Wednesday, October 30, 2024

श्री

 श्री 


वस्तुस्थिती अशी आहे की मन खूप प्रकारे क्रियांना चिकटून राहते. जे दिसते ते कैक पटीने सूक्ष्म स्थितीत घडतं असते म्हणून गुंतून राहणे ही क्रिया खूप खोलवर चालू राहते. त्या प्रमाणे आपण भरलेले असतो. 

चिकटून राहणे, ह्यातून मोकळे व्हावे म्हणले तर त्यात प्रयास आहेत सर्वांगीण पद्धतीने. त्या क्रियेला अंतर्मुख होणे, शक्तीचे सूक्ष्म स्वरूप ओळखणे, प्रेम देणे, भक्ती करणे, स्वीकारणे, सैय्यम ठेवणे, श्रद्धा वाढवणे या सर्व गोष्टी येतात.

Things do exist in multitudes, diverse and "parallels" too. Parallel situations are a personal perception but created from the same source. Therefore never argue or fight any parallel or diverse or a fragmented scenario. To align everything through intellect is a limited proposition. A better realization is of acceptance of things as they appear, connect, and go - as an Action of vibrations.

This may be realised as God's Will or grace or from where we come or what is inherited and who is this "we" and where we seem to go. These vibrations are of God and they make up the whole of phenomena of multiverse. 

ज्ञानदेवांच्या शब्दात सांगायचे तर तर आपण (all sorts of phenomena) भगवंताच्या _घरी_ आहोत. जेव्हा ह्याचं आकलन होत, तेव्हा पूर्ण भाव जागृत होतो. 

म्हणून आत्ताचा क्षण तेवढाच महत्वाचं आहे. पुढे, मागे वगैरे हे स्वप्नातले गोष्टी समजाव्यात! मागून किंव्हा पुढून आपण घडतं नाही की ठरतं नाही. आपण कशानेही ठरतं नाही. ठरणे ही मर्यादित क्रिया आहे, निर्णय देणे तो परिस्थितीतून येतो. म्हणजे निर्णय क्षमता निर्माण होते. त्याला आपण चिकटून राहतो.

प्रगती ती की निर्णय देणे हा भाव " कार्य घडणे " असे आकलन व्हायला हवे. कार्य घडते कारण ती क्रिया म्हणून वावरतच असते. त्यात आपण प्रवाहाचा एक भाग आहोत. आपल्या हाती अनुभव येतात, घडतात आणि निघूनही जातात - हे विधिलिखित आहे. आणि त्या अनुभवातून प्रेम कुठूनही जागृत होऊ शकते - त्या भावनेला स्थळ आणि काळाच्या चौकटीत जकडू नये. म्हणजे खरे प्रेम किंव्हा शांती भाव हे सर्व शक्तींच्या पलीकडे आहे, सर्व क्रियांचा पलीकडे आहेत - म्हणजेच ते - आई वडील समजावे. 

प्रेमातून सर्व गोष्टी स्वीकारल्या जातील आणि ते शांत होतील. जग असेल की नाही, मी असीन की नाही ह्या प्रश्नाच्या फंदात पडू नये. भगवंत माध्यम सर्व ठीकच करेल. 

हरि ओम.

श्री

 श्री 


बुद्धीच्या पलीकडे व्हायला, म्हणजे श्रद्धा भाव निर्माण करायला प्रयत्न आणि कृपा दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. आपल्या जीवाच्या हातात प्रयत्न आहेत. तर तसे करावे आणि बुद्धी कसून वापरून, भगवंताला गोष्टीतून कळून घेणे. जर बुद्धीचा योग्य उपयोग करून घ्यायचा असेल, तर आपले इथे कार्य काय आहे, हे ओळखणे आणि तशी जाणीव करणे. 

वरील गोष्टी करत राहताना भगवंताची कृपा होण्यासाठी प्रार्थना करायलाच लागते. ते का, कारण आपण परावलंबी आहोत आणि खूप सूक्ष्म आणि खोलवरच्या प्रक्रियेतून आपण निर्माण होतो, बुद्धी चक्र चालू राहते आणि अनुभव येत राहतात. त्यासाठी पूर्ण श्रद्धा त्या शक्तीवर ठेवली तरच स्वतःचा स्वभाव _बाधत नाही._ म्हणजे दुसऱ्या शब्दात _स्वभावाचे भोग असतात._ बुद्धी, भावना, देह, इंद्रिये ह्यांचे परिणाम होतात. ते भगवताकडून आले आहेत आणि निघूनही जातील ही श्रद्धा बाळगावी.  सर्व प्रवाह आहे, शक्ती आहे, प्रकृती आहे, कार्य आहे. त्याला सुरुवात नाही, ना शेवट. त्याला हेतू नाही. म्हणजे ते राहणार/ असणार/ प्रचितीला येणार/ प्रकट होत राहणार. _प्रकट होणार_. 

ही क्रिया किंव्हा कार्य ओळखणे हे अध्यात्माचे ध्येय आहे. तरीही ध्येय हा फक्त बौद्धिक शब्द नाही - श्रद्धेचा आहे. Realization out of trust. 

नामस्मरण करणे आणि करत राहणे हीच क्रिया सर्वात मोलाची आहे. 

हरि ओम.




श्री 

आयुष्य ही भगवंताची कृपा आहे. तो ठेवील त्या परिस्थितीत, चक्रात, स्वभावात समाधानी राहणे. आयुष्य हे श्रद्धेने शांत होते, फक्त बुद्धीने नाही. 

जी काही बौद्धिक छटा जीवनात येऊ पाहत आहे, तिच्या आहारी पूर्ण जाऊ नये असे वाटते. बुद्धीचा स्वभाव असतो, आणि त्याला चिकटलो, तर तो तापदायक होऊ शकतो. बुद्धीची खूप सवय होणे ( _आदत से मजबूर_ किंव्हा force of habit) कितपत चित्ताला हितकारक आहे, हे स्वतःला विचारा! 

मग त्यातून योग्य वापर कसा करावा हे उमगतं जाईल. तो झाला आपला घडणारा प्रवास आणि भगवंताची कृपा.

हरि ओम.

श्री

 श्री 


शांत होणे ही स्थिती कायम असते आणि उपस्थित असतेच. ती आपल्या बरोबर असतेच. 

मन हे अस्तित्वाने निर्माण केले आहे, म्हणून ते कायम *क्रियेत* भरलेले असणार. क्रिया अनेक प्रकारच्या सामावलेले आहेत आणि ते सूक्ष्म वृत्ती पासून ते स्थूल आकार किंव्हा देह किंव्हा इंद्रिये असे प्रकट होत राहतात. मन हा शक्तीचा छोटा डोह आहे आणि म्हणून तिला एका प्रकारे क्रिया दिसून येते किंव्हा परिणाम पाडून घेते. With the changing "scales" of existence (which can be said as a context or a situation), the feelings and imagination of being changes too. It can be therefore said as a given scale implies a given imagination. This varies from tribal or indigenous world view to a modern world view. 

वरील गोष्टीतून असे दिसून येते की जेवढ आपलं मन सूक्ष्म होईल, तेवढ ते विशाल होत राहतं आणि अस्तित्वाची जाणीव बदलते. क्रिया चालू राहते कारण जाणीव असतेच. म्हणजे मनस्थिती कायम भरलेली असते. त्यातून पूर्ण विचारांचं गाठोड मावळून आपण नुसते पूर्ण भगवतस्वरूप - भाव होतो. त्या भावनेचा परिणाम म्हणजे अत्यंत शांत आणि समाधानी राहणे. 

म्हणून बदल किंव्हा संबंध कायम नसतात. ते आपले मन, किंव्हा त्यातील शक्ती वळवू शकते भगवंताला भेटण्यासाठी. म्हणून ज्या परिस्थितीत सध्या आपण आहोत, ती बदलू शकते आपल्या हिता करिता. ती सत्य नाही आणि त्यातून मी ठरतं नाही आणि मागे किंव्हा पुढेही ठरणार नाही. मी ह्या सर्वातून वेगळा आहे आणि सर्व गोष्टी माझ्यात सामावले आहेत. 

परावलंबी असणे ही स्थिती आहे, _गरज नाही._ एक स्थिती जर पूर्णपणे आपण स्वीकार करू शकलो तर त्या _स्वीकारण्याच्या प्रक्रियेत भगवंत दिसून येतो_.  

म्हणून भगवंत दिसणे म्हणजे दृश्य सोडणे असे होत नाही - पण ती पूर्ण क्रिया समाधानी पद्धतीने स्वीकारणे, असे होते.

हरि ओम.

Monday, October 28, 2024

श्री: साथ

श्री: साथ


जिवंतपणा हा अनुभव आहे मानवाला. त्या अनुभवात बदल, गुंतून राहणे, परावलंबन, *बंधन*, तत्पूर्त असणे, अस्थिर वाटणे, विचार आणि भावना चक्रात कायम राहणे या गोष्टी माणूस भोगतो. 

