Tuesday, December 31, 2024

श्री

श्री 

अस्तीत्व - ही वस्तुस्थिती असणार आहे. म्हणजे आपण असणारच आहोत आणि अनुभव निर्माण होत राहणार आहे. त्यात सारे स्तर, क्रिया, चक्र, गुंतागुंती, बदल, गुण, गती, भाव आणि खूप सारे घटक वावरत जाणिवेत येणार आहेत. ते दृश्य जगाची उत्पत्ती आणि लय दर्शवत राहतील. हे अनंत काळ चालू राहणार आहे. ह्या सर्व क्रियेत आलेला शक्तीला प्रश्न असा आहे की मी कोण आहे आणि माझे  स्थान ह्या सर्व घडामोडीत काय आहे? 

ह्यावरून स्पंदने योग्य होण्याचे सामर्थ्य आहे शक्तित - ज्याला त्याचा त्याचा काळ लागू शकेल. तो मार्ग झाला. मार्ग म्हणजे दृश्य अनुभवातून (जी काही परिस्थिती असावी जाणिवेत) स्थिर होणे. स्थिर होण्यात अनंत गोष्टींचे अर्थ पचनी पडायला लागतील. गोष्टी निर्माण होणे, जाणिवेत वावरणे, त्यात गुंतून राहणे, बदल होणे, परिवर्तन होणे, पचनी पडणे आणि त्यावरून साखळीचे रूप निर्माण होत राहणे - हे असे होणार. 

हे झाले अस्तित्वाचे *दर्शन*. _दर्शन अनुभवाचे_ रूप शांती भाव प्रत्ययास यायला हवे. म्हणून नामस्मरण.

हरि ओम.

श्री

 श्री 


अनुभव, दृश्य, जन्म, भाव हे ध्यानात येणे, त्यात भगवंताची इच्छा आहे. आपले होणे, येणे, वावरणे, विलीन होणे - हे त्याच्या संकल्पनेत असलेला मार्ग आहे. हे होत राहणार, आपण निर्माण होणार, भाव येणार, बदल असणार, अनेकात वावरणार, अस्थिर राहणार, शोध घेणार, सैय्यम ठेवणार, श्रद्धा वाढवणार - हे सगळं होणार. ते होणार. आज ना उद्या ते होणार.

चिंता करू नये. सर्व गोष्टींचे चक्र असते, लाटा असतात, जाळ असते, भरती आणि ओहोटी असते, उगवणे आणि मावळणे असते, चढ आणि उतार असते आणि ह्यालाच हालचाली म्हणायचे. हालचाली येणे आणि जाणे मधून भासते - ती रेश नसते! जर सर्वच तसे असेल तर आपलेही येणे आणि जाणे हे निश्चित आहे तर! म्हणजे अदृश्य - दृश्य हे असणारच आहे! 

आपण मग काम का करतो? वरच्या हालचाली ध्यानात येण्यासाठी. कार्य त्यासाठी असते; सिद्ध होण्यासाठी नाही. आकार दिसणे, प्रतिक्रिया मनात येणे, कृती करणे, विचार मांडणे, धावपळ करणे ह्या सर्वातून पलीकडे होणे आहे - त्यास _मुक्ती_ असे म्हणतात. तसा भाव जागृत होणे, हे स्वाभाविक गुण ओळखले जाते मानवाचे. त्याचे पाऊल खुणा मानव दृश्यात सोडतो. ते ओळखावे.

हरि ओम.

श्री

 श्री 


मूळ जे असेल तो भगवत भाव आहे. भाव खटाटोप करून किंव्हा जर - तर ह्या अपेक्षातून करायचा नसतो. कुठलीही संकल्पना, इच्छा, भावना, स्तर, स्थिती, रूप बहिर्मुख असते. त्याच्यातून शुध्द भगवंत कळणे ह्याला प्रयास लागतात आणि सर्वांगीण चिंतन लागतं. 

तरीही भगवत भाव म्हणजे शांती - प्रेम प्रकट होऊ देणे, तसे संबंध करणे, विषय सोडणे, क्रियांवर श्रद्धा बाळगणे, अदृश्य ते दृश्याचा संबंध किंव्हा भाव स्वीकारणे. भाव म्हणजे अस्तित्वाची शुध्द शक्ती ओळखणे जी सर्व ठिकाणी वावरते, असते, क्रिया करते आणि सर्व घडामोडी तिच्यामुळे होतात. 

स्थिर ह्या विचाराला दोन भाग आहेत. कुठलीही वृत्ती उमटत नाही, हा सरळ अर्थ झाला. आणि सारे स्तर किंव्हा रूपं हे शांतीचे प्रतीक आहेत, हा भावही देखील स्थिर समजायला हरकत नाही. जे होते ते त्याच्या इच्छेमुळे, क्रियेमुळे होते - हे शांतीने स्वीकारणे. आपले येणे, वावरणे, चक्र जाणवणे, परिणाम भोगणे, विलीन होणे - हे त्याच्या इच्छेवरून घडते. पूर्ण त्याच्यावर श्रद्धा ठेवणे, म्हणजे कष्टी होऊ नये, कोडे सोडवण्याचा अट्टाहास धरू नये, त्रासून जाऊ नये. 

दृश्यात नाम घेत राहणे महत्त्वाचे आहे. त्यांनीच आठवण राहते, आणि त्यातूनच शांती भाव प्रकट होतो. तो कसा, त्याचे रूपं काय, संबंध काय, सूक्ष्म स्थिती म्हणजे काय ह्याची चिंता किंव्हा विचार करून त्याचा गुंता करून घेऊ नये. 

वास्तूकलेत बाहेरील रूप हे आतल्या आकाशातून निर्माण होते. आतील आकाश म्हणजे मनाच्या आतील आकाश. म्हणून बाहेरील रूप ह्याला दोरी म्हणजे मनात कसले वृत्ती येत आहेत, हे ध्यानात ठेवणे. सर्व अनंत संकल्पनेचे बीज मनात असते आणि तिथूनच प्रकट होऊ पाहते. 

हरि ओम.

Saturday, December 28, 2024

श्री

  

श्री 

 अस्तीत्व आणि त्यामुळे होणारे निर्मिती कार्य असतेच. ते कायम सुरू राहतेम्हणून काय होणार पुढे त्याची आपण चिंता करू नये. 

 आपण अस्तित्वात आहोतत्याचे एक रूप आहोत. रूप म्हणजे चक्रस्तरस्थितीसंबंधप्रक्रियाअनुभवआकार. रूप देवाकडून आले आहेम्हणून रूपाने चिंतित होऊ नका. रूप कोडे सोडवण्यासाठी आला नाही जगात. तो भगवंत जाणून घेण्यासाठी आला आहेकिंव्हा "मी कोण आहे"हा शुध्द भाव प्रकट होण्यासाठी निमित्त करून आला आहे. हा पूर्ण खेळ भगवंताचा आहे.

 रूपाला बाहेरची खेच दिली असते शक्तीनेम्हणून दृश्य जग निर्माण करून त्यातच गुंतून राहते. हा झाला शक्तीचा परिणाम. आपल्याला अंतर्मुख व्हायचे आहे आणि त्या क्रियेमध्ये वृत्तीविचारभावना आणि कृती - या सर्वांचा उपयोग आणि परिणाम आचरणात घ्यायला लागतो. अंतर्मुख क्रिया सर्व अंगांवर परिणाम करते. 

 सर्व सामान्य व्यवहारात वृत्ती कुठेतरी सारखी चिकटली असते - ज्याला आपण विषय म्हणतो. त्याने आपण बेचैन राहतो आणि कोडे सोडवण्याचा सतत प्रयत्न करतो. तर त्या चक्रातून पलीकडे होणे किंव्हा चक्र शांत होऊ देणे,  हा अभ्यास सुरू ठेवायचा आहे.

