आत वावरत असतात. आपण होणे म्हणजे विघटन क्रियेला प्राधान्य देणे. भगवंताची आठवण होणे आणि तो मार्ग पत्करणे किंव्हा कर्तव्य करत राहणे, म्हणजे श्रद्धेला आणि शांती भावाला प्राधान्य देणे. त्यातील एक सत्याचा मार्ग आहे, आणि दुसरा कष्टी होण्याचा.
तसंच, सध्याचा आपले प्रपंचाचे स्वरूप किंव्हा भाव काय उमटतो आहे त्याकडे बघावे. बऱ्याच गोष्टी निसटून जातील, त्यावर आपण काहीही करू शकणार नाही, बऱ्याच गोष्टींचे झीज होण्याला आपल्याला बघत राहायला लागणार आहे, बऱ्याच गोष्टींचे भोग इतरांना आणि आपल्यालाही सामोरे जायला लागणार आहे, बऱ्याच गोष्टींवरून *तरीही* उतावळे होता कामा नये, बऱ्याच गोष्टींसाठी नाईलाज आपला असतो. बऱ्याच गोष्टी सोडून द्यायला लागतात आपुलकीने. बऱ्याच गोष्टी येऊ द्यायला लागतात, वावरू द्यायला लागतात आणि निघून द्यायला लागतात.
असे सारे शांतीने आत्मसात करायला लागते. एका अर्थी चांगलच आहे की आपल्याला पर्याय नसतो, त्या अंतिम सत्याचा. त्यावरूनच सत्य आत्मसात होते, असे दिसत आहे.
Acceptance of vulnerability is the biggest strength. Admittance of the same, is being very honest or truthful.
हरि ओम.
श्री
श्री
एक महत्त्वाचा प्रश्न असा असतो की आतील कार्याचे माध्यमाचे अस्तित्व, त्याचा परिणाम, स्थान, *स्वभाव*, गुण, हेतूचे _स्वीकार आपण दृश्यात_ *कसे समजून घ्यावे*?.... तो समजून घेण्याचा प्रकार आहे की स्वीकार करण्याचा की आत्मसात करण्याचा??...
मानवी जीवनात ह्या माध्यमाचे स्थान कसे स्वीकारावे? त्या माध्यमाचे अस्तित्व कसे *जाणून* घेणे?
मला वाटतं की जाणून घेण्याची क्रिया फक्त मनुष्य करू शकतो, म्हणून त्याच्यात परिवर्तन होऊन तो शुद्ध होऊ शकतो. हे तोच ठरवून करू शकतो.
शांत अस्तित्व सगळ्या रूपांच्या पलीकडे आहे. ते आत्मसात करण्यासाठी अंतर्मुख होणे आले आणि तो मार्ग पत्करण्यासाठी आपल्या मनात तो तीव्र प्रश्न निर्माण होणे गरजेचे आहे. आपण सगळ्या स्थितीत, क्रियेत, स्मरणात, साखळीत, स्तरात, भावनेत *परिवर्तन* आणु शकतो. परिवर्तन होण्यासाठी परिस्थितीची जरूरी असते, असे काहीही नाही, नाहीकी बुद्धीची की भावनांची. अर्थात त्याच भाषेतून पलीकडे होणे आले. म्हणजे *प्रपंच हा मार्ग* समजावा, जबाबदारी नाही, की स्पष्टीकरण नाही, की सिद्ध होणे नाही, की हेतू ठेवून व्यवहार करणे असे नाही, की मान्यतासाठी नाही.
प्रपंच हा एक प्रकारे time pass प्रकार असू शकतो. फुकट वेळ घालवण्याचे रसायन! बडबडीला, स्पष्टीकरणेला सीमा नाही, आणि त्यातच आपण आपले हित मानून घेतो, ह्याला अक्षरशः काय म्हणावे?!!
असो, आपण कर्तव्य करावे आणि शुद्ध माध्यमाचे चिंतन करत राहावे.
हरि ओम
Monday, October 20, 2025
श्री
श्री
खऱ्याचा आणि कृत्रिम संकल्पनेचा स्वभाव असतो. त्या प्रमाणे *मानण्यावर* त्या संकल्पनेची क्रिया होते, त्याची साखळी होते, भाव होतो आणि हालचाली होतात आणि परिणाम होतात. मनाच्या धरण्यावर, हालचालींवर, एखादी संकल्पना पूर्णपणे आत्मसात केली जाते आणि त्याप्रमाणे मनावर संस्कार होत राहतात...