मनोरचना *प्रमाण* मानून, त्याची जाणीव ठरवली जाते - म्हणजेच की विचार धारांचा तो परिणाम भोगतो. विचारांचा एक स्वभाव आहे, ज्याचे मूळ खूप सूक्ष्म स्थितीतून घडले गेले आहे. त्या स्वभावात आपण जग अनुभवतो आणि त्यामुळे बंधने वाटतं राहतात, ज्यांना सामोरे जायला लागते. जे आहे, ते असे आहे. ते कार्य म्हणून बघावे आणि सामोरे जात राहणे. 

दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ होणार...पावसाळा, हिवाळा, उन्हाळा होत राहणार, पाणी भरणार आणि अटणार, पकड मध्ये येणार आणि सुटणार, चढ उतार असणार, गती आणि स्थगिती असणार, भरणे आणि मोकळे होणे असणार.

वरील क्रियांमध्ये अहं किंव्हा "मी" हा भाव उमटतो. ती दैवी इच्छा मानायला हवी. तो भाव उमटण्याची, प्रकट होण्यासाठी भगवंताचे विस्मरण होणे आहे. म्हणजे मूळ न कळणे आहे आणि म्हणूनच दृश्याच अस्तीत्व अनंत वाटते (आणि भीती राहते). हे ही दैवी इच्छा मानायला हवी. 

ओघाने आपण असे म्हणू शकतो की मूळ माहीत नाही, याचा अर्थ तो मूळ आपल्या ध्यानाच्या पलीकडे आहे, जो शांत आहे. तरीही त्या शांततेची कायम साथ आपल्या आतच असते, ज्यावरून आपला भाव उदयास येतो. 

जरी भीती वाटली, तरीही मुळची शक्ती किंव्हा शांतीची साथ कायम आहे. ह्यावर श्रद्धा ठेवणे आणि ती शांतता ध्यानात आणणे. त्यासाठी प्रपंचात वावरत असताना भगवंताच किंव्हा नामाच स्मरण सतत जागृत ठेवणे.

हरि ओम.


 श्री 

विचार येत राहणे आणि निघून जाणे ही खूप सूक्ष्म आणि मोठी शक्ती आहे. *शक्ती* म्हणजे अस्तित्वाचे कार्य, बदल, गुंतून राहणे, चक्र, वृत्ती, आकार आणि दृश्याचा भाव. 

त्याच शक्तीचे आपण एक भाव आहोत आणि त्यामुळे रूप किंव्हा स्वभाव धारण केलं आहे. दृश्यात वावरणे म्हणजे त्याचे संस्कार ध्यानात येणे. पण शक्तीचे जागे होणे म्हणजे अनुभव तात्पुरते आहेत, मी तात्पुरता आहे हे समजणे आणि मग शोध सत्याचा होणे. *जागे होणे* हे वैशिष्ट्ये मानवाला दिले आहे, म्हणून सतत धडपड आणि प्रयत्न करणे भाग आहे. आपण किती विषयाधिन आहोत हे कळते आणि किती परावलंबी आहोत विचारांच्या स्वभावामुळे हे ही कळते. चुकीचा समजुतीमुळे गोष्टींच्या हालचाली मनावर संस्कार करतात आणि आपण फळ भोगतो. 

इथून सुरुवात आहे आणि मला वाटते, त्याला काहीही हरकत नाही. आत्ता जर असे कळले तर ठीक आहे. त्यातून पुढचा टप्पा गाठला जाणार आहे. इथ पर्यंत जर आलो आहोत, तर पुढेही काहीतरी उमगणार! अगोदर, मग, इथे किंव्हा तिथे ह्यावर विचार ठेवण्याची गरज आहे का? हे स्वतःला विचारणे. क्षण कसा निर्माण झाला आणि कुणी दिला हे ही ओळखावे. समस्या का येतात आणि सोडवण्याचा अट्टाहास घेणे म्हणजे काय? हे सर्व *क्रिया* म्हणून ओळखू शकू का? अस्तित्व ही जाणीव आहे आणि क्रिया देखील. ते असणारच आहे, म्हणून त्याला कार्य म्हणायचे. 

बदलांचे स्वरूप, आकार, येणे आणि जाणे हे माझ्या किंव्हा कुणाच्याही शक्तीच्या आकलनेत नाही, म्हणून शांत राहावे. मी हा भाव निर्मिती मधून आला आहे, त्याला तसे काही तथ्य नाही, किंव्हा तो असायला हवा असे काहीही नाही. म्हणजे आपण निर्हेतु होऊ शकू का? आणि तो काय असतो अनुभव?!...

हरि ओम.


श्री 

अस्तित्व हे सत्यपणा स्थळ किंव्हा काळाच्या सांगण्यावर आधारित नसते. स्थळ आणि काळ हे हालचाली आहेत, गुण आहेत, गती आहे, गुंतागुंती आहे, दृश्य आहे, स्वभाव आहे, शक्ती आहे. म्हणजेच की क्रिया आहे. 

अस्तित्व किंव्हा भगवंत " शक्तीचे रूप घेतो आणि दृश्यात प्रकट होतो " असे म्हणतात. म्हणजे कुठल्याही हालचालीच्या पाठीमागे त्याची संकल्पना असते. ते ओळखणे. 

हे सरळ जरी मांडले तरी त्याकडे ध्यान बसायला प्रयास घ्यायला लागतात आपल्या मनोरचनेमुळे. असो, तसे तर तसे. त्यातही भगवंताचे प्रबोधन असणार, नाहीतर काय आपण इथपर्यंत आलो?! 

शक्ती आपणही आहोत आणि ती जग निर्माण करते आणि त्यात आपण वावरत राहतो. हे ओघाने आले. तर त्या शक्तिकडे जर भक्ती किंव्हा प्रेम भावनेतून बघितले किंव्हा जाणून घेतले तर तिचे परिणाम आपण आनंदाने स्वीकारू. 

आहे प्रकरण ते गूढ आहे. बुद्धीच्या दृष्टीने कुठली वृत्ती कशी उमटेल आणि काय करायला लावेल, हे कुणाला माहीत नाही - मला किंव्हा जीवाला माहीत नाही. त्या अर्थाने मी भगवंताचा झालो आणि तो म्हणेल त्या पद्धतीने मी अनुभव घेतो. म्हणजे त्याची सेवा करणे हे पक्के झाले. हा "मी" भाव जो निर्माण होतो, तो विरोधाभासी आहे. त्याचा काहीही उपयोग नाही आनंद मिळवण्यासाठी. 

दृश्याचे संस्कार इंद्रियांच्या आहारापासून सुरुवात होतात. म्हणून इंद्रियांच्या नादी किंव्हा चक्राच्या नादी लागू नये. जे येणार ते जाणारच आहे, हा नियम आहे. ते ओळखून भगवंताच्या स्मरणात रहा.

हरि ओम.

Friday, October 25, 2024

श्री

 श्री 


सकाळी विषय संस्कारांचा चालत होता आणि चुकून पुसून गेलं सगळं लिहिलेलं! तात्पर्य असा की मन हे एक चक्र आहे, ज्यात संस्कार होतच राहतात, विचारांच्या प्रवाहामुळे आणि अनेक स्थितीच्या वावरण्यामुळे. त्यामुळे जगाशी संबंध घडतो आणि त्यात गुंतून राहतो आपण. 

प्रत्येक स्थितीचा स्वभाव आणि परिणाम आहे. बुद्धी बघा. Linear, logical and causal are its _patterns_ of actions. हे त्या बुद्धीचे अस्तित्वाचे गुण धर्म आहे. तसे त्याने वागले नाही तरच नवल! पण ह्याने होते काय की त्या स्वभावाला आपण धरून राहतो आणि तसे भोग झेलतो. बुद्धी जे फळ देईल, ते आपल्यावर परिणाम करते. म्हणून चिंता, त्रास, राग, सुख, दुःख वगैरे. हे भावना परावलंबी आहेत, दृश्यात निर्माण होतात, बदलांमुळे होतात आणि हेतूवर निर्भर असतात. तात्पर्य बुद्धीच्या स्वभावामुळे हे भावना आपल्या मनात वावरत राहतात. 

बुद्धिपेक्षा अधिक सूक्ष्म होणे हा पर्याय राहतो. ते म्हणजे *श्रद्धा*. श्रद्धेला मर्यादा नसते म्हणून ते आपल्याला सूक्ष्म करत भगवंताची स्थिती मनात संक्रांत करते. भगवंत आहेच. तो आपल्याला दिसत नाही. एका विशिष्ट क्रियेच्या परिणामांमुळे तो आपल्या जवळ येऊन आपण त्याच्यात विलीन होतो. 

ती क्रिया आहे श्रद्धा वाढवण्याची. त्यातील एक मार्ग आहे नामस्मरण.

हरि ओम.