 अस्तीत्व भाव खरा आहे. आपण अस्तित्वात आहोत म्हणजे सारे काही आले. म्हणून नामस्मरण करणे.

 हरि ओम.

  

श्री 

 सोडवण्याचा अट्टाहास असू नये. त्याच्या पायी आपण नवीन संबंध घेऊन येतो किंव्हा निर्माण करतोम्हणून एकंदरीत गुंता _एकाठिकाणाहून निघून _वेगळ्याठिकाणी जातो किंव्हा मुळात "गुंता" ही संकल्पना राहतेच!! म्हणजेच आपण गुंतून राहतो! त्याला प्रपंच म्हणतात आणि तो स्वार्थी वृत्तीमुळे किंव्हा स्वार्थी भावामुळे निर्माण होतो. 

 तसेच त्रासेला काही विशिष्ठ कार्य किंव्हा कृती लागते की नाहीहे मला माहीत नाही. ते होऊ देणे की सोडवण्याची धडपड करणेहे माहीत नाही. ते परिस्थिती आणते का मी निर्माण करतोहे माहीत नाही. परिस्थिती खरी म्हणायची का ती निर्मिती शक्तितून दृश्यात येतेहे माहीत नाही. 

 म्हणजे आपण "स्वस्थ" राहावे काहीही घडले तरीही. गोष्टी होणेयेणे आणि जाणे हा अस्तित्वाचा गुण धर्म आहे - _म्हणजे तो जाणिवेत येणारच.मग का त्रासून घेणे स्वतःला?!!

 हरि ओम.

  

श्री 

 मूळ एकदा कळले की सर्व विघटीत संबंध त्यातून येतात हे कळते. म्हणजे कुठलाही तुकडा स्वतंत्र किंव्हा वेगळा वाटणे हा भास आहे - तो मुळात पूर्णच असतो (म्हणून क्रियाचक्रबदल आणि संबंध) आणि तो पूर्ण माध्यमातून निर्माण झाला असतो. 

 त्या पार्श्वभूमीवर, _निर्मिती क्रियाविघटन होण्याची न समजतातो पूर्णत्वाचा भाग आहे किंव्हा छटा आहे असे ओळखावे. जसं आग बघितलं की गरम वाटणारचत्या प्रमाणे पूर्ण शांती रस अनुभवला तर त्यातून सर्व गुणगतीस्तरस्थितीबदलसंबंध येणारच. जसं गरम वाटण्यास आग कारणीभूत आहेतसे दृश्य भाव निर्माण करण्याचं _कारणआहे भगवंत. हे एकदा ध्यानात आणलेतर दृश्यात बदल किंव्हा घडामोडी खूप त्रास देणार नाहीत. दृश्य भगवंताची सावली आहे - जो पर्यंत भगवंत आहेतो पर्यंत दृश्य असते आणि जी त्याच्यावर पूर्ण अवलंबून राहते. म्हणून त्या सत्याला स्वीकारा. म्हणजेच की सूक्ष्म व्हा. 

 भगवंत कैक पद्धतीने कळता येऊ शकतो. भगवंत कळणे म्हणजेच मन शांत करणेजी प्रक्रिया आहे. त्या कळण्याला कुठलीही स्थितीसंबंधकाळ आणि स्थळ चालू शकेल. तो कुठल्याही साखळी पासून जाणून घेता येतोकारण आपण त्याच्याच घरी आहोत. 

 हरि ओम.

 

Wednesday, December 25, 2024

श्री

 श्री 


माझा उगम मला माहित नाही आणि ते योग्य आहे, असे मला वाटते - त्याचे कारण असे की शाश्वत सत्य काय आहे ह्याचा सतत शोध चालू राहील. त्या शोधामध्ये मी धडपडून जाईन, लागेल वगैरे आणि कुठेतरी श्रद्धेचा उगम होत राहील. श्रद्धा अनुभवणे हे देखील मानवी स्वभावामध्ये येते, असे मला वाटते. हा मार्ग सत्यपणे जोपासला जाईल जर मी मान्य करीन की "मी कोण आहे हे मला कणभर देखील माहीत नाही - ते भगवंताला ठाऊक आहे". I am not any _memory_ born from any phenomenon or any particle. None of the things I own. None of the things are personal belongings. None of the things are personal.

म्हणजे सारे दृश्य आणि मी ह्यात अभेद आहे.

हरि ओम.

श्री

 श्री 


प्रतिक्रिया देणे दृश्यात, हे होणार आहेच, गरजेचे आहे - फक्त ते कुठल्या हेतुतून देतो/ निर्माण करतो हे बघावे. 

शांतीने बघितलं तर सगळं निर्मिती शक्तीमुळे प्रचीतिला येतं, ज्यात अनेक स्तारांचा समावेश असतो आणि ज्याच्यातून भाव निर्माण होऊ पाहतो. भावाला "मी" असे मानून चालतो म्हणून त्या प्रमाणे स्मरण, संबंध, गुंतून राहणे, क्रिया, चक्र ह्याचे परिणाम "मी" भोगतो. 

मी ची उत्पत्ती आणि त्याच स्वरूप गहन आहे आणि ते खूप खोल ठीकण्यातून प्रकट होते. म्हणून ज्याला आपण अनुभव म्हणतो, त्याचा उगम खोल ठिकाणी होत असतो. तिथं पर्यंत आपल्याला जायचे आहे. 

वरील स्वरूप अनेक प्रकारे मानवाला प्रचितिला येऊ शकतं. If one looks at the worldview of ancient cultures or pre modern cultures, one would get to know various ways of perceiving geography or environment and the link or the connections of spirits with the natural phenomena to the cultural and social aspects to the act of doing to living and all the way back to spirits. To a modern mind, this may look weird, but it is *not*. I feel that the same message is possible to attain through the language of modernity, since it is the fundamental nature of the human mind to "become the Truth". 

हरि ओम.

Monday, December 23, 2024

श्री

श्री 

आज मी एक लेख वाचला - *नाम* याचा अर्थ काय. अर्थात, हे माझे विचार नाहीत, ते श्री गोंदवलेकर महाराज यांनी मांडले आहेत, त्यातूनच आणखीन सूचित विचार मांडत आहोत.

रूप, दृश्य, आकार (म्हणजे बाहेरील बदलणारे आणि संबंधित राहणारे कवच) - यांना चालना किंव्हा उत्पत्ती देणारी शक्ती म्हणजे नाम/ भाव/ जाणीव/ क्रिया. 

ती शक्ती असतेच ( _pattern_ of becoming) आणि ती कायम राहते आणि त्यातूनच अनेक आकार आणि परिस्थिती येऊ पाहतात. म्हणून आकार तात्पुरता आहे, त्याला निर्माण करणारी आतील शक्ती विशाल, सूक्ष्म, स्वावलंबी आणि स्थिर असते. कैक लोक, आकार, रूपे, स्थिती आल्या आणि गेल्या - तरीही त्यांना साखळीत ओवून ठेवणारी शक्ती म्हणजे *नाम*. (Phenomenological reality). 

दर रोजच्या जीवनात, इतिहास आणि भविष्य असेलही आणि त्यांचे स्थान असेलही. तरीही त्यांना प्रकट करणारी शक्ती एकच आहे आणि ती स्थळ + काळाच्या पलीकडे आहे, स्थिर आहे, कायम आहे, आनंदी आहे, सूक्ष्म आहे. ती आकाराच्या आत असते आणि तिला बघायला वेगळे डोळे लागतात. 

व्यवहारात, कार्यात, कलेत, अभ्यासात अशी शिकवण आपण देऊ शकतो का? भरभराटीच्या युगात आणि असंख्य बदलांच्या दुनियेत - हे सत्य आपण ओळखू शकू का आणि विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करू शकू का - हा मुळातला प्रश्न आहे. काय शिकवावं आणि कसे - हे नंतरचे ओघाने आलेले प्रश्न आहेत. मूळ प्रश्न काय असावा हे पहिले पक्के ओळखणे आणि त्याप्रमाणे मार्गदर्शन करावे, असे मला वाटते. अर्थात त्यात भीती किंव्हा अहं भाव का असतो, हे ही समजून घेणे - त्याला झाकून टाकणे म्हणजे वेडेपणा ठरू शकेल. 