१) कृत्रिम स्थळ आणि काळ , किंव्हा virtual environment, त्याचा एक स्वभाव असतो. त्यात गुंतून राहिल्यामुळे तोच स्वभाव आपले मन धारण करते आणि तश्याच समजुती, संकल्पना, विचार, भावना घडतात आणि त्या प्रमाणे इतरांशी आपण व्यवहार करतो.
२) ज्या स्थळात आणि काळात आपण वावर करतो, (real space and time), त्याचाही _स्वभाव_ असतो आणि त्यावरून स्मरण आणि व्यवहार होते इतरांशी.
(१) आणि (२) हे भिन्न गोष्टी आहेत. मूळ प्रश्न असा आहे की नुसती पिढी बदलत नाही, तर त्या पिढींची मूलतः भाषा (१) का (२) ह्यातून त्यांचा व्यवहार होत आहे आणि म्हणून दोन पिढींच्या संवादाना अधिक _प्रश्न_ उद्भवणार आहेत.
प्रश्न कोडे असतात का? हा आणखीन आध्यात्मिक प्रश्न झाला. प्रश्न कशावर अवलंबून असतात का आणि कशासाठी?! मग मूळ प्रकार काय असतो? कदाचित आध्यात्मिक मार्गातून वरील समस्यावर प्रकाश टाकला जाऊ शकतो.
तसे पाहिले की "मी" ह्या संकल्पनेतून खूप साऱ्या क्रिया आणि अपेक्षांचे डोंगर रचले जातात. त्यातून जे काही चक्र आणि परिणाम होतात, त्याने पदरी कष्ट होतात. मग मूळ प्रश्न "मी" ह्या संकल्पनेवर, जाणिवेवर येतो. ती जाणीव शुद्ध केली तर अनुभव कसा असावा?!
करून बघावे!
हरि ओम.
श्री
श्री
चक्राचे रूप पुढे काय होते ह्याची चिंता करू नये. आपण प्रतिक्रिया त्यावरून ठरवतो म्हणून मन कशालातरी धरून राहत. ते सोडण्याचा अभ्यास करावा, म्हणजेच हेतू (ज्यात स्थळ, काळ, क्रिया, स्मरण) अशा गोष्टीतून प्रकार होते किंव्हा अस्तित्वात रंग मिसळते, तो हेतू शुद्ध करावा आणि ह्या सर्व परावलंबी गोष्टीच्या पलीकडे स्थित करावा.
थोडक्यात हेतुला कार्याचे स्वरूप द्यावे.
हरि ओम.
Shree
Shree
Fragmentation is one of the dimensions of the mind. As is synthesis and realization of a cosmic connection.
The force of fragmentation has reduced man and environment to a production idea and with it efficiency, evaluation, justification, performance, output, and so on.
Things happen or come from apriori existence and they become us and continue into other states. However, modern experience of speed has cut off the sense of apriori or continuity and sharply focussed the attention span on the particle. We see the world as a quantum field and by doing so, invite a lot of hyper stress or anxiety.
This means that zooming in onto a particle or zooming out onto a flow also invites _corresponding feelings_ of being in this world of forms. Feelings correspond to a "scale" of existence. And scale is a connection, inside to outside, self and all others. Everything comes in the idea of scale.
Therefore experience of scale, proportion and movement is Existential too apart from an architectural inquiry.
Hari Om.
Saturday, October 18, 2025
श्री
श्री
वरील लेखाचे काही आणखीन विचार...
कार्य आपल्यावर सतत होत असतं, आपल्या अगोदर, आपण असताना आणि नंतरही. कार्य सगळ्या स्तरात स्थित असतं, म्हणून त्याने अनुभव, स्मरण, संबंध आणि परिणामांचे स्थान स्थित राहणार. कार्य साखळी असते, म्हणून सर्व स्थिती कार्यकारण संबंधांच्या धाग्यात ओवाळता येतात. प्रत्येक स्थिती कार्याचा स्वभाव बदलतो आणि इतर कार्याच्या रूपावर आधारलेला असतो.
थोडक्यात मूळ कार्य भगवंताचे असते आणि त्यातून सर्व काही प्रज्वलित होते. सूर्याचे किरण हजारो ठिकाणी पसरून अनंत वस्तू त्याचे, त्याचे व्यवहार (हालचाली, मर्यादा, संबंध, स्मरण) करतात, त्या प्रमाणे काहीसे हे घडते.
म्हणून आपल्या जीवनाचा सूत्रधार भगवंत शक्ती आहे, हे ध्यानात कायम ठेवावे.