Shree: Loosing and Space

 

Shree: On loosing

In today’s times we fear losing things. The fear, as an imagination, has been eternal and perhaps people have expressed ways of dealing with this fear. Life is temporary and this feel is also a state of the mind, its nature, connections, behaviour, relations, and its dilemma or questions of whether am I alone or separated or together or what is this business of existence?! The awareness to feel such things and the search for becoming the truth is the inevitable inquiry of being human – as a potential. It is a deep rooted fear - let me make no qualms about it and let me k=not even simplify it. 

But the point is we desperately seek answers through tools of imagination that come from separation or temporariness itself! So how can the answer or synthesis happen from the tool of incompleteness? Once this inquiry is digested (and it takes some time to digest this – maybe some lives) the running stemming from fear mellows down. The running or any other response through fear does not dilute the fear – it reinforces it or continues it. Fear is intent, in other words. 

But if intent can suggest so much, then what should be the “intent” of living? 

Loosing happens If we identify with things, which have a habit of becoming and going or changing. The faster the pace of change or movement, faster is the feel of loss or loss of memory or loss of doing things or loss of a pattern. This can be altered, if subtleness is known or if identification with movement does not happen. Who am I is a question of identity/ awareness/ memory/ being. I am God, nothing less.

Hari Om.

 

 Shree: On Space

I am space and so are others. Space is experience, culture, pattern, relationship, connection, action, imagination, doing, physical, subtle and so many things. Since “experience” itself happens in space, everyone has some idea or a say of space. That makes space intrinsic, fundamental and universal. So the key of architectural discipline is to get people to engage, collaborate, and talk of space and act on space. The difficulty is since we are made of space itself – how can the experience be pulled out, objectified, debated, compared, evaluated, spoken about, tried out, and expressed? There is not one language to do it – but that becomes the beauty of engaging with all forms of spaces and then realizing the depth of what space means. 

This becomes the agenda for dealing with naac. Since the field is highly creative, subjective, speculative, critical, the manner of engagement and action and documentation should allow all such processes to express themselves. How can documentation allow such a range of diversity to come together? The answer is in defining the idea of ‘focus’. Many things put together do not make a story at all – rather it may lead to confusion. But a strong focus can accommodate diversity. 

Hari Om.

 

श्री: प्रश्न

 श्री: प्रश्न


प्रश्न येणे स्वाभाविक आहे. तो आपला किंव्हा जीवाचा गुण धर्म आहे. प्रश्न येणारच आणि याचा अर्थ की शोध राहणार आणि त्याचा अर्थ की निर्मिती चक्र समजून घेण्याची धडपड असणार. मी कोण किंव्हा स्मरण म्हणजे काय हे मूळचे प्रश्न राहतील. प्रश्नाचे अर्थ म्हणजे शक्ती जागी होण्याचा प्रयत्न. 

त्यातून वेगवेगळे स्थिती, वेगळे प्रश्न, पचवण्याची  ताकद वाढणे वगैरे. हा अंतर्मुख होण्याचा प्रवास - कुठे, काय, कसे, केव्हा, का नेईल माहीत " नाही " म्हणून श्रद्धेचे महत्व, स्थान, जाणीव, भाव. 

प्रश्न म्हणजे चक्र याचे कार्य, क्रिया, हेतू निर्मिती, परिणाम, अनुभव, घटक. हे असणार. 

प्रश्न म्हणजे तात्पुरतेपणाचा अर्थ समजून घेणे, त्याला न बीचकणे, शांत होऊ देणे, स्थिर होणे, श्रद्धेने राहणे. 

सूक्ष्मातून दृश्यात शक्तीला अवतरू देणे हे ही महत्वाचे आहे. सूक्ष्म म्हणजे काय, हे प्रश्न जागृत ठेवणे. शोधातून कार्य करणे, वेगळेच घडणे, ते स्वीकारणे, आणि शांत राहणे. येणे, वावरणे, जाणे ही क्रिया स्वीकारणे. अस्तित्व कार्य स्वीकारणे. स्वभाव स्वीकारणे, तो भाव स्वीकारणे, भगवंताचे कार्य ह्यावर श्रद्धा ठेवणे, स्वतःचा मार्ग चालत राहणे, त्यावर श्रद्धा ठेवणे.

कुठे, काय, कशे, कुणी, केव्हा - हे प्रश्न अवतरू देणे आणि शोध ठेवणे.

हरि ओम

Shree: Circles of Existence

Shree: Circles of Existence

 

We think we are separated. “we” is an imagination born in existence and there is a feeling of separation. From this feeling, cycles of perceptions are created that make connections relations, forms, expressions, intents and cause-effects. This causation is a kind of “linearity” that we do not as yet realize the nature of the things that become, come, and go and what that means or how should that affect us. We think something should come, last for eternity and not go – this is an assumption and this assumption creates its own meanings and associations with forms or thoughts. The result of this – is that we become afraid, worried and defensive and go all the way to resist such a phenomenon of change or movement. Why should movement or change “bother us” is the inquiry to be undertaken.

As the awareness turns inwards, the feeling of linearity (movement, engagement, expectation, action, purpose, effects, refinement, defence etc.) diminishes and one realizes a “cycle” of being – that there is a steady centre around which things anchor, move, come, go, revolve and so on. So the centre is always there. The movement to it (eruption/ creation/ vibration/ perception) is introduced and that makes it a space-time medium within which all the phenomena occur.

So are we the object/ form or space-time or the centre or are we talking about the same thing?

 

Hari Om. 

Wednesday, October 23, 2024

श्री

 श्री 


उगाचच घाई करून काहीही पदरी पडत नाही. घाई, ही क्रिया, हेतू ठेवून, परावलंबन असून, दृश्यात होत असते म्हणून आलेली गोष्ट लगेच निघूनही जाते आणि आपण असंतुष्ट राहतो! दृश्याचा गुण धर्म तोच असल्यामुळे इथल्या हालचाली हेतू ठेवूनच करायला लागतात आणि ते अपरिहर्याने परिणाम करतात मनात आणि आपण चक्रात गुंतून राहतो!  म्हणून एखादी गोष्ट नंतर केली काय किंव्हा नाही केली, तरी त्यातून आपण ठरतं नाही आणि आकाश काही कोसळत नाही! हे ध्यानात ठेवावे. 

बुद्धी वापरली तर एकातून एक अशी न संपणारी हालचालींची साखळी चौफेर दिशेने पसरत राहते, म्हणून त्यातून हालचाली होतात, समाधान मिळत नाही! म्हणून अस्तित्वाचे कोडे सोडवण्यासाठी बुद्धी बाजूला ठेवणे आणि श्रद्धा वाढवणे. एखादी गोष्ट व्हायलाच पाहिजे, हा भाव हेतू ठेवून किंव्हा अहं वृत्तीतून उमटतो. त्यातून देखील क्रियेचा स्वरूपाची साखळी समजून घेण्याचा अट्टाहास बुद्धी करते. सूक्ष्म होण्याचाही अट्टाहास धरते. तिथे परत चूक होते आपली. 

भगवंताची क्रिया सहज साध्य किंव्हा श्रद्धेने कळते, दुसऱ्या कशानेही उलगडत नाही. म्हणून त्याला शरण जावे. शरण म्हणजे श्रद्धा प्रकट करणे. श्रद्धेने असणे, श्रद्धेने राहणे.

हरि ओम

Shree: enclosure

 Shree: enclosure 


I think we need or search for a feeling of enclosure. The best enclosure is realization of consciousness as a medium that is One truth. 

In between we search for different scales of enclosures (or to belong to the world of phenomen). 

Enclosures have transcendental dimensions to subtle states to more gross or visible - all of these give a feeling of enclosure. 

So an action is indicated which acknowledges above dimensions. If architecture or experience of space can address above action, then it becomes a profound enclosure. The "form" of architecture therefore ought to come from such _sense_ of enclosure. In this then, I am indicating experience of existence, relationship with any kind of thoughts, continuity, _process_ of practicing this idea, collaboration or community, expression and change and trust. All of this would give a form to architecture - the visual dimension being a channel to express above feelings. I don't think that it is a matter of intent. It has got more to do with realization. 

शक्तीचे " जागे " होणे....

Hari Om.

श्री

 श्री 


अस्तित्व हे स्थिर असण्यामध्ये आहे आणि निर्मिती मध्ये आहे, आकार होण्यात आहे किंव्हा तत्पूर्तेपणात आहे. हे दोन्ही पद्धतीत अस्तीत्व असणार. म्हणून वारंवार संस्कार देत राहणे महत्त्वाचे आहे. दृश्यात गुंतून राहणे आहे, प्रश्न आहे आणि त्यातून स्थिर होणे हे ही आहे. एक सत्य आहे आणि अनेक आकारांची जाणीव आहे. आपणात दोन्ही प्रकारच्या मनोरचने आहेत आणि ते असणार. 