म्हणून जेवढे आपण स्वतःच्या आत जाऊ (अंतर्मुख) तेवढे आपल्याला त्या शक्तीची प्रचिती येते - तशे आपणही त्यात विलीन होतो. म्हणून बाहेरची _खेच_ नमवणे गरजेचे आहे.

त्यासाठी नामस्मरण.

हरि ओम.

Sunday, December 22, 2024

श्री

 श्री 


आस्तित्व ही क्रिया आहे, कार्य आहे (ते असणार कायम), परिणाम आहे, भाव आहे, जाणीव आहे. म्हणजे त्या शक्तितून जे काही प्रकट होते, त्याला वरील गोष्टी लागू होतात - प्रत्येक गोष्ट "जिवंत" असते आणि बंधनात + संबंधात वावरत असते. 

प्रकट होतांना बंधन आणि संबंध सर्व स्तारांना, आकाराना आणि रुपाना चढते/ आवरण घेते, त्यात मिसळते, ते गुण त्याच्यावर येतात आणि आपल्याला जे दिसते ते दृश्य जग, गती, बदल, गुण वगैरे. 

म्हणून मन असते, वृत्ती, विचार, भावना, शरीर असतात आणि _त्यांचे त्यांचे गुण धर्म_ आपल्या अंगी आपण घेतो. *गुण* म्हणून हा ही शब्द आपण क्रिया, चक्र, कार्य, भाव, दृश्य, संबंध असा बघू शकतो.  प्रत्येक गुणाचा परिणाम असणार. म्हणून सात्विक गुणांच महत्व हे की त्यांनी भाव शुध्द होतो, सूक्ष्म होतो, मन विशाल होते आणि मन स्वतः भगवतस्वरुप होते. 

तो भाव अंगी आणण्याकरिता नामस्मरण करणे असे संताने सांगितले आहे. त्या सांगण्यावर श्रद्धा ठेवून ती क्रिया करायला घेणे.

हरि ओम.

श्री

श्री 


विचार शांत करायला लागतात - याचा अर्थ असा की त्यांच्या पलीकडील क्रिया जाणून घेण्याचे सामर्थ्य संपादन करणे आणि त्या क्रियांना स्वीकारणे. म्हणजे विचार का उद्भवतात, त्याची चिंता न करणे आणि विचारांच्या स्वभावावर अवलंबून न राहणे स्वस्थ राहण्यासाठी. 

स्वस्थ आणि शांत हा सूक्ष्म स्थितीतील भाव आहे, ज्याच्यातुन विचार स्थिती उद्भवते. प्रत्येक स्थितीचा परिणाम असतो, ज्यावरून स्मरण होते. विचार तात्पुरतेपण, अपूर्ण अशी भावना जागृत करतात किंव्हा त्या पद्धतीची जाणीव ठेवतात. कुठलीही अस्तित्वाची स्थिती वृत्ती, विचार, भावना - यांचा समावेश असतो, किंबहुना त्या पद्धतीने साकार होऊ पाहते. म्हणून त्या स्थितीच्या _पलीकडे_ होणे हे सर्वांगीण चिंतन करण्याचा विषय आहे, जो फक्त बुद्धीच्या तर्काने होत नाही. म्हणून शरण जाणे आवश्यक ठरते. त्यालाच गूढता म्हणत असावे आणि त्यालाच "मला काहीही माहीत नाही" किंव्हा " भगवंताची इच्छा " म्हणत असावे. 

शांत होऊ पाहणे म्हणजे पळवाट नाही किंव्हा कोडे सोडवणे असाही नाही. विचारांच्या भाषेत विचार सोडवणे अशक्य. त्याला श्रद्धा वाढवणे जरुरी आहे. त्यासाठी नामस्मरण.

हरि ओम.


श्री 

भगवंतावर श्रद्धा म्हणजे परिस्थिती, जी विचारांच्या बळावर जाणिवेत येऊ पाहते, त्याच्याही पलीकडे घडामोडींवर स्वस्थता राहू देणे. म्हणजे फक्त विचारांवर ध्यान मर्यादित न राहू देणे आणि विचार जरी काहीही म्हणत असतील किंव्हा जाणिवेत आणत असतील, तरी त्याने बेचैन न होऊ देणे आणि त्यावर उगाचच पटकन प्रतिक्रिया न देणे - म्हणजे वृत्तीला प्रतिसाद न देणे. थोडक्यात मी ची व्याख्या अधिकाधिक सूक्ष्म करत राहणे, म्हणजे स्वार्थीपणा कमी करणे, अहं भाव नमवणे. 

याने काय होते की विचार नंतर उमटत नाही, किंव्हा विचारांची गरज राहत नाही. आणि याने शांतता लाभते.

हरि ओम.

Thursday, December 19, 2024

श्री

 श्री 


आपण चिंता किंव्हा विषय का ध्यानात आणतो, हे कारण गूढ आहे. त्या गूढ कारणला भगवंताची इच्छा आपण मानतो, अंतर्मुख झाल्यावर. अंतर्मुख होणे आणि त्यावरून आपण कसे होतो, घडतो, संबंधात राहतो, वावरतो हे विचार ध्यानात येऊ पाहतात. ते अभ्यासाने जोपासले तर सत्याचा शोध सकारात्मक होऊ पाहतो. ती विशिष्ट शैली घेऊन आपण आलो आहोत, म्हणून सर्व अनुभवांचा अर्थ, निर्मिती, संबंध - याचे विचार येणारच. ते डावळून पळवाट पकडण्या सारखे आहेत. तसे ही लोक करतात - तर ते त्यांना करू द्यावे, कारण न जाणो कधी सत्याचा प्रकाश ध्यानी यावा!

त्यातील एक गोष्ट अशी की मन आणि अस्तीत्व भाव हे काय आहे? मन अस्तीत्व माध्यमातून येत म्हणजे नेमके काय? आणि त्यातून स्मरणाची व्याख्या कशी बदलू पाहते किंव्हा कार्य करते किंव्हा घडते? 

या प्रश्नांचे उत्तरं जाणिवेतून येतात. ते येणार. त्याला येऊ देणे आणि तसा प्रवास स्वीकारणे - म्हणजे पूर्ण श्रद्धा ठेवून प्रत्येक टप्प्यातून काय पुढे होईल, याची काळजी करणे *बंद करणे.* वेगळेपणामुळे होणारी काळजी *बंद करणे.* भावनेतून आणि बदलणाऱ्या वृत्तीतून घडणारी काळजी *बंद करणे.* 

बुद्धी किंव्हा आपले सारे रूप "काळजी" करते, कारण ते विषयात स्वतःचे अस्तीत्व किंव्हा सिद्धतव बघते. म्हणून तेच तेच विषय प्रकट करत राहते. विषय सूक्ष्मातून उद्भवते आणि स्थुलात आकारात येते. म्हणून कुठल्याच गोष्टीची शाश्वती, येणे आणि जाणे आपण ठरवू शकत नाही. त्यांनी अजिबात चिंता न करणे, कारण चिंता कधीच संपत नाही आणि ती एका विघटित भावनेतून आली असते. 

म्हणून स्वच्छ पारदर्षकतेने कृती करणे महत्वाचे आहे. तो भाव आहे. त्यानेच आतून आपण शुध्द आणि शांत होतो. कृती कसे करावे, हे बाहेरील गोष्टींवरून ठरतं नसते (त्यात आपल्या वृत्तीमुळे भेसळ पद्धतीने परिस्थिती दिसते) - ते "योग्य काय करावे" याने ठरलेले असावे. योग्य जर गोष्टी केल्या, तर मन सूक्ष्म होऊन, समवेदशिल होते, शांत वाटतं, श्रद्धा वाढते आणि स्वार्थीपणा गळून पडतो. त्याच्या उलट संकुचित भाव निर्माण केला, तर त्याचा संस्कारांमुळे आपल्याला सतत त्रास आणि घाबरणे हे हाताळायला लागत. सर्व वृत्तीचा खेळ आहे. 