त्या शक्तीचा परिणाम जाणवणे, म्हणजे योग्य परिवर्तन स्वतः मध्ये घडणे, वृत्ती शिथिल होणे, राग न धरणे, हळुवारपणा येणे, आटापिटा न करणे, श्रद्धा वाढलेली दिसणे,अंतर्मुख होणे, प्रश्न गळून जाणे, विषयात न गुंतले, सर्व स्वीकार करणे, हेतू कशाचाही न शोधणे, आपुलकीचे नाते प्रज्वलित होणे, वगैरे.
आपण शांत मनाने घडामोडी, आतील आणि बाहेरील, नुसते बघा. त्यात कार्य होताना दिसते.
हरि ओम.
Shree
Shree
Liberation is a misguided concept if equated to escaping from conditions or a context. That's the track probably "progress" of mind has taken in the materialistic world.
Styles, compulsion to change, production, multi tasking, consumption, excessive surveillance....all seem to convey the same trajectory. The latest lens of deploying AI or engagement with virtual reality (latest form of technology) is also another idea of liberation from struggles or dilemmas. It might not be so promising, but who is considering this question?!
We perhaps need to accept that, we don't come here to solve a problem or fix a thing...we aren't saviours or Gods who can uplift lesser mortals or be some rock support system for anybody or anything.
This thought perhaps is humbling and admitting the shere amount of *vulnerability* of a body is not a sign of weakness, but requires great courage and awareness. We are vulnerable, one need not feel anything ashamed of it. It is in fact natural to feel so and why should even one try to hide it?!!
It is obvious how the world becomes and changes but we have a hard time accepting it! Vulnerability may come as ignorance, defence, attack, violence, ridiculing, labeling, justifying, controlling, business and so on.
One should realize how these tendencies happen and how one accepts such tendencies. Acceptance is a journey and not a maggie noodle action. Action is a journey.
Hari Om.
श्री
श्री
अनुभव होत राहणे आहे. ते का संक्रांत होतात, कसे होतात, कधी होतात, त्यांच्या पुढे आणि मागे काय असते, ते कुठे कुठे गुंतले असते, हे पूर्ण भगवंतावर सोपवावे. जसा भगवंत हा खरा आहे, त्याचा अनुभव कोरा असतो प्रत्येकाला, तसंच दृश्याशी संबंध आणि परिणाम प्रत्येकाशी कोरा असतो, म्हणून मार्गही *शांत होण्याचा कोरा** असला हवा, म्हणजे दुसऱ्यांना स्पष्टीकरण देण्याची _गरज_ तशी महत्त्वाची ठरू नये. उलट, ती गरज मावळला महत्वाचे आहे.
आपण काय काम करतो, कसे करतो, काय संपादन करतो, कसे विघटन करतो, कसा काळ अनुभवतो, कसे हालचाली करतो, कसे कप्पे निर्माण होतात, कशी प्रक्रिया जाणवते इतरांची, एकटे का वाटते, त्यात इतरांचा हातभार असतो की नाही, तीच जागा मिळत असते का ती बदलत राहते, ते वस्तू आणि व्यक्ती असतात की बदलत राहतात, हे गूढ आहे....सरळ रेषे सारखे असते की नाही ह्याची चिंता करू नये. शांती अनुभवणे आहे, मग तो *मार्ग* कसाही प्रकट होऊ देवो.
हरि ओम.
श्री
श्री
*अस्तित्वात वावरणे* ही विलक्षण गोष्ट आहे. तिला स्वीकारण्यात काळ जातो. स्वीकारणे ही देखील मोठ्ठी क्रिया असावी, प्रवास असतो, मार्गाचा शोध असतो, अनुभव असतो, भाव असतो, द्वैताचे स्तर असतात, साखळी असते, अंतर्मुख होणे असते, *कार्य* समजून घेणे असते, चिंतन करणे असते, माफ करणे असते, शंका घेणे असते, श्रद्धा घेणे असते, भोग अनुभवणे असते, शांत राहणे असते, परिस्थितीचा अर्थ ओळखणे असते, टप्पा असतो, प्रमाण असते.
आपण, ही संकल्पना काय आहे, हे ओळखणे आले. मी काय, तुम्ही काय, नाती काय, आपले कोण, वगैरे हे अनुभव संक्रांत होतात स्मरणात, त्यांचे परिणाम होतात मनात, तसे क्रिया आपण करत राहतो आणि परिणामांना सामोरे जायला लागतं. हे चक्र आहे. मुळात चक्राचा सूत्रधार कोण आहे, ही क्रिया का होते, हे कार्य का असते, ह्याचा शोध हा मार्ग दाखवतो.