निर्मिती मध्ये रूप किंव्हा आकार होतो आणि जीवही किंव्हा स्वभावही असतो. म्हणजे निर्मितीत जाणीव किंव्हा भाव आणि त्याचे रूप ह्या दोन्ही गोष्टी असतात. म्हणून द्रुष्यास समजून घेणे म्हणजे भाव आणि आकार हे दोन्ही गोष्टी आल्या - किंव्हा ह्या दोन्ही गोष्टी मिळून अस्तित्वाची व्याख्या होते. 

जेवढा आपला भाव अस्थिर किंव्हा विघटित, तेवढे दृष्यातील आकार, हालचाली, गती दिसत राहतील. इथे दिसणे हे भासणे अश्या अर्थाने समोधित केले आहे. विघटित मनोरचना असल्यामुळे आपले अनेक स्तरान बरोबर गुंतणे निर्माण होते आणि म्हणून वृत्ती प्रमाणे जगाशी संबंध होत राहतात. 

वृत्ती अशी गोष्ट आहे की ती प्रवाह सारखी सर्वव्यापी असते पण जीवाला स्वतंत्र भाव ( अहं ) निर्माण करते, जो प्रत्यक्षपणे परावलंबी भाव ठरतो. म्हणजे ही *विरोधाभास* स्थिती झाली! कदाचित हा निर्मितीचा परिणाम झाला मग! आपण *एक* आहोत पण आपल्याला भासत राहते की आपण प्रत्येकी वेगळे आहोत!! ह्या विरोधाभास _स्थिती - स्वभावामुळे_ आपण परावलंबी आणि संबंधित राहतो आणि सत्याला विसरून जातो! 

कदाचित हीच भगवंताची इच्छा आणि कार्य असेल! आपल्याला विरोधाभासी संकल्पनेतून पलीकडे व्हायचे आहे. त्यासाठी नामस्मरण - त्या शक्तीचे ध्यान जीच्यातून ही संकल्पना घडते....!

हरि ओम.

Saturday, October 19, 2024

श्री : जड

श्री : जड

सध्याची जाणीव आपल्याला " जड " बनवते. त्या जडत्वाचे घटक आहेत - स्तर, स्थिती, परावलंबन, चक्र, आकार, संबंध, भावना, विचार, वृत्ती विस्मरण वगैरे. जेवढे इंद्रियांच्या आणि देहाच्या आधीन होऊ, तितकेच विघटित क्रिया, परावलंबनेचा जोर आणि भोग, सुख, दुःख, हव्यास, अपेक्षा, ह्याला बळी पडू. जडत्व कुठल्याही बुद्धीच्या शक्तीने सोडवणे अवघड आहे. ते प्रेमानेच सूक्ष्म होऊ शकते. म्हणून प्रेमात श्रद्धेला आणि शांत व्हायला खूप महत्व आहे.

त्याचे दुसरे नाव म्हणजे भगवंत.

हरि ओम.

श्री : मी आहे

 श्री : मी आहे


मी आहे, हा भाव किंव्हा जाणीव, जीवावर ठरतं नाही किंव्हा त्या स्पंदनांवर किंव्हा त्यातून होणाऱ्या प्रक्रियेवर. अस्तित्व किंव्हा शुध्द जाणीव असतेच - त्यातूनच सर्व घडामोडी आणि आकार येत राहतात. 

ह्याचा अर्थ असाही आपण लाऊ शकतो की अर्थ देणे आणि त्याच्यातील स्तर आणि संबंध हे आपल्या जाणीव ह्यावर ठरवू शकतो. जे दिसते, त्याही पेक्षा जे जाणिवेत येऊ पाहते ते सत्य आहे. म्हणून आकार होणे आणि ते काय आहे हा दैवी भाव आहे. तो भाव स्थिरावले सर्वात महत्वाचं आहे. त्या भावाने काय उमटेल आणि काय घडेल आणि काय बघितले जाईल त्याचा संबंध जोडण्याचा अट्टाहास करू नये. तसा विचार केला तर भाव उमटण्यास वेळ लागू शकतो. 

Can we go beyond causal awareness? Is causal awareness the only way of understanding reality? Does causal awareness 'make me'? Is causal awareness the measure for knowing everything? 

हा शोध आहे. कितीही दृश्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो अपूर्ण, तात्पुरता ठरतो - इंद्रधनुष्य सारखा. ते आहे की नाही - अशी परिस्थिती निर्माण होते आणि तो भाव निर्माण होतो आपल्यात. म्हणून सर्व अस्थिर आणि स्थिर असा मामला आहे. 

तसेच वास्तुशास्त्रातील कलाकृतीचा विचार खूप गूढपणाने प्रकट होऊ शकतो. त्याने " आकाराची " दृश्यांची व्याख्या काहीही असू शकते - ती अशीच पाहिजे किंव्हा तशीच किंव्हा अश्या पद्धतीने उलटली पाहिजे आणि ह्या वेळेतच आणि ह्या स्थळतच असे असू नये/ अट्टाहास धरू नये. 

आपण विषयाला किंव्हा वृत्तीला धरून ठेवतो म्हणून खूप खोलवर अहं भाव प्रकट होत राहतो. जे काही बोलतो आणि अनुभवतो, ते वृत्तीतून येत असते आणि ते येऊ देणे आणि मनाला लाऊ न देणे ह्यातच आपलं हीत आहे. वृत्ती कुणाचीही नाही, स्थळाची नाही, वेळेची नाही. म्हणजे तिला येण्याला आणि वावरायला आणि संबंधित राहायला काही अमुक एक कारण नसते - ह्याचा अर्थ ते बुद्धीच्या पलीकडे असते. ती भगवंताची लीला आहे, म्हणून त्याला स्मरून रहा. स्मरणात तोच राहूदे. 

हरि ओम.

श्री : प्रेम

 श्री : प्रेम


भगवंताचा भाव, असे वाटते, अगदी हळू हळू प्राचीतीला येतो. ह्याने असे दिसून येते की आपला बहिर्मुखपणाचा जोर तीव्र असावा आणि आपण अनेक स्तरात - सूक्ष्म ते स्थूल - गुंतले गेले आहोत. वासना किंव्हा त्याचे स्पंदने उलटून इतर स्तरात प्रकट होतांना त्यांचे निरनिराळे चक्र होत राहतात.

स्पंदन, ही खूप सूक्ष्म क्रिया आहे आणि त्यावरून अनेक संबंध घडतात स्तरात, स्थितीत, आकारात वगैरे. घडामोडी आणि हालचालींचे बीज स्पंदनात आहेत आणि ते प्रामुख्याने आपला " भाव " किंव्हा प्रतिक्रिया निर्माण करतात. तोच भाव सत्यपणाची व्याख्या निर्माण करतो आणि आपण त्यात जगतो. अश्या प्रकारे आत - बाहेर अस्तित्वाचा अर्थ निर्माण होऊ पाहतो. म्हणून आपण पूर्ण भरलेले आहोत स्पंदनांच्या द्वारे. ही झाली भगवंताची क्रिया किंव्हा इच्छा आणि कार्य. 

प्रेम येणे किंव्हा होणे हा स्पंदनांचा भाग आहे. संस्कार तिथं पर्यंत स्पंदने बदलायला हवेत. बाहेरून संस्कार करत ते आत येऊ शकतात. सैय्यम आणि वेळ हे त्यात महत्वाचे घटक झाले. 

काय बोलतो किंव्हा करतो हे हेतुशी निगडित आहे तरीही ते कसे हे पक्के आकलनात येत नाही आणि तसे त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. ते सांगता येत नाही ह्याचाच अर्थ असा की सर्व व्यवहार भगवंताची शक्ती करते किंव्हा प्रकट करते. ते जरी मांडले तरी गा बौद्धिक पर्याय नाही, तो श्रद्धा ठेवण्याचा भाग आहे. श्रद्धा देखील पर्याय नाही, तो बुद्धी पेक्षा सूक्ष्म आणि विशाल भाग आहे. म्हणून श्रद्धेने बुद्धी चालवा. 

प्रेमाला कार्य, क्रिया, बोलणे, ऐकणे, बघणे, स्पर्श करणे, बदलांचा वेग, हेतू, काळ, स्थळ असे कुठलेही साचे लागत नाही. " नाही " ह्याचा अर्थ प्रेम हा भाव विचारांच्या पलीकडे आहे. हे बुद्धी ठरवू शकते. एकदा ते पक्के कळले की तो भाव कसा आत्मसात करावा ह्याकडे लक्ष बुद्धीचे वेधले जाते आणि प्रवास आपण पदार्पण करतो. 

म्हणून काय मिळाले, कसे, कधी, कुठे ह्या प्रश्नाने व्याकूळ होऊ नये. शांत होत राहावे.

हरि ओम.

Thursday, October 17, 2024

श्री : प्रकट

 श्री : प्रकट


आपण सतत एका विचारांच्या साखळीत असतो. प्रश्न असा आहे की अस्तीत्व ही क्रिया कायम असल्यामुळे, गोष्टी " तिथून प्रकट " होत राहणार आहे, रूप धारण करणार आहे आणि आकारांचे " दर्शन " घडणार आहे. 