आपल्याला जो जन्म दिला आहे, तो चिंतेत राहण्यासाठी नाही - तो सत्य होण्यासाठी दिला आहे - हे अगदी मनात पक्के धरणे. एकदा हे पक्के केले (त्याला ही प्रवास आहे) की प्रारब्ध काहीही असो, त्याने घाबरणे होत नाही. 

हरि ओम.

Wednesday, December 18, 2024

Shree

 Shree 


कधी शांती रस अनुभवात निर्माण होईल तो प्रश्न काळाच्यावर सोडणे, असे वाटते. इतर गोष्टी कळत नाहीत आणि आपल्याला वेगळेपण वाटतं राहते - यातच सर्व गोष्टी आल्या आणि यातच शांतीचा भाव दडलेला आहे. _दृश्य_ हा आपला मार्ग अस्तीत्व जाणून घेण्याचा. म्हणून दृश्याचे स्थान आणि त्याचे परिणाम डावळून नाही चालत. दृश्य भगवंताच्या शक्तितुन येते, म्हणून त्याचे प्रयोजन असेलच आपल्या प्रगतीसाठी आणि भगवंताला भेटण्यासाठी. ते कसे, हे त्याच्यावरच श्रद्धेने सोपवावे. 

आपण दृश्यात वावरण्याचा न कळत परिणाम असेलच. ते स्वीकारावे आणि चिंता करू नये. गुण आणि अवगुण घेऊन आपण कार्यात वावरतो आणि ते ही एका सूक्ष्म स्थितीतून आलेले असते. जसे आहोत, तसे चक्र निर्माण करत काही परिस्थिती अनुभवात आणतो, बदल बघतो, आणि गुंतून राहतो. हे होणार. ते स्वीकारावे आनंदाने - म्हणजे कष्टी किंव्हा त्रागा न करता.

हरि ओम.

Shree : doubt

 Shree : doubt


I doubt. Why I do so, I don't know. Is doubt dependent on anything? Perhaps no. 

All these years i was thinking of removing the doubt by knowledge or thoughts or variables etc...so emphasis on perfection etc. or by past life impressions or through past failures or philosophy.

I think doubt needs to only be observed without reacting or holding onto it or be fearful of it or not judging the self by unable to talk about it....

This has got nothing to do with self love. Mind's patterns are not the conditions to love the self!.... *सिद्ध असणे हे विचारांच्या रचनेतून आधारलेले नसते.* म्हणून कुणी काहीही म्हणो किंव्हा काहीही घडू, त्याने विचार रचना अशी करू नये की ते मर्यादित होईल, तात्पुरती वाटेल आणि त्यातून आपण घाबरट बसू. क्षण विचारांना अर्धवटच वाटेल, जर जाणीव मर्यादीत असेल. तो क्षण भगवंताने दिला आहे, अशी जाणीव व्हायला हवी. So relax. देवाकडून चांगले होईलच..

Hari Om.

 Shree 


Every act, thought, connection, feel, word, tone, pace, texture is tendency or pattern specific and interconnected with everything else. Visibility is the last changing state of Being, and it has many invisible states informing this visible dimension and meaning generation. 

Evaluation or judgement of the above phenomenon is pointless and doesn't generate peace, since the judgement seems to be governed on our flawed assumptions. We think we know enough or everything, but actually we don't know anything at all - about perception, memory, awareness, process, Being...we don't know frankly. So we end in loops of arguments. 

Therefore one would relax if awareness changes to the Truth. Who makes things, informs them?! Definitely I don't! I am made, so I am relative and I am nobody to judge anything or anyone.

Hari Om.

Sunday, December 15, 2024

श्री

 श्री 


वरील लेखावरून खूप भावना आपण सादरी करू शकतो...

आत काय चालू असते आणि त्या भावनेतून होणारे क्रिया आणि अपुरेपणामुळे मन कुठेतरी शाश्वत आधार घेण्याचे बघते. त्यातूनच भावना, चक्र, वस्तू, परिस्थिती, अपेक्षा आपण धरून ठेवतो - संकल्पना अशी की एखादे काम केलं, कृती केली, ताबा मिळविला की शाश्वत आनंद मिळू शकेल किंव्हा "सुरक्षित" वाटेल. हे प्रकरण खरंच गूढ आहे, ज्याला उत्तर नाही - म्हणूनच त्यावरून गोष्टींचे येणे, वावरणे, गुंतून राहणे, जाणे, दुःख होणे वगैरे अनुभवात येत राहतात. त्यातून असे बघावे की आपली वृत्ती कुठे चिकटून राहते आणि तिच्या या वागणुकीला स्वीकारून हळूवार पद्धतीने शुध्द जणीवेकडे वळवावी. म्हणजेच की सिद्ध होण्याची क्रिया काहीही करण्याने होत नाही, ती स्वतः सिद्ध असते. त्यासाठी कुठल्याही विषयाला चिकटण्याची गरज नाही सुरक्षित वाटण्यासाठी. 

विषय, जे वृत्तीतून येत राहतात ते बदलणारे असतात, कारण शक्तीचा गुण असतो तो. त्यातून एक प्रकारचा भाव होतो, ज्यात "आपले" मन आणि दृश्य हे दोन अंगे आहेत. म्हणून वृत्ती शांत झाली तर आपल्याला स्वस्थता येईल. 

तात्पुरतेपण धरल्यामुळे, ते नाहीसे करण्यास संकल्पनांना आपण धरून राहतो - पूरक होण्यासाठी. त्यातून ममत्व, माया, अहं - हे गोष्टी येतात. बघून, ऐकून, बोलून, वागून आपण दुखावतो किंव्हा सुखावतो. कुणी काही बोललं तर मनावर आघात होतात. ते का होत असेल, याचा विचार करावा. आपण का दुखावतो, त्याच्या पाठीमागे काय काय दडलेले असते म्हणून त्याला इतकं प्राधान्य दिलं जातं?! हे ही शांतपणे समजून स्वीकार करणे. त्यातून शांत होण्याचा मार्ग उलगडेल. 

आपल्या भोवतालची कुठलीही गोष्ट स्थिर असतं नाही, की आपणही नाही आणि प्रकट पाहणाऱ्या वृत्तीही नाही. त्याची भीती वाटते कारण हे सर्व काही असुरक्षित भाव निर्माण करते. त्याचा परिणाम असा की आपण स्वतःवर किंव्हा पर्यावरणावर ताबा मिळवण्याचा दाटून प्रयत्न करत राहतो. निष्पन्न काही होत नाही, कारण त्या वृत्तीतून शाश्वत शांती कुठे मिळते?! If one considers the history of "mining" it can suggest clues to the extent of exploitation we cause to our selves and environment. But we don't stop! 

तात्पुरतेपण स्वीकारणे - ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. की अस्तीत्व म्हणजे "मी" नाही; ती असतेच; तिचे कार्य होत राहते; ती बदल आणते - मग कसला तो अट्टाहास ताबा मिळवण्याचा?! सर्व भगवंताची शक्ती करते, तर त्यावरून तिचे प्रयोजन निश्चित असेलच आपल्या भल्यासाठी ही. अशी श्रद्धा हवी.

बुद्धिमुळे किंव्हा रूप धारण केल्यामुळे आपल्याला सत्य बदलणारं, साखळी प्रमाणे, गुंतलेले आणि "एका वेळेला एकच" या पद्धतीने दिसतं आणि अनेकपणा, विघटित वावर आणि संबंध जाणिवेत येतात. जे दाखवते आणि पुसून टाकते - हे दिव्य कार्य आहे. ते न स्वीकारल्यामुळे आपण बेचैन होतो आणि असुरक्षित वाटून घेतो. तसे वाटून घेण्याची गरज नाही. भगवंताचे नामस्मरण केल्याने आतून मनोरचनेची धारणा बदलू पाहते आणि त्यामुळे सत्य उमगते. 