आज एक आहे, तर उद्या दुसर काही. परिस्थिती सतत बदलत राहते, तर धरण्याची प्रवृत्ती का असते?!
धरणे ही क्रिया का प्रकट होते, काय होते आणि त्यात परिवर्तन कसे होते? हेच अस्तित्वाचे स्तर, की धरल्यामुळे (ह्या गुणामुळे) *प्रकट होणे* होणार आणि *विलीन होणे* हे ही होणार. *दोन्ही गोष्टी एकाच अस्तित्व* गुणातून होत राहतात, म्हणून अस्तित्व कायम असले पाहिजे. जे कायम असते, त्या अनुभवाला "सत्य" असे संबोधित केले गेले आहे.
बऱ्याच वेळेला हा प्रश्न असा असू शकतो, की वरील गोष्टी कळल्यामुळे त्याचा "उपयोग" व्यवहारात तातडीने करता येईल का - साखळीमुळे निर्माण होत असलेले *कोडी* सोडवण्यासाठी?! एका अर्थी हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याचे उत्तर म्हणजे *शोध*. उपयोग होत असावा, पण गूढ पद्धतीने व्हावा, म्हणजे भगवंत ठरवेल. हा प्रश्न स्वतःसाठीचा आहे, तो जाणून घेण्याचा आहे. हरिपाठ - "तळ हातावरील आवळा ठेवण्यासारखा" भगवंताचा अनुभव असतो.
कुणावर काही परिस्थिती येईल, प्रारब्ध कसे असावे, हालचाली कशा होतील, हे शांतीने जाणून घ्यावे. हेतू शोधू नये, त्याचा उपयोग होत नाही आणि उगाचच बेचैनी प्रज्वलित राहते. इथे हेतू म्हणजे भगवंताची जाणीव खूप पुसत ठेवून व्यवहार करणे. जाणीव कशी शुद्ध होते, तसा व्ययक्तिक हेतू अर्थातच मावळतो. ते मावळला, की सुख किंव्हा दुःखाचे हालचाली, परिस्थितींचा परिणाम हे सर्व मनातील चिकटलेले अनुभव गळून पडतात.
नामात रहाण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू ठेवणे.
हरि ओम.
Monday, October 13, 2025
श्री
श्री
प्रपंचाचे अनुभव प्रवाह सारखे येत असतात. म्हणजे गोष्टी येणे, वावरणे, विलीन होणे हे स्थित असते. त्याच क्रियेत आपलेही एका पद्धतीचे, त्या परिस्थितीशी एकरूप होत, हालचाली अनुभवात येतात आणि "मी" ह्या भावनेची जाणीव प्रज्वलित राहते. मी देह पुरता मर्यादित नसून, विशाल आणि सूक्ष्म असतो आणि बऱ्याच *स्थितींशी संबंधित* असतो आणि *त्याच्या कार्यामुळे प्रकट झालो असतो*.
म्हणून येणारे अनुभव अस्तित्वातील अनेक स्तरांच्या कार्यामुळे प्रकट होत असतात आणि बदलत असतात. आपले कार्य हे, की ते दिव्य कार्य ओळखावे, ध्यानात आणावे.
काहीतरी कृती करणे भाग आहे आपल्याला आणि चक्र अनुभवात येत राहणे, हे ही आहे अनुभवात. कृतीशी आपले नाते शुद्ध करत राहावे आणि त्यासाठी नामाचा उच्चार सतत करत राहावे. अनुभवाच्या हेतूची चिकित्सा करू नये, त्याने व्याकुळ होऊ नये, अनुभवांचे प्रयोजन अडवू नये, त्यात स्वार्थी हेतू मिसळू नये. *अनुभव दैवी कार्यातून उद्भवते.*
हरि ओम.
श्री
पूर्णत्व कोडी किंव्हा विषयातून येत असते का? सर्व प्रवाह असतो आणि आपण सागरच्या मध्य भागे असतो, जिथे रूपातून किनारा दिसणे कठीण. किनारा दृश्य असेल का? दृश्यात कुठलीही गोष्ट स्थिर नसल्यामुळे त्याचा आधार मिळणे कठीण आणि ते जरी आले, तरी एक दिवस जाणार. म्हणून किनारा दृश्यात दिसला, तरीही त्याचे परिवर्तन दुसऱ्या कशातरी रूपात होणार आणि प्रकरण बदलत राहणार.