म्हणजे आपल्या द्वारे गोष्टींचे प्रकट होणे ही क्रिया नेहमीच आहे. म्हणजे आपण पूर्णपणे शक्तींनी भरले गेले आहोत. मुद्दा असा येतो की काय प्रकट करावे आणि त्या क्रियेचा परिणाम होणे म्हणजे काय समजून घ्यावे? प्रकट क्रियानी मी सिद्ध होतो का त्याचा तसा काही संबंध नाही? प्रकट होण्यावरून आपला निर्णय किंव्हा खुद्द आपण ठरले गेलो पाहिजे का तरीही शांततेत ती क्रिया बघत राहावी? प्रकट होणे ही दृश्यात असणारी क्रिया आहे की त्यातही अनेक सूक्ष्म आणि अदृश्य स्तारांच्या  हालचाली असतात?

सूक्ष्म होंत जाण्यानी प्रकट होण्याचा अवाका कळून येतो आणि आपण शांत होतो. प्राचीन विचारानं मध्ये आणि संस्कृती मध्ये प्रकट होण्याला दैव भाव आणि अनंत चक्र चालत राहणारी क्रिया संबोधली आहे - आणि त्या प्रमाणे वास्तुशास्त्र कडेही बघितले गेले आहे. कलाकृती " घडणे " ही प्रकट होण्याच्या क्रियेला स्मरून केली जात असे. म्हणून त्यात " अनंत " असे विचार आणि भाव साठवले असतात. त्रमबकेश्वर मंदिर त्या जागे बांधले आहे जिथे गोदावरी नदी डोंगर माथ्यावरून खाली येऊन " प्रकट " होते. It may appear as a physical phenomenon of water coming down the hill, but is it only that?!... काही विहिरी किंव्हा काही जागांना " तीर्थ " ह्या शब्दांनी संबोधले गेले आहे. त्यातून मानस तीर्थाशी त्याचा संबंध असावा का?! की " जागा " म्हणजे बाहेरून आत संबंधित असलेली क्रिया आणि त्या स्पंदनांचे प्रकट स्वरूप ओळखणे?!

प्रकट होणे ही अस्तित्वाची क्रिया आहे, जीवाची नाही.

हरि ओम.

Saturday, October 12, 2024

श्री

 श्री 


इतक्या गोष्टी सूक्ष्म होत असतात आपल्या अनुभवातून की ते उलगडण्याची गरज असावी का? आणि त्यातून स्वतःची किंमत ठरवणे योग्य आहे का? मुळात अंतर्मुख होणे हे स्वतःसाठी अपरिहार्याने घडते. तो प्रवास भगवातस्वरुप होतो. 

अनंत काळापासून आपण वावरत असतो, स्वभाव होत राहतो, आकलन होत राहतो. मग इतक्या गोष्टी सांगण्याची गरज असावी का? गरज का लागते? कोण निर्माण करतो गरज? माझ्या आत खूप काही चालू राहते आणि ते इतर आकारांवर निगडित असते. त्या एकंदरीत परिस्थितीचा भाव आहे तात्पुरतेपण आणि अहं आणि वेगळेपण. हा भाव आहे, दोष नाही. 

असे असल्यामुळे खरे स्वरूप कळणे तितके सोपे नसावे आणि वाट गूढ असली हवी. 

सैय्यम.

हरि ओम.

श्री

 

श्री

 आपल्याला काहीतरी करण्याची “हाउस” असते – त्याला आपण कृती म्हणू ज्याला हेतू आपोपाप निर्माण होत राहतो. हेतू शक्तीतून येते, पण त्याचा भाव असा होतो कि त्याला “आपण” म्हणतो. त्या भावाला स्वभाव येतो आणि तो म्हणजे इच्छा, आकांक्षा, तात्पुरतेपण, भीती, माया, चंचलता, संकल्पना, भावना वगैरे. हे त्या शक्तीचे होणारे परीणाम आहेत. शक्ती म्हणजे अस्तित्व, आणि तिचं चक्र म्हणजे “मी”. साहजिकच शक्ती इतर स्तरात वावरते, कार्य करते, संबंधित राहते आणि त्यावरून आकार घेते. ह्यावरून असे लक्षात येते कि विचार आणि भावना कुठूनही येत राहतात, त्या बरोबर अनेक गोष्टी आणतात आणि सूक्ष्म ते स्थूल ह्या स्थितीही जोडत राहतात. म्हणून मुळात शक्ती आहे भगवंताची आणि म्हणून जे काही निर्माण होते विचारांच्या पातळीवर, ते भगवंताकडूनच आलेले आहे असे मानून घ्यायला काहीही हरकत नाही. म्हणजेच कि आपण पूर्णपणे भगवंतावर अवलंबून आहोत आणि तो जे म्हणेल तसे कार्य करणे आपले कर्तव्य आहे. त्याच्या इच्छेने विचार आणि भावना घडतात किव्हा येतात आणि मावळतात.

 म्हणून वृत्ती किव्हा वासना होत राहणे हि दैवी प्रक्रिया आहे आणि ती आपल्याला दृश्य जगाचा अनुभव पदरी पाडते. आता आपल्या वासनेच साध्याच स्वरूप हे आहे कि उगम कसा आणि कुठून होतो हे आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे म्हणू आपण घाबरतो आणि त्याप्रमाणे हालचाली करतो. त्यातून असे घडते कि आपण संबंधीत राहतो आणि कुठलेनाकुठले तरी विचार ओढून घेतो निर्माण करतो आणि अर्थ लावत बसतो. त्यातून दृश्याची बाधा जी होते ती होतेच, त्यामुळे!

 म्हणू विचार करायला काहीही हरकत नाही, फक्त कितीही शुद्ध विचार करण्याचा प्रयत्न केला तरी त्यावरून दृश्याची बाधा होणार हे विसरू नये! तरीही त्या मार्गावर जायला लागते कारण विचारांचे चक्र बदलत राहिले आणि विशाल झाले कि बाधा सूक्ष्म स्थितीची होते जी पार करणे आणि जोमाने आणखीन सूक्ष्म होत राहण्याची गरज निर्माण होते. त्यातून वासनेचा पुर्ण अभाव होऊन आपण पुर्ण रिकामे झालो कि भगवंताच्या अस्तित्वाची प्रचीती येते.

 त्याला शांत होणे असे म्हणतात. कि काहीच न करण्याची स्थिती येते, तसे आपल्याला जाणवते, आपण समाधानी होतो. दुसर्यांना स्पष्टीकरण सारखे देण्याचि गरज नाही. पूर्णपणे सांगण्याचीही गरज नाही. आपण अपुरे आहोत आणि तात्पुरते आहोत, त्याबद्दल खंत बाळगण्याचीही गरज नाही. आतून ते बाहेर येतांना परिवर्तन विचारांचे कसे होते हे पुर्ण मांडण्याचीही गरज नाही. आत काय हालचाली होत आहेत, ते हि निदर्शनाला आणायची गरज नाही. ह्यावरून घडामोडींचे स्वरूप कसे होते आणि उद्या काय होईल; आणि पूर्वी काय झाले - ह्याने त्रासून जाण्याचीही गरज नाही.

 शांत होणे हि क्रिया आहे. त्याला सैय्यमाने घ्या.

 हरी ओम.

 

श्री

 श्री 


खूप पुढचा विचार करण्यापेक्षा, आत्ताचा किंव्हा ह्या क्षणाचा विचार करावा. हेच सत्य आहे. कारण शांत म्हणजे _क्षणात_ जिवंत राहणे (म्हणजे स्थिर असणे). पुढचे टप्पे मला माहित नाही, पण ते योग्यच असतील. आपण मात्र आत्ताच्या क्षणाचा पुरेपूर उपयोग, प्रयत्न, शांती भाव ह्यात घालवावा. त्यातूनच प्रवाहाच स्वरूप होत जाईल. 

Don't think of projections or planning. Think of "now" as a moment of Existence. From this very point, things emerge or unfold in all directions, since that happens in any case. This point, this moment, this instant is "my centre".

हरि ओम.

श्री

 श्री 


स्वतःच्या अस्तित्व स्थितीवर श्रद्धा ठेवावी. त्यावर श्रद्धा म्हणजे ती स्थिती एका दैवी क्रियेतून आलेली आहे. त्यात अनंत क्रिया आहेत, सूक्ष्म पासून ते वृत्ती ते विचार ते भावना ते आकार/ दृश्य. त्यात परिवर्तन होत "मी" हा भाव घडतो आणि चक्र असल्यामुळे त्याची निर्मिती आणि परिणाम ह्या दोन्ही गोष्टी त्या शक्तित सामावलेले असतात. जो पर्यंत आपण त्या चक्रात वावरतो आणि त्या प्रकारच्या स्मरणात असतो, आपण मायेच्या प्रभावात राहतो, असे संबोधले आहे. त्या चक्राला धरून ठेवणे, त्याला सत्य मानणे, विषयाधीन होणे, हे त्याचे _परिणाम_ होत असतात. म्हणून तात्पुरतेपण वाटणे, भावना उमटणे, कष्टी होणे ह्या गोष्टी निर्माण होतात.