प्रेम सर्व अस्तित्वाच्या रुपांवर करावे. हे नको, ते हवे, किंव्हा हे करू ते करू, हे असे ते तसे - त्यातून समाधान नाही. प्रेम करणे शिकायला लागते. तो भाव प्रकट करायला लागतो. उपजत भाव अस्तित्वाचा असतो, पण सत्य माहीत नसल्यामुळे आपण भरकटतो. प्रेमाने, नामस्मरणाने आपण शांत होतो.

हरि ओम.

श्री

 श्री 


अस्तित्वाचा एक गुण म्हणजे *मन* निर्माण करणे. मनाचा स्वभाव असा की ते कशाला तरी धरून ठेवते आणि त्या भोवती सारे अर्थ निर्माण करते. त्यातूनच आपली वृत्ती, स्वभाव, गुण - अगुण, इच्छा, आकांक्षा, सुख - दुःख हे सारे संकल्पना होतात ज्याला आपण धरून राहतो. साऱ्यांचा मूळ स्पंदनेतून आहे आणि जसे ते होत राहते, तसे आपण होतो, स्वभाव बनतो, रूप धारण करतो. 

सांगण्याचे तात्पर्य हे, की त्यामुळे नेहमीच तत्पूर्तेपण किंव्हा अपुरेपण पदरी पडते - कारण जो पकडला आहे तो एक मर्यादित आणि परावलंबी असलेला _धागा_ आहे, ज्यावरून इतर सारे गोष्टी "वेगळ्या" भासत राहतात. तो पकडलेला धागा कायम राहण्यासाठी इतर परिस्थिती तशीच राहायला हवी, अशी अपेक्षा आपण बाळगतो आणि आटापिटा करत राहतो! त्याने त्रास आणि चिंता निर्माण होते. 

वरील प्रकरण महत्वाचे आहे, कारण त्यातून हे दिसून येते की "मी" कुठल्यातरी विषयाला, चक्राला, क्रियेला, वृत्तीला, आकाराला, संकल्पनेला _चिकटून_ राहणार, मग कोणी काहीही म्हणो! म्हणजे तसं बघितलं तर आपण फक्त स्वतःसाठी जगतो! कुठल्याही एका धाग्याला पकडणे म्हणजे "स्वार्थी आणि अहंकारी" असणे, असे संबोधित केले आहे. तो गुण धर्म आहे, त्या शिवाय जगाच्या अनुभवाचे महत्व कसे मिळणार?! 

दुसरी गोष्ट अशी, की पकडणे बऱ्याच स्थितीत असते, म्हणून आपण बाहेरील वस्तू (दृश्यात दिसणारी वस्तू) जरी सोडली, तरी आतील त्या वस्तूचे स्पंदने कदाचित सोडलेही नसतील! म्हणून त्या स्पंदनातून परत परत त्याच प्रकारचे वस्तू किंव्हा परिस्थिती उद्भवत राहील! याचा अर्थ असा की जो पर्यंत आपण वृत्ती सोडत नाही, तो पर्यंत दृश्याचे अनुभव येणार. 

धरण्याची ओढ गूढ आहे, वरवरची नाही. ती ओढ भगवताकडून येते, म्हणून तो गुण आपल्याला दिला आहे. आता प्रश्न असा आहे, की कुठल्या तत्वाला मग धरून ठेवायला हवे? अश्या तत्वाला की ते कायम, शाश्वत, शांत, स्वावलंबी असेल. ती म्हणजे शुध्द शक्ती, जी कायमच आहे - प्रत्यक्ष भगवंत आहे. म्हणून नाम साधना करावी, म्हणजे त्याला धरून आपले सारे वृत्ती शांत होऊ पाहतात आणि जे राहते ते म्हणजे फक्त अविनाशी तत्व.

हरि ओम

श्री

 श्री 


दृश्याचा भाव आणि परिणाम याची अजिबात जरुरी नाही सिद्ध व्हायला! आपण - म्हणजे अस्तीत्व - स्वतः सिद्ध आहे, म्हणून त्यासाठी कुठल्याही वृत्तीची, वासनेची, आकाराची, चक्राची, कारणची, स्थळाची, स्थानाची आडकाठी लागत नाही. कार्य कसे करावे - हे ही त्याने योजिले आहेच - तर आपण का विचारात गुरफटून जावे?! आपण स्वतःला पक्के म्हणावे की काहीही हो, कुठल्याही गोष्टीचा विपरीत परिणाम मी स्वतःवर होऊ देणार नाही. म्हणजेच की भगवंताचे प्रेम मिळवणे. 

I remember a reference to a book on _Clutches in Architecture_ (or etc.) and perhaps it maybe argued in the book that the core value of architecture is way beyond any kind of justification used to create it - this means core value is fundamental to all and is beyond the weathering effects of space and time, so to say. 

 *प्रेम* हे एका प्रकारचे चक्र किंव्हा क्रिया आहे - स्पंदनेतून प्रकट होणारी. सर्व वासना भगवंताच्या प्रेमाकडे वळवावे म्हणजेच तेच स्पंदन येऊ देणे. जगाची निर्मिती आणि त्यातील *संबंध* स्पंदनांच्या द्वारे होऊ पाहते आणि त्यात आपल्याला इंद्रियांच्या दिशेने नेते. स्पंदन हे शक्तीचे कार्य आहे, म्हणून ते होत राहणार. 

प्रेम करणे महत्वाचे का आहे कारण ते जाणिवांना सूक्ष्म करू पाहते आणि शुद्धतेकडे नेते. जाणीव सूक्ष्म होणे म्हणजेच शुध्द, निऱ्हेतू प्रेम प्रकट होऊ देणे. त्यासाठीच आपले सारे अंग वापरणे - वृत्ती, बुद्धी, भावना, शरीर. 

हरि ओम

Saturday, December 14, 2024

Shree

Shree

Understanding or realizing the awareness of *balance* is probably the idea of being involved in the world of phenomena. 

In other words to realise that the phenomena have states of invisible to visible and all perceptions, imaginations, feelings, actions are informed from this reality. 

Naturally one expresses a pattern of those states but that expression causes one to lose awareness of the ultimate reality. The reality one therefore perceives is relative, changing, dependent and limited and temporary. That creates friction, stress, pain, struggle - as an experience - within and outside. The search therefore sets in to become full of balance again and let all struggles as felt - dissolve. 

The problem with the intellect (as one of the multitude of forms), is it _insists_ on causality and to make things explicitly seen to be trusted upon. That causes certain _assumptions_ of how reality ought to occur and behave!! 

But if the awareness realizes that billion invisible things exist and through some mysteries of actions, they interact or connect to make the visible dimension apparent for us, then we will know that the visible represents not the entire reality, but only a figment of the Truth's character. Then that will again change our perception of _looking at things and reality._ 

म्हणजेच की अस्तित्वाची स्थिती हा भाव आहे आणि त्या भावावरून आपण होतो किंव्हा संबंध निर्माण होतात. अस्तित्वाची जाणीव आणखीन खोल किंव्हा सूक्ष्म झाली, तर त्याचा अर्थ अजून बदलत राहील. हेच जाणून घ्यायचे आहे.

Hari Om.

श्री

 श्री 


क्रिया जाणिवेत _भाव_ (awareness) प्रकट करते, परिणाम देते, अनुभव देते, चक्रात गुंतून ठेवते वगैरे. 

क्षण बघितला तर इंद्रिये, स्थळ, काळ, विचार, भावना, मन, संकल्पना, इतर आकारांशी _संबंध_ आणि बदल या गोष्टी जाणिवेत शिरकाव करत राहतात. जाणीव अशी आहे की विघटित स्थिती करून संबंधित राहते - *संबंध* राहतो. 