म्हणून येणे आणि जाणे, ह्या हालचालींना अर्थ आपल्या सिद्ध होण्याशी *जोडू नये*. तशी जाणीव होण्यासाठी हालचालींच्या परिस्थितीत नामाची सतत आठवण करत राहावी.
हरि ओम.
Shree
Shree: Conversations with Gauri – 14.10.25
There is a cyclic association with an idea till it rolls over into something else and the cycle repeats as a momentum. Take invention of any action, any concept, any tool, any product, any system. One starts with hypothesis, then fascination, then engagement, then realizing limitation, then criticality of the same idea and then inventing something else - maybe as a progress from the earlier idea itself.
Architecturally we had the modern movement of 1920 to 1940, then post war scenarios, global application of ideology, inputs of capitalism and commercial interests and the backlash to other movements. I think this is a human tendency - much said as an idea diagram of Yin and Yang and maybe even in other cultures as well. Therefore, the component of Newness has an aspect of Tradition (the loop completes) and the aspect of tradition has the seed of Newness to keep marching ahead.
Therefore, the consciousness has a loop and a line “together” and that is probably what Existence is. Both the line and the loop tendencies are at play at the same time and implicitly connected in the mind.
Therefore, there are inquiries of appropriate progress and at the same time of continuation and of universal or fundamental ‘Truths”. Both of such inquiries would exist at the same time and compliment one another.
Can we therefore see history and culture from that manner. And even environment and architecture?
Hari Om.
Saturday, October 11, 2025
श्री
श्री
वरील लेखात असे दिसून येते, की माझी स्वतः बद्दलची व्याख्या सूक्ष्म ते स्थूल ह्या संबंधांच्या स्पष्टीकरणावर अवलंबून केली जात आहे माझ्या कडून. ते संबंध *गूढ* असतात, हे _मला स्वीकारणे_ भाग आहे, बुद्धीने ते सांगणे कठीण. म्हणून बुद्धी अपुरी पडते, असे एक विधान प्रस्तुत होते मला, म्हणजे त्यावरून सर्व अर्थ अपूर्ण पडतात, असे दुसरे विधान होते.
ह्याचा अर्थ हा की गुढते ने होणारे संबंध आणि कार्यावर भरवसा वाढवणे, म्हणजे मी शांत होईन.
त्यासाठी मला चिंतन करण्याची गरज आहे. त्या गुढतेवर परिणाम कसा होईल, ते मला भगवंतावर सोपवावे लागेल... तो योग्य परिवर्तन आणेल!...
हरि ओम.
श्री
प्रत्येक क्षणाचा किंव्हा अनुभवाचा किंव्हा विचार धारा असण्याचा, वावरण्याचा आणि निर्णयाचा _स्पष्टीकरण_ देण्याची गरज असू नये.
हे सर्व घटक आणि इतरही वावरत असतील आणि संबंधात असतील. त्यातून एक संकल्पना किंव्हा भगवत इच्छा म्हणजे "मी" होतो. असे जर असले, तर त्या इच्छेपोटी जे काही माझ्या रुपात घडते, अनुभवात येते आणि दृश्याशी संपर्क साधले जाते, त्यात सर्व प्रथम त्याचीच इच्छा कार्य करत असते आणि त्यामुळे सारे अनुभव आपण संपादन करतो. मग स्पष्टीकरणाचा प्रश्न आलाच कुठे?!!
हे प्रकरण जरा विचित्र आहे. की आपण विषय किंव्हा स्पष्टीकरण देण्याला खूप मुल्य जोडत राहतो, पण त्याची जरूरी खरी नसतेच कधीही. मग ह्या संकल्पनेला का धरून असतो आपण? म्हणजे भगवत इच्छा आपल्या पचनी पडली नाही का?!!
हरि ओम.
श्री
कार्य आणि सर्व काही चालू असतं अस्तित्वात. त्या प्रमाणे, त्याच पद्धतीने आपण व्यवहार करावा, असे मानणे कितपत योग्य आहे? विघटन एक घटक असल्यामुळे, आपल्या मध्ये एक असा गुण असतो, जो शांती संक्रांत करून देऊ शकतो. त्याचे जतन करावे आणि त्या मार्गावर लागावे. भगवंत स्वतः अवतरून दृश्यात येतात, "माझ्या द्वारे प्रकट" होतात, मग साहजिकच त्यांच्या पर्यंत मी पोहोचू शकतो, विलीन होता येऊ शकतं!...
ओम शांती
ReplyForward |