निर्मिती माझी नाही, ती एका क्रियेचा _परिणाम_ आहे. त्या क्रियेला " मी " हा भाव होतो, म्हणून क्रियेला आपण तटस्टपणे "क्रिया" म्हणून बघू शकत नाही. 

त्यासाठी नामस्मरण - क्रिया करायला लागते जी "मी" ह्या क्रियेच्या विरुद्ध आहे किंव्हा "मी" ह्या क्रियेला शांत करू शकते. तसे पाहिले तर सगळा शक्तीचा खेळ आहे. मूळ शक्ती भगवंताची आहे, जिच्यातून अनेक प्रकारच्या शक्ती उदयास येतात. आपण पहिल्यापासूनच विघटित असल्यामुळे मन चंचल असते आणि परावलंबी असते आणि दृश्यांची बाधा होते. "विघटित" असणे मग स्थिती मानायला हवी. ते मान्य असेल, तर एकरूप भाव मिळवण्यास प्रयास करणे आवश्यक. _त्यासाठी नामस्मरण क्रियेत स्थिर होणे,_ हा एकमेव उपाय आहे.

हरि ओम.


श्री 

त्रासाचं मूळ माझ्या बुद्धीला नाही कळत. हे मी मान्य करतो. तुझ्या बद्दल विचार करून ते दूर होईल (म्हणजे मावळेल, शांत होईल) अशी आशा मी बाळगतो. त्या आशेच रूपांतर श्रद्धेवर होण्याचे सामर्थ्य माझ्यात निर्माण होऊ दे अशी प्रार्थना तुझ्यापाशी करतो. 

वरील वाक्य विश्लेषण आहे खास. श्रद्धा जागी होणे ही क्रिया गूढ असली हवी आणि तुझ्या कृपेवरून होईल. ते होण्यामध्ये क्षणांचे बदल मनाच्या विरुद्धही होतील, पण सर्व घडामोडी तुझ्या इच्छेने होत असल्यामुळे, ते योग्यच असेल असे मी मानून घेईन. त्या प्रवासात त्रास होईल, दुःख होईल, पण ते तुझ्या इच्छेचा भाग आहे आणि त्या मार्गानेच तू मला भेटणार असशील, तर मी सैय्यम नक्की ठेवीन. 

मी हे लिहीत आहे तुला, कारण हा तू दिलेला टप्पा आहे, तर तसे मी करत आहे. त्यातून पुढे तुझ्या इच्छेवर घडामोडी होणार आहे. तुझी कृपा राहूदे माझ्यावर आणि पर्यायाने आमच्या सगळ्यांवर.

मी उगाचच शंका घेत राहतो. आणि सर्व गोष्टी सुरळीत होण्याचा अट्टाहास धरतो. अट्टाहास भाव आहे, तो एका पद्धतीच्या जाणिवेतून निर्माण होत आहे. तरीही शांत होण्यासाठी तुझ्या कृपेची जरुरी आहे. मला शांत होण्यासाठी, शांततेत वावरण्यासाठी आणि त्यातच स्थिर होण्यासाठी बुद्धी दे आणि शक्ती दे. तुझ्या इच्छेनुसार बाहेर मी नाही.

हरि ओम. 

Shree: Memory

 

Shree: Memory

Memory is about existence. I think the place of memory is to generate a sense of belongingness. It may include any imagination (or reality) of myth, ancestors, environment, actions, self and so on. It remains connected with many other dimensions and many other forms, so connections are searched. Whatever is ‘seen’ is through the aspect of memory, so space and time is also memory. Does space and time “change”? it depends on memory of Being.

At a more daily level, I may see geography as behavioural, experiential, intuitive level. I may also see self and environment as feelings, intellect, emotions, or any of the constructs that get generated. So how does that shape our environment? If all things that I see are roads, motions, sophisticated caves, glass, steel, grey, straight lines, silence, order, control, systems – what sort of influence it has on memory?! Do we get silenced? Do we feel apathy? Are we numbed? And to counter it, do we shout and cause panic to galvanise a mob? In the same way, if I see/ feel trees, meandering things, up and down, roughness, odour, sound, breeze, sun, clouds, sky, slowness, touch – what sort of influence does it have on memory? If I extend this observation to built environment, how does a settlement indicate such behavioral attributes of people?

In planning theories, I think historical analysis will show the idea of movement as a line – on terrain, width, height, proportions, slowness and fastness and the spaces which get organised along this movement. All planning ideas, it seems, may get conceptualized through the idea of movement – be those of people or animals or carts or cars or ships or railways etc. In a nutshell, experience can be spoken through movement.

Hari Om.

 

 

Tuesday, October 08, 2024

श्री

 श्री 


आपण कुठलाही निर्णय घेतला, निश्चय केला, कार्य केलं, परिस्थिती झाली, परिणाम अनुभवले, तरीही भगवंताची इच्छा प्रत्यक्ष येत असते हे ओळखावे. त्याची इच्छा कळायला आपलं मन सूक्ष्म व्हायला लागतं, म्हणून सध्या श्रद्धा वाढवण्याचा निर्णय घ्यावा. श्रद्धेने आपण अनुभव स्वीकारू आणि कशालाही दोष नाही देणार, किंव्हा न्यूनता नाही बाळगणार किंव्हा परिस्थितीवर आपले स्वतःचे अपेक्षा नाही लादणार आणि परिस्थितीवरून स्वतःची संकल्पना तैय्यार नाही करणार. मुळात स्व - ही भावना मंदावेल. भगवंत जे करेल, आपल्याही आकलनाच्या पलीकडे, ते योग्यच असेल आणि योग्यच घडेल. आपले प्रयत्न म्हणजे त्याची भाषा ओळखणे, म्हणजे मन शुद्ध करणे. 

बदल, परिस्थिती, गुंतागुंती, भावना, विचार, चक्र, घडामोडी, झिज, अवलंबून भाव, आवाज, आकार, प्रतिक्रिया, अनुभव, परिणाम हा दैवी प्रवाह आहे/ दैवी क्रिया आहे. त्याच्या क्रियेतून अनेक स्तर, अनेक चक्र, अनेक स्वभाव, अनेक वृत्ती, अनेक विचार - भावनांचे जग, अनेक अनुभव निर्माण होतात. To "become" is the only reality of Existence. It will become. It will keep becoming. असे असताना घडामोडी मनाला का लावून घ्यावे? हेतू का असावा?! सध्या हेतू ठेवण्याशिवाय गत्यंतर नाही. तरीही जे फळ मिळतील, त्याच्या पाठीमागे खूप सूक्ष्म स्तरात भगवंताची शक्ती काम करत आहे, हे मनाला सांगत राहणे. आणि तीच जग चालवते आणि आपल्याला निर्णय घ्यायला भाग पाडते. म्हणून कार्य करणे, हे देखील त्याने योजिले आहे, तर ते करायलाच हवे...

हरि ओम.

श्री

 श्री 


गती किंव्हा बदल भासत राहणे ही अस्तित्वाची स्थिती आहे. त्यात दोन्ही अनुभव किंव्हा जाणिवांचे स्वरूप मिसळले असते. एक आहे ती शुध्द जाणीव आणि दुसरा आहे तो द्वैताचा अनुभव, क्रिया, परिणाम.  अश्या प्रकारे आपण जिवंतपणा अनुभवतो. आपण कायम असतो. बदल किंव्हा झिजणे किंव्हा तात्पुरते वाटणे हा भाव आहे. तो निर्माण झालेला आहे, म्हणून तिथे आपले मन चिकटले आहे. मन काहीही निर्माण करू शकते. ह्याचा अर्थ मन स्थिरावले तर भगवतस्वरूप आपण होऊ. हा सध्या पर्याय जरी वाटतं असला तरी ते खरे आणि सत्य स्वरूप आहे, असे संतांचे सांगणे आहे. म्हणून बुद्धी सूक्ष्म होऊन स्थिर व्हायला लागते म्हणजे त्या सत्याचा अनुभव येतो. पर्याय म्हणाले तर फायदे तोटे वगैरे अशी व्यवहारी संकल्पना आली - ज्यामुळे बुद्धीला स्वस्थता मिळत नाही. पर्याय भगवंताला संबोधित करणे म्हणजे इथेच मनाचे चुकते कारण भगवंत आपण तोलून तपासून स्वीकारतो असे म्हणणे झाले!! म्हणजे की भगवंताकडे हेतूच्या चष्म्यातून बघणे. असे केले तर भगवंत पर्याय म्हणूनच राहील, तो सत्यात अवतरणार नाही!! 

सत्य म्हणजे तो भाव सर्वव्यापी होतो, सर्व स्तरांवर पसरतो आणि सगळ्या गोष्टींचे स्वरूप तिथेच नेऊन पोहोचवतो असे आपण ओळखू शकतो. 