हा संबंध खूप खोलवरून प्रकट होतो, म्हणून एके ठिकाणी जरी बसलो तरी संबंधांचे स्पंदन प्रकट होत राहते. _हेच शक्तीचे असणे, वावरणे आणि कार्य करत राहणे आहे._ 

शक्ती खरी भगवंताची आहे, अस्तित्वातील आहे, ती आहेच. म्हणून कार्य होत राहणे आहे, संबंध होत राहणे आहे. फक्त संबंधांचे रुप काय, हे आपल्या हातात उल्गडण्याची गोष्ट आहे - तशे प्रयत्न करत राहणे. माझ्यासाठी हा प्रश्न आहे - कदाचित सिद्ध होण्यासाठी - तरीही या प्रश्नाला ओलांडून "मी फक्त आहे" - असे जाणवले हवे.

हरि ओम.

श्री

 श्री 


कुठल्याही धाग्या बरोबर धावणे - हे गुंतून राहण्याचे लक्षण आहे - तो धागा कुठलाही असो - वैचारिक, भावनिक, शारीरिक - अगदी कुठलाही. कारण त्यातून वेगळेपण आणि तात्पुरतेपण सरत _नाही_ आणि ही _क्रिया_ एकंदरीत वेगळेपणाची भावना घेऊनच निर्माण होत राहते आणि प्रज्वलित राहते! एखादा भाव अस्तित्वात असला, तर त्यातून अनेक चक्र कार्य करत राहतात - ज्याला "मी" असे मानतो. आणि त्या धाग्याचे संस्कार होत राहतात.

म्हणून अस्तीत्व *धागा नाही* हे ओळखणे आले. म्हणजे *शांत होणे* हे अभिप्रेत आहे. म्हणजे अस्तित्वाला जीवाच्या भावाची, चक्राची, आकाराची गरज लागत नाही. 

म्हणजेच की अस्तीत्व असतेच! ते स्वतः सिद्ध आहे. 

हरि ओम.

श्री

 श्री 


चिंतेने कोडी सुटत नाहीत. आकार निर्माण करणे हा हेतू असू नये - आणि ते कुठल्याही वृत्तीने होत राहते आणि संबंध, तात्पुरतेपण, अपुरेपण प्रकट करत राहते. 

म्हणून सिद्ध होण्याचा भाव, वेळेची कमतरता आणि बदल - या गोष्टींना कितपत प्राधान्य देत राहणे हे स्वतः विचार करणे. कारण सिद्ध होत राहणे आणि त्यावरून कार्याची व्याख्या ठरवणे हे योग्य नाही शांती अनुभवण्यासाठी. 

आपण मुळातच शांती स्वरूप आहोत, मुळातच असतो, मुळातच अस्तीत्व भावातून आलो आहोत, तर आपण हे का विसरतो?! हा प्रश्न आत खोल नेणे गरजेचे आहे. आत नेतांना त्याचे परिवर्तन होईल हे ही ध्यानात राहू देणे. म्हणजे आतून पूर्ण परिवर्तन होऊ देण्याला स्वीकारणे.

हरि ओम.

श्री

 श्री 


संबंध, वेगळेपण, साखळी, अर्थ हे असणार. संबंध आणि त्यातून होणारा अर्थ हे खूप खोलवर सुरू होते आणि त्यातून _होणारे रूपं_ अनंत आहेत. _Forms_ of becoming. 

म्हणून _आकाराला_ आपण दृश्य म्हणतो, किंव्हा क्रिया, किंव्हा मुळची शक्ती किंव्हा जाणीव किंव्हा शुध्द अस्तीत्व. म्हणजेच की आकार घडते क्रियेतून आणि एका माध्यमाच्या अस्तित्वामुळे. ते गुंतून राहते, बदलत राहते आणि निघूनही जाते. ते जसे भासते त्यावर आपली वृत्तीही या क्रियेवर लक्ष केंद्रित करते. किंबहुना वृत्तीचा स्वभाव आकार _प्रकट_ करतो. जे इंद्रियांना खरे वाटते किंव्हा त्यावर आपण प्रतिक्रिया निर्भर ठेवतो, त्याचे मूळ बाहेर नसून आत खोल ठिकाणी आहे. त्याला वृत्ती म्हणतात. 

शुध्द होण्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणजे वृत्तीने जे भासते किंव्हा प्रकट होते, ती शक्ती शांत करणे. शांत करणे म्हणजे पुसून टाकणे किंव्हा निघून जाणे, असे ढोबळ अर्थ घेऊ नये. चिंता ही देखील वृत्ती आहे, जिच्यामुळे आकार होत राहतात. आकाराला किंव्हा संबंधातून चिंता होते असे मानणे म्हणजे फसल्यासरखे आहे. The realisation of self worth is not to be dependent on any  phenomenon. निर्मिती होणे किंव्हा करत राहणे म्हणजे आपण ठरतं नाही किंव्हा सिद्ध होत नाही. 

शक्ती किंव्हा नाम हे स्वतः सिद्ध आहे - त्याला कसलेच कारण लागत नाही. स्वतः सिद्ध हा स्थिर असलेला भाव आहे आणि तो अनुभवही आहे. तो आत्मसात व्हायला सर्व वृत्तीना शांत _होऊ देणे_ हा मार्ग आहे. 

हरि ओम.

Tuesday, December 10, 2024

Shree: Memory

 Shree: Memory

Existence, in other words, means memory born out of awareness. Memory is created from a pattern of becoming. This pattern creates space and time. This memory may mean collective values, mythology, behavioral environment, perception, social relations, other forms, connections, and idea of time, actions, and anything that becomes a trigger. One can therefore see space or time as a memory of connections or to realize our place ‘here’. I see an object with some material, colour, texture, size; I use the object or the space; I interact; I hear, smell, touch, taste; I walk; I listen and speak; I feel the air, clouds, sun, shade, trees, river, mounds, and so on -  all of this generates something in me. The object or space or time is “alive” as much I am – the aliveness is in the connection which gets forged within and outside.

Therefore, are the objects or spaces traces or remnants or indicators, or triggers or connections or divine or subjective or individual or flows or change or temporary or generational or cyclic or shared or collective or anything more?

Hari Om. 

श्री

 श्री 


भगवतस्वरुप भाव सर्वांगीण संपादन व्हायला श्रद्धेचा उपयोग करायला लागतो. श्रद्धेने जीवाची शक्ती शांत होते आणि शुध्द शक्तित - म्हणजे भगवतात - विलीन होते, एकरस होते. 

बुद्धीने विघटित स्वरूप, अनेक स्तर, गुंतागुंती, स्थिती, संबंध, बदल, परावलंबंचे स्वरूप, भावाचा अर्थ - या गोष्टी कळून येतात. पण त्यातील कुठलाही एक घटक असा वेगळा काढता येत नाही, जेणे करून सगळ्या कोडी सुटतील. It is not a tree diagram or any branching pattern. A tree or a branch is a snapshot of a reality, but not the complete feel of existence. म्हणून बुद्धीने वेचून काढण्याचा प्रयत्न टोकाचा जरी घेतला तरी कदाचित त्याला मर्यादा जाणिवेत यावे. मर्यादा या करिता की बुद्धीचे गुण आणि पद्धत सर्वांगीण नाही ठरतं अस्तीत्व जाणण्या करिता. भगवंताची शक्ती बुद्धी पेक्षाही सूक्ष्म आहे आणि हेतुरहित आहे. ते जाणिवेत आणण्यासाठी बुद्धीला शांत करावे लागते. 

शांत करणे ही क्रिया जरी वाटली, तरी तो परिणामही आहे, भाव आहे, सत्याचे दर्शन आहे, मुळाची जाणीव आहे, स्थिरता आहे. 