दृश्य संपत नाही. आकार येत राहणार. तरी त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज उरणार नाही, असे मन शुध्द व्हायला हवे. परत हा मार्ग खरा आहे, हे जाणल तर तो मार्ग पत्करू. त्यावर कोणतीही परिस्थिती आली, तरी तो मार्ग सोडणार नाही, त्या निश्चयात राहणे महत्त्वाचे आहे. 

कुणी काहीही बोललं, त्यातून आपली प्रतिक्रिया ठरू नये, मी ठरू नये, जवाबदारी ठरू नये. पर्याय मानला तर तसे होते. भगवंताचे अनुसंधान ठेवले तर कार्य मनाला चिकटत नाही किंव्हा मन दृश्यात गुंतत नाही. मग प्रसंग कसाही असला आणि आपण कार्य केले तर आपण शांतच राहतो. कारण चालना देणारी शक्ती सूक्ष्म, विशाल आणि गूढ असते, म्हणून दृश्याचा उगमही गूढ असला पाहिजे. आपण कार्य करत राहावे. जे होईल ते योग्यच होईल, अशी श्रद्धा बाळगणे.

बुद्धी आली रे आली की खूप साऱ्या भावना आणि संबंध त्यावर पाठोपाठ येतं राहतात. म्हणून त्यागाचा मार्ग प्रत्येकाचा वेगळा असतो आणि जो प्रसंग आला आहे, तो त्यानेच स्वतः स्वीकारायला लागतो आणि पार पाडायला लागतो. आलेले प्रसंग भगवंताने दिले आहेत, ह्या भावनेत श्रद्धा ठेवा. तो आपल्याला सोडणार नाही. 

हरि ओम.

श्री

 श्री 


वरील क्षण संबंधित खूप विचार मांडता येऊ शकतात. ती एक धारा होऊ शकते. Unfold.

जिवंतपणा, स्मरण, कार्य, हेतू, परिणाम, अनुभव, अकरांच स्वरूप - हे क्षणावर आधारित आहे. अहं म्हणजे त्याला "मी" - "संकुचित क्षण" म्हणू शकतो. ह्याच्या उलट भगवंत हा क्षण दर्शवत नाही, प्रवाहच्याही पलीकडे "होतो". I am an existential state or a certain form of space and time. So the "form" suggests the _nature_ of perception of existence. 

बदल काही वेगळे गोष्टी दर्शवत नाही. ते वाटतात तशे आणि त्यातून सुख किंव्हा दुःख करून घेतो आपण, ह्याचा अर्थ की क्षणाची व्याख्या खूप मर्यादित केली गेली आहे. ढग, गती, गुण हे आकार कायम नाही. ते बदलत राहतात, ह्याचा अर्थ की स्तरांच्या जाणिवेतून ते निर्माण झालेले " भासतात ". वृत्ती क्षण निर्माण करते. वृत्ती काळ आणि स्थळ निर्माण करते. तर निर्मिती ह्या क्रियेमध्ये जाणीव अनेक प्रकारच्या स्थितीतून जाऊन एक अनुभव "दाखवते". ते अनुभव त्यांनाच कळतात ज्यांच मन देखील त्या स्थितीत वावरत. तर क्षणाचे पडसाद अनेक प्रकारचे आकार, स्थिती, स्तर, आत - बाहेर क्रिया दर्शवतात किंव्हा निर्माण करतात. मग आपण आकार त्या पार्श्वभूमीवर निर्माण करतो आणि त्या संबंधित राहतो आणि त्याच्याशी त्या पद्धतीने व्यवहार करतो. मग निर्माण झाले प्रश्न आणि त्याचे उत्तरं...ही साखळी कायम राहिली. प्रश्न का पडावे, हे ही गूढ प्रकरण आहे. कारण आपण समाधानी होत नाही सध्या, म्हणून प्रश्न आहेत. कितीही दिलं, केलं, तरी सत्याचा अंदाज नसेल तर ते कृत्य कष्टाला कारणीभूत होतात. 

क्षणापासून आपण अर्थ खूप तात्पुरते लावतो. एखादी गोष्ट का घडते, कशी येते आणि जाते आणि आपण का गुंतून राहतो हा सर्व क्षणाचा खेळ आहे. कुठल्याही संकल्पनेला " बिंदू " म्हणून बघणे हे ही घातक आहे आपल्यासाठी. मुद्दामून जोडणे, पळणे, बळजब्री करून थांबवणे हे ही त्या बिंदुचे उपक्रम आहेत. बिंदूला दोष देणे, आपल्याला दोष देणे, न्युन बाळगणे किंव्हा अती अहांकरिक होणे, हे सारे त्याच स्थितीचे पिलावळ आहेत. 

अट्टाहासाने कोड सोडवणे किंव्हा उतावळे होणे किंव्हा अर्धवट वाटणे हे देखील मर्यादित जाणीव दर्शवते. असे का आहे, हा प्रश्न देखील त्या स्थितीचा आहे.

वरील सर्व गोष्टी बघता, प्रवाह जाणण्यासाठी श्रद्धा वाढवणे हाच मार्ग आहे.

मी आज आलो नाही, आणि उद्याही जाणार नाही. मला मरण नाही, जो स्थिर आहे. जे मरत, झिजत, परिणामी राहत, अवलंबून असतं, तो _क्षण_ असतो. 

परदेशी अशे बरेच किस्से आहेत की भारताची आठवण तेव्हा येते जेव्हा भारतातली कुठलीही माणसं त्यांना भेटतात. हा काय प्रकार आहे स्मरणांचा?!! म्हणजे आपण स्मरणात वावरतो. एखादी गोष्ट मला खूप गूढ आणि आपुलकीची स्मरण निर्माण करू शकते. तिथे ती गोष्ट महत्वाची नाही, पण जे स्मरण पावते त्या प्रमाणे आपण भावना निर्माण करतो. 

असे जर आहे, तर आपण झाडे, पक्षी, डोंगर, पाणी, सूर्य, पाऊस, माणूस, मांजर, कसे बघतो?! कुठल्या भावना उफाळून येतात??...असे आहे, की " पूर्वी " आपण पर्यावरण ला एक गूढ शक्ती आणि त्यात आपले स्थान ह्या पद्धतीने जाणून घेत असे. आत्ता कुठल्या भूमिकेतून पर्यावरणकडे बघतो? शक्ती किंव्हा देवाची तरी आठवण येते तरी का? खुद भगवंत आत आणि बाहेर उभा राहून सुद्धा आपण त्याला ओळखत नाही आणि हेच विश्व आपल्याला स्थूल किंव्हा जड वाटते. अशी आपली गत.

Saturday, October 05, 2024

श्री

 श्री 


क्षण...

कुठल्याही कृतीचा किंव्हा क्षणाचा परिणाम कसा सर्व व्यापी होऊ शकतो, ह्याची पूर्ण कल्पना बुद्धीला येणे अवघड आहे, कारण आपली बुद्धी " क्षणावर " केंद्रित राहते. _क्षण_ म्हणजे बिंदू, अनेक बिंदुंचा संबंध आणि त्या बद्दलचे विचार - हे सर्व गोष्टीही " क्षण " दर्शवतात. आपलं अख्ख जीवन देखील एका क्षणासारखे  आपली बुद्धी बघते. " मी " हा अहं भाव देखील " क्षण " म्हणून बुद्धी बघते. आणि लगेच हेतू निर्माण करून कृती करायला भाग पाडते. आपण चंचल राहतो.

ह्याचा अर्थ की सध्या अस्तीत्व आपण मर्यादित जाणीवा मध्ये आणल्यामुळे, आपल्याला जीवन दिसते आणि संबंध भासतो आणि दृष्याशी संपर्क येतो. त्यातून विचार आणि भावनांचे चक्र. त्यातूनच आकार किंव्हा शरीर. म्हणजे आपण खूप विषयाधिन किंव्हा क्षणातीत वावरत राहतो म्हणून प्रचंड कष्ट, चिंता आणि भीती बाळगतो. हे त्या " क्षणाचे " परिणाम आहेत. मग क्षण झाली एक अस्तित्वाची _स्थिती_ . 

आपली जाणीव जर क्षणावर केंद्रित राहिली नाही पण अनंत प्रवाहाकडे केंद्रित केली तर बुद्धी आणि भावना वेगळ्या पद्धतीने अस्तीत्व मानायला लागतील. त्यात " मी " हा भाव मावळू शकतो आणि नवीन भाव किंव्हा सूक्ष्म भाव त्या ठिकाणी स्थिर होतो. अजून सूक्ष्म झालो तर भगवंत भावांमध्ये स्थिरावले जातो.

हरि ओम.