ते श्रद्धेने होते असा संतांचा शब्द आहे.

हरि ओम.

Shree

 Shree

Rupture from the Whole is there just as the Whole is there – the phenomenon will keep happening. In this action of rupture countless things, forms, states will emerge and be dependent on one another. In this, the idea of vibrations, tendencies, patterns, connections and principles will also be realized by the human form. This is to be considered as our journey of feeling ‘complete’.

The position of existence can be seen as an instant (reaction) or a history (pattern and connection) and the inquiry of ‘who am I’? The idea of ‘I’, to be realized, is none of the instant or a pattern, but only of Being and Existing. Understanding any pattern is not the same as realization, since understanding has a motive but realization doesn’t.

In today’s times, every second is to be reviewed and analysed and judged and in this craze of doing, we end up micro planning and that also ends up in high levels of hierarchical structures, dependencies till the system sounds burdensome, frighteningly silent and control freak and recklessly unaccountable at an intuitive level. We are ironically plagued by this system based development of the world, where it seems no one really cares what’s happening and even if one cared, one doesn’t really know how to initiate any collective action! We have come a long way from ‘The Fall of a Public Man”!...

Hari Om. 

श्री

 श्री 


असंख्य क्रिया सर्व स्तरात एकाच वेळेला होत राहणे आणि त्यावरून अनंत भाव, जीव, रूप, आकार निर्माण करत राहणे, त्यांना गुंतून ठेवणे आणि अनुभव निर्माण करणे - ही भगवंताची शक्ती आहे. ती शक्ती भगवंताच्या अस्तित्वामुळे प्रकट होते, विघटित होते, कार्यात राहते, संबंध निर्माण करते, भाव चक्र निर्माण करते आणि अनुभव देते. 

हे प्रकरण विलक्षण आहे आणि त्यांचा परिणाम स्पंदनेपासून ते विचार चक्र ते आकार असा प्रकट होतो किंव्हा अस्तित्वात येतो. आपण हेतू - हेतू म्हणून धडपडत राहतो, पण हे विसरतो की हेतू संकल्पना ही निर्माण झालेली आहे भगवतामुळे. स्वतःच मूळ शोधायचं असेल किंव्हा जाणून घ्यायचं असेल, तर ते मूळ भगवंत आहे. मूळ ही गोष्ट सुरुवात नाही - ती "आहेच" किंव्हा "असते" असे ओळखणे, म्हणून त्या असण्याला काही हेतू नाही. म्हणजेच ती स्थिती स्थिर आणि कायम आहे आणि शांत आहे. 

आपण खूपच वृत्तीला धरून ठेवत असतो - वृत्ती प्रकट करत राहतो, म्हणजे वासना तशे निर्माण होऊ देतो, म्हणजेच काहीतरी वासनांना प्रकट व्हायला कारण होते. हे कारण गहन आहे, आणि खूप काळापासून त्याला भट्टी मिळत आहे. त्या भट्टीचे कारण जरी शब्दात मांडू पाहिले तरी ते समाधान देईल असे नाही, किंव्हा त्याने मार्ग सापडेल असे नाही, किंव्हा त्यातून त्याचे उत्तर मिळेल असे नाही, किंव्हा त्यातून पुर्णतः स्थिती प्राप्त होईल असे नाही. 

भट्टी जी निर्माण झाली आहे - मग त्याचे कारण कोणतेही असो आणि कोणीही करो - ती शांत व्हायला हवी. जर भट्टी निर्माण व्हायला कारण नसेल किंवा हेतू नसेल, तर शांत होण्यासाठी कारण का हवे? म्हणजे शांती रस कारणांच्या पलीकडे असते - कारणांवर अवलंबून नाही, जर - तर वर निर्भर नाही, कृतीवर अवलंबून नाही, उत्तरांवर निर्धारित नाही, व्याख्यांवर आणि स्पष्टीकरण देऊन सापडत नाही, माझ्यावर निर्भर नाही - म्हणजेच की ते असतेच आणि ती नैसर्गिक अस्तित्वाची अवस्था आहे. म्हणून सर्व बाजूला सारून, काय वाटते त्यावर काही लक्ष न देता, नामस्मरण करावे.

हरि ओम.

Saturday, December 07, 2024

श्री

 श्री 


संबंध आत्ताच्यासाठीचे सुरुवात होऊन खूप गहन आणि खूप काळ चालू असतात जाणिवेत. त्या संबंधांचे रुप देखील प्रत्येक स्थितीत वेगळे असतात आणि एकंदरीत साखळी तैय्यार करतात. 

त्याचा अर्थ असा की कुठल्याही कृतीचा परिणाम खूप काळ चालून आलेला राहतो. त्यावरून कृतीचे मर्म ओळखणे महत्वाचे ठरते. 

मी म्हणेन की चांगल्या कृती करत राहणे कारण त्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी, केव्हातरी, कुठल्यातरी रुपात प्रकट होत राहतो. 

म्हणून भगवंत भावाचे स्मरण करणे कारण त्यातून स्वार्थी हेतू शांत होऊन, सूक्ष्म स्थिती आत्मसात होते आणि तशे कृती आपण करतो - त्या भगवतस्वरूप स्पंदनातून.

हरि ओम.

Friday, December 06, 2024

Shree

 Shree

Proof or justification comes with energy which feels incomplete about itself. So the action of energy is created whenever there is a disconnection or fragmentation from the Whole. This means that a form seems to be created whenever a rupture or a separation happens from the Whole. The Whole is always there and complete. Creation of the world happens by rupturing from the Whole or separation or moving away from the Whole.

Movement, away, link, connection, change – are all signs of transformation brought within the Whole of medium. The moment a ‘thing’ is ruptured, a form of movement or connection ‘appears’ and it creates its own momentum of connection, feelings, thoughts, and actions. Hence the journey is to realize the Source and not to identify with the state of rupture.

Hari Om. 

श्री

 श्री 


वेगळेपणामुळे धडपडत राहण्याची वृत्ती असते. वृत्तीला शांत किंव्हा पूर्ण भाव देणे महत्वाचे आहे. वृत्तीचा स्वभाव, किंव्हा कुठल्याही रूपाचा स्वभाव परावलंबी असणे, संबंधित राहणे, बदलणे असा असतो, म्हणून त्यातून निर्मिती होत राहते, आकार येत राहतात आणि त्यांचे परिणाम होत राहतात मनावर. वृत्तीच्या प्रभावाखाली राहिलो, तर त्यातून खूप गोष्टी जतन कराव्या, साठवून ठेवाव्यात, मिळवाव्या असे काहीसे कृत्य आपण करत राहतो. खूप सत्ता मिळाली किंव्हा सुख देणाऱ्या गोष्टी मिळाल्या तर कायमचे सुख मिळेल अशी कल्पना आपण करतो - पण ते सर्व नाशवंत असते, बदलणारे असते. याचाच अर्थ की समजूत खोटी होती आणि खरे कार्य भगवंताच्या शक्तीचे होते, आपले नाही! जगात सर्व गोष्टी गुंतलेल्या आहेत आणि बदलणाऱ्या आहेत आणि अस्थिर आहेत - तसेच आपले रूप आहे आणि विचारांची दिशा आहे. म्हणून अपूर्ण वाटणे ही मनाची धारणा आहे, सत्य नाही. 

त्यातून मग पूर्ण भाव होण्याचा प्रयत्न करणे आवश्यक. त्यासाठी श्रद्धा. श्रद्धेने शांती रस प्रकट होईल.  शांतितून प्रतिभावंत विचार येऊ पाहतात, जे मर्यादित असतं नाही. काळजी नसावी. दृश्याचा संबंध विचारांनी भगवंता पर्यंत पूर्ण नाही नेऊ शकतं. म्हणून कृपा लागते. सरळ काहीच नाही, त्वरित काहीच नाही, जे दिसते तसे त्याचा अर्थ लावण्याची धडपड असू नये. काहीही करण्याची धडपड असू नये. 