श्री

श्री 

" मी " ह्यातून अंतर दिसते - भगवंताच्या शक्तित आणि माझ्या मर्यादित शक्तित. शक्ती ही जाणीव आहे, जीच्यातुन गुंतलेले आतून ते बाहेरून स्तर असतात - आपल्या बाबतीत ते वासना पासून ते बुद्धी ते भावना ते आकार असे दिसून येतात, ज्याला आपणही प्रतिसाद देतो आणि आपल्यावर त्या चक्राचा परिणाम होत राहतो आणि आपण कार्य करतो. 

भगवंत पासून अंतर झाले की विचारांची धारा सुरू होते आणि आपण देहाला किंव्हा संकल्पनेला किंव्हा विषयाला सत्यपण देत राहतो. प्रश्न अनंत असतात आणि ते स्थितीतून उमटतात - अर्धवट आणि तत्पूर्तेपण. ती निर्मिती आहे, काळ्या दगडावरची पांढरी रेघ नाही!! म्हणून निर्मिती मुळे आपण ठरतं नाही किंवा आपलं काही बिघडत नसते. 

अपूर्ण असल्यामुळे, वेग वेगळ्या गोष्टी येत राहतात आणि निघून जातात - त्याना प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असे काही नाही. प्रतिक्रिया घडामोडींवर निश्चित ठरवू नये - ह्याला स्थिर होणे असे म्हणतात. 

जे होणार आहे, ते होणार. बदल, संबंध, आकारांच्या गती - हे राहणार. जेव्हा उमगेल अर्थ तेव्हाच उमगेल. त्यासाठी इथे जावे, हे करावे, ते करावे, ह्यांना भेटावे, त्यांना भेटावे, हे वाचावे, ते वाचावे, हे सांगावे, ते सांगावे, हे ऐकावे, ते ऐकावे - ह्यांनी शांतता मिळेलच असे नाही. काहीतरी केल्याने शांती हातात लागेल हा भ्रम आहे. मुळात " मी " हा भाव निर्माण झालेला आणि चिकटलेला आहे - तो भ्रम आहे. मी काहीही करत नसतो. जे कोण करतो, तो महान, विशाल, सूक्ष्म आणि शक्तिमान आहे. म्हणून त्याच्या इच्छेने मी इथे आहे आणि अनुभव घेतो आणि देतो. देवाण घेवाण, संबंध, संपर्क, संस्कार त्याच्या तरफे होतात, त्यांचा जन्म तो देतो, तो करतो, त्याच्यातून होतो.  

मग "मी" ही वृत्ती काय आहे आणि कशासाठी? हे ओळखणे. सर्व तोच आहे, तर त्याचं स्मरण ठेवा. पुढचा क्षण, स्थिती मला माहीत नाही, तरीही समाधान त्यावर अवलंबून नाही.

हरि ओम.

Tuesday, October 01, 2024

श्री

श्री 


मन ही शक्ती आहे, जी काहीही निर्माण करू शकते. निर्मिती ही अस्तित्वाची क्रिया आहे किंव्हा स्वभाव आहे, म्हणून त्यातून मनही झाले आहे. ते होताना किंव्हा जाणिवेतून आकारास येताना, वासना, स्फुरण, विचार, भावना, शरीर अशे चक्र निर्माण केले गेले आहेत. एकंदरीत त्याचा परिणाम म्हणजे " मी " हा भाव उद्भवणे. हा भाव देखील एका विशिष्ट पद्धतीने वावरतो अस्तित्वात, म्हणून तो जिवंत राहतो. त्या भावाचे स्वरूप म्हणजे वासनेला चिकटण, त्यातून विचारांना आणि भावनांना सत्य मानणं आणि त्या प्रमाणे दृष्यास अर्थ देणं आणि प्रतिक्रिया देत रहाणं आणि तेच संस्कार पुढे ठेवत रहाणं. ह्या सर्व " अनुभवाला " द्वैत असे संबोधित केले आहे, कारण आपल्याला वेगळेपणा " भासतो ", जो मुळात सत्यात " नाही " आहे! म्हणजे आपल्याला जाणिवेची एक अस्तित्वाची स्थिती धरून ठेवली आहे, जी द्वैत अनुभव मानत राहते. 

म्हणून औषधाचा उपचार असा हवा की जाणिवेत परिवर्तन व्हायला हवे. बाहेरच्या गोष्टींना औषध दिले तर ते वर वरचे उपचार ठरतील - त्यातून पाहिजे तो परिणाम कदाचित होणार नाही. म्हणून अंतर्मुख होऊन आपल्याला बघायचे आहे की नेमके वासना निर्माण कशे होतात आणि त्यातून इतर भावना कशे रुपात येतात? 

हा सर्वात महत्वाचा मार्ग आहे किंव्हा आपल्या हातून महत्वाचे कार्य आहे. शांत झाल्याशिवाय दृश्यात वावरायला काही आनंद नाही. आणि मुळात आनंद भाव हा सर्वांना हवा. सर्व गोष्टींचे मूळ काय आहे, ते पक्के ध्यानात येऊ द्यावे आणि तिथे लक्ष केंद्रित करावे.

हरि ओम.


श्री 

एखादी गोष्ट " जिवंत " असते म्हणजे काय? माझ्या मते जिवंत असते म्हणजे तिची क्रिया तिला स्वभाव देत राहते. क्रिया शक्तितुन येते. म्हणून जिवंत असते आणि त्यामुळे तिची क्रिया + परिणाम करत राहते म्हणजे " शक्ती ". त्या क्रियेतून भाव निर्माण होतो. म्हणून भावही निर्माण होणारी गोष्ट आहे, जी बदलू शकते. 

शक्तीचा परिणाम आपण सध्या भोगत आहोत. मनुष्यने त्या शक्तीच्या अनुभवाला " भोग " असे नाव दिलं आहे. 

अध्यात्माच्या भुमिकेवरून असे सांगणे आहे, की हीच शक्ती " जागी " करायची आहे. शक्तीचे जागे होणे म्हणजे आनंदाचा शोध आणि आपण आनंद स्वरूप होणे, किंव्हा शांत होणे, किंव्हा श्रद्धा विस्तार पावणे. आपणच भगवतस्वरुप आहोत, त्या भावनेत स्थिरावणे म्हणजे "शक्तीचे जागे होणे". 

हरि ओम.



 श्री 

अनुभवाचं मोजमाप असतं का? मोजमाप शोध घेण्यासाठी आहे, दुसऱ्याला काय वाटेल ह्या साठी नाही. मोजमाप द्वैत संकल्पना समजण्यासाठी आहे, त्यात गुंतून राहण्यासाठी नाही. मोजमाप भगवत स्वरूप होण्यासाठी आहे, त्याला विसरण्यासाठी नाही. मोजमाप मोकळे होण्यासाठी आहे, किचकट राहण्यासाठी नाही. मोजमाप प्रेम होण्यासाठी आहे, अनेक बुद्धिभेद सिद्ध करण्यासाठी नाही. मोजमाप सारे गोष्टींना मुभा देत राहण्यासाठी आहे, त्यांना अडवण्यासाठी नाही. मोजमाप वासना सोडण्यासाठी आहे, त्याला भक्कम करण्यासाठी नाही. 

हरि ओम.

श्री

श्री 

सर्व बदल आणि हालचाली आणि गती आणि आकारांचे अस्तीत्व आणि त्यांच्यातील संबंध भगवंत ठरवतो. त्याच्या अस्तित्वामुळे आपण - शक्ती, क्रिया, ज्ञान, कार्य, जाणीव, संकल्पना, इच्छा - अशी अनेक उपमा त्याच्या नामासाठी देतो. नाम घेणे म्हणजे वरील संकल्पनेवर श्रद्धा ठेवणे. 

हे दृश्य जग स्वतःच्या वासनेमुळे, स्पंदने मुळे, संपर्कात किंव्हा जाणिवेत येते. It is an 'imagination'. So imagination is a phenomenon of Being that creates things or forms or relations or connections or meanings out of vibrations. 

मनाच्या शक्तीचे कार्य आहे. ती शक्ती दृश्य भासवते/ निर्माण करते/ स्वभाव देते. म्हणजे शक्तीचे अस्तीत्व, तिचे कार्य, तिचा परिणाम, त्यावरून होणारा अनुभव, त्यावरील केलेली प्रक्रिया, त्यातून परत होणारी क्रिया हे चक्र दर्शवते.

एकंदरीत त्याला आपण कार्य म्हणू. कार्य होत राहणार आणि त्याचे माध्यम शक्ती किंव्हा अस्तीत्व आहे. त्याला आपण भगवंत म्हणतो.  

जो पर्यंत संपर्क स्मरणात राहते, तो पर्यंत दृश्य जगाचा स्वभाव, परिणाम मनावर संस्कार करत राहते. स्मरण भगवतस्वरुप झाले की दृश्याच अस्तीत्व किंव्हा त्याचा परिणाम ( म्हणजे मी वेगळा आहे असा भाव ) नाहीसा होतो. मन विचार शून्य होते, म्हणजे शुध्द अस्तित्वाच्या शक्तिमध्ये स्थिर होते.

हरि ओम