संबंध युगानुयुगे असतात गोष्टींशी. म्हणून शुध्द होणे ही गूढ क्रिया आहे जिला खूप काळ लागू शकतो. सैय्यम ठेवा. 

हरि ओम.

श्री

श्री 

सर्व गोष्टी सांगणे आणि ते सांगताना स्पष्टीकरण देणे किंव्हा हेतू दर्शवणे याची गरज नसते. गोष्टींचे होणे ही सूक्ष्मातून होणारी क्रिया स्वीकारली हवी, म्हणजे त्याला माप - दंड, रंग, गुण, तर्क या सर्व चौकटीत मांडू नये. आपण त्याला मांडू इच्छेतो कारण तसा आपला भाव असतो. _वेग_ ही अशी संकल्पना आहे की गोष्टी ध्यानात येणे आणि त्यावर प्रतिक्रिया किंव्हा संबंध जोडणे हे एकाच वेळेला घडणारे क्रिया आहेत. म्हणून गोष्टी "कोणत्या किंव्हा असायला हव्या" असे काही तर्क असू नये. जर अस्तित्वाचे कार्य असतेच, तर त्यातील कुठल्याही संकल्पनेचे होणे - गोष्टी आणि संबंध - ही दैवी प्रकट होणारी क्रिया आहे. म्हणजे त्याला "भेट" म्हणून बघणे.

गोष्टी गोल असतात, बदलत राहतात, ते येतात आणि जातात. म्हणून पक्के असे काहीही नसते आणि धरून ठेवण्याची गरज नसते. आपण पूर्ण असतोच. भगवंत सगळीकडे भरलेला आहे. त्यात अनेक स्तर, स्थिती, आकार निर्माण होत राहतात आणि ते गुंतून राहतात, येतात आणि जातात. हे सारे भगवंताचा विलास दर्शवतात. म्हणून परिस्थिती काहीही असो, आपण भगवंताच्या घरी असतो. मौन राहणे महत्त्वाचे आहे, कारण त्यातून आतील भावना कळून येते. भावना कळणे हळूवार आणि मऊ असण्याचे कार्य आहे - तो गहंपणा  जाणवून येईल. त्यावर श्रद्धा ठेवावी.

हरि ओम.

Monday, December 02, 2024

श्री

 श्री 


बुद्धी कुठलीही स्थिती सरळ रेगे सारखी दाखवते. Causality is nothing but a linear way (or a limited way) of looking at  creation. 

ती एक पद्धत झाली. संबंध एका प्रकारे सरळ रेगे सारखे जीवाला वाटू शकतात. म्हणजे चंचल असणे, बेचैन वाटणे, तात्पुरते वाटणे, चक्रात गुंतून राहणे, अर्धवट वावरणे, अहं वृत्तीमुळे कृती करणे - हे सर्व घडामोडी "सरळ रेग" दर्शवते. किंबहुना दृश्य जग हे सरळ रेगे सारखे भासते, म्हणून त्या प्रमाणे जीव प्रतिक्रिया देतो. पण त्याने आत्म्याचा विकास कसा होणार, किंव्हा त्यातून आत्म्याच्या शक्तीची प्रचिती कशी होणार?!

थोडक्यात आत्माचे *दर्शन* होणे ही सरळ रेगेची बाब नाही. ती शक्ती खूप सूक्ष्म आणि गूढ आहे, म्हणून रेगेच्या भाषेत किंव्हा स्वभावात बसत नाही! अभ्यास जो आहे तो या गूढ स्थितीचा आहे, जो अस्तित्वाचा केंद्र स्थान आहे. 

दुसऱ्या पद्धतीने सांगायचे झाले तर त्याचा अभ्यास श्रद्धा वाधवण्याने होतो, बुद्धीने नाही. श्रद्धेचा गुण धर्म स्वीकारण्याचा आहे आणि शांत होण्याचा, सूक्ष्म होण्याचा, विशाल होण्याचा, स्थिर होण्याचा, पूर्ण होण्याचा. नामस्मरणाने ते जोपासावे. 

तिसऱ्या पद्धतीने सांगायचे की जीवनाची स्थिती अशी का आहे, त्याने व्याकूळ होण्याची गरज नाही. गोष्टींचे होणे, आकर्षिले जाणे, वावरणे, क्रियेत राहणे, घडामोडी होणे, संबंधित राहणे, गतिमान राहणे, गुण धारण करणे - हे गूढ आहे, सरळ नाही. त्याला न कुरकुर करता स्वीकारणे शहाणपणाचे ठरेल. गोष्टी योग्यच होतात, हे ध्यानात राहू देणे. अनंत आकार, वेगळेपण, अनंत चक्र - त्यांनी शांत असणे. अर्थ नाही कळले, तरी शांत राहणे. घडामोडी अशे रूप घेऊन का आले, हे जरी कळले नाही, तरी शांत राहणे. कारण जे येणार, ते निघूनही जाणार. हे होणार, ते बदलणार देखील. जे वावरणार ते विलीन होणार. जे गुणात येणार, ते गुणातीत होणार. जे गुणातीत असणार, ते गुण धारण करणार. 

चौथीत बाब अशी की "मी" हा भाव मर्यादित आहे. त्याचा उगम गूढ आहे, ग्राह्य नाही. उगम आहे म्हणून बदल आहे आणि मावळणे आहे. हे असले, तरी शांत राहणे. शांत राहणे म्हणजे अस्तित्वाच्या शक्तीचे भान सतत जागृत राहू देणे. 

हरि ओम.

श्री

श्री 

सर्व विश्व, त्यातील स्तर, घटक, स्थिती, चक्र, संबंध, परिणाम, हे एकच सत्य दर्शवते - तो भगवंताचा विलास आहे. ते कळण्यासाठी नामस्मरण करावे लागते. 

गोष्टी आणि आपण आणि त्यातील संबंध हा सर्व अस्तित्वाचा खेळ किंव्हा किमया आहे. भेट, देणे, पाहुणे आणि श्रद्धा आपल्यासाठी महत्वाची बाब आहे जीवन जगण्यासाठी. तरच आपण शुध्द आणि स्थिर होतो आणि भगवंताशी समरस होऊ शकतो. 

भगवंत भेटावा हा भाव मनात संक्रांत व्हायला लागतो, तरच तशी शक्ती हालचाली करते आणि तशे प्रसंग आणते आणि मार्ग प्रकट करते. शक्तीला भाव आहे, म्हणून जशी आपली जाणीव होते, तशी ती कार्य करते. जाणीवच शक्ती चक्र निर्माण करते. 

भगवंत भेटावा म्हणजे त्याचे गुण खरे वाटणे, पलीकडे होणे, मर्यादित न होणे,  परावलंबन स्वीकारणे, हेतू ची मर्यादा ओळखणे, प्रवाहाची जाणं येणे, अट्टाहास सोडणे, सूक्ष्म हऊ पाहणे, आनंदी सदा सर्व काळ राहणे, सिद्ध करण्याचा खटाटोप सोडणे वगैरे...

त्यासाठी, स्वतःसाठी अभ्यास करावा. कृपा कधी प्रकट होईल ते भगवंत जाणिवेत आणेलच. 

बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की भगवंत आणि प्रपंच्यामध्ये तालमेल कसा साधायचा? तर तसे न विचार करणे. कारण हा प्रश्न विचारातून उद्भवतो, ज्याला उत्तर शोधण्याचा मर्यादा आहेत आणि त्याचे परिणाम आहेत. भगवंत - ही वस्तुस्थिती श्रद्धेने उमगते. श्रद्धा प्रपंच्यामध्ये निर्माण करत पलीकडे आपल्याला नेते. विचाराने पलीकडे होता येते नाही. श्रद्धेने होऊ शकते, कारण भगवंताचा तो पूर्ण, शुध्द, सत्य गुण आहे. 

हरि ओम.