Tuesday, April 29, 2025

श्री

 श्री 


कर्म कसे होते आणि का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसे पहिले तर अख्या अस्तित्वाला आपण कार्य करत राहणे, असे ही म्हणू शकतो. म्हणजे अस्तित्वात आत्मा आणि रूप/ दृश्य हे दोन्ही स्थिती असतात, फक्त दृश्यांची संकल्पना किंव्हा होणे हे सर्वस्वी आत्म्यावर अवलंबून ठरते. म्हणजे मूळ तत्व जे आहे, ते आहे आत्मा असण्याच. त्या तत्वाला कशाचीही आडकाठी लागत नाही, कारण सगळ्याच गोष्टी त्या तत्वातूनच _नंतर_ प्रकट होत राहतात. म्हणून गोष्ट किंव्हा रूप हे तात्पुरते आणि बदलणारे आहे. त्याच्याशी संपर्क साधला की मन ही अस्थिर होते. जे इंद्रियांच्या द्वारे दिसून येते, भासते, परिणाम पाडते ते असते दृश्य, जे सतत आपल्याला गुंतून ठेवते. आपण ह्या क्रियेतील काहीही "नाही" आहोत, हा सर्व प्रकृतीचा किंव्हा शक्तीचा खेळ आहे. 

ते _जाणण्यासाठी_ नामस्मरण करायला लागते. जाणणे हे मूळ अस्तित्व शक्ती आहे. 

हरि ओम.

श्री

 श्री 


संकुचित झाल्यामुळे हालचालींचे भास होतात, परिणाम होतो आणि _कर्म_ करण्याची व्याख्या येते. मी किंव्हा देह किंव्हा रूप किंव्हा साखळी हे कर्म करण्यास भाग पाडतात, आणि त्याला आपण चिकटून राहतो. 

वास्तविक, हालचालींचे कारण प्रकृतीमुळे उद्भवते. प्रकृतीचे गुण रूप, देह, अहं ह्या पद्धतीत उठून येत असतात. आपण प्रकृती हे _सत्य_ ओळखत नाही, म्हणून हालचालींना भोगतो. प्रकृती हा अखंड आणि शांत असणाऱ्या भगवंताचे शक्ती रूप आहे. अस्तित्वाला पुरुष आणि प्रकृती अशी व्याख्या दिली आहे. पुरुष म्हणजे भगवंत म्हणजे आत्मा म्हणजे स्थिरता म्हणजे space or consciousness. प्रकृती म्हणजे रूप म्हणजे बदल म्हणजे form. 

जाणीव शुद्ध असली की भगवंत प्रकट होतो आणि तीच जाणीव अस्थिर असते तेव्हा जीव हा भाव वावरत असतो. जाणीव थोडक्यात संबंध प्रकट करतात अस्तित्वाशी. त्यात आपल्याला शांती रस जाणवते किंव्हा दृश्य स्वरूप. हे कसे होते, हे गूढ रहस्य आहे. त्या दोन्ही स्थितींचे असणे आणि कशाला सत्य म्हणायचे आणि कशाला निर्मिती किंव्हा कृती किंव्हा कार्य हे सहविस्तर बऱ्याच ग्रंथांमध्ये सांगितले असते. 

मन, हे देखील जाणीव शक्ती रूप आहे. त्या स्पंदनातून जे काही होते, त्यातून रूप आणि आकार दिसून येते किंवा भाव धारण केले गेले असते. म्हणून नामाचा संस्कार देत गेलो की स्पंदनाच रूपांतर शांतीत होते, असे संतांचे सांगणे आहे. आपली dnyan शक्ती दृश्य भावाच्या ही पलीकडे जायला हवी, जे कार्य नामस्मरण करून आणते.

दृश्य भाव असे का, ह्याने आपण अधिक त्याचेच चिंतन करतो. त्या पेक्षा जर ध्यान नामाच केलं तर आपण शांती रस अनुभवू आणि दृश्याचे संबंध विरघळून जातील किंवा त्याची गरज भासणार नाही. म्हणून दृश्य समजून कोड सोडवण्यापेक्षा आरंभी नामावर श्रद्धा ठेवा असे संत सांगतात. योग्य तो परिणाम होईलच. 

हरि ओम.



श्री 

सतत काहीतरी खटपट करत राहणे ही वृत्ती का असते? आणि खूप केले, हिशोब ठेवला, साखळी रचली, विचार केला, पटकन केले, तर समाधान असते का? समाधान मिळवता येते का _वस्तू प्रमाणे?!_ 

म्हणजे वस्तू ही संकल्पना आहे. ती मिळवण्यासाठी काहीतरी हालचाली, क्रिया, कर्म करणे आले ज्याच्यामुळे ती अनुभवात येते. स्थिर ही स्थिती नसल्यामुळे, वस्तूची संकल्पना किंव्हा तिच्याशी संबंध देखील बदलत राहतो आणि जे पदरी पडतं कायम ते म्हणजे असमाधान! म्हणजे मिळवण्याचा अट्टाहास शेवटी निकालास जातो! 

आता त्याच्या उलट काहीही मिळवणे नको, असे जरी म्हणले तरी आत वृत्ती असल्यामुळे कुठली ना कुठलीतरी गोष्ट किंव्हा वस्तू अनुभवात येतेच! त्याला भोग म्हणतात. 

वरील दोन्ही पद्धतीतून दिसून येते की वासना जर असली, तर त्याचे फळ भोगावे लागतात. 

हे चक्र शांत करण्यासाठी नामस्मरणाचा अनुभव आत्मसात करायला लागतो.

हरि ओम.

Sunday, April 27, 2025

श्री

 श्री 


सगळ्याच गोष्टी तात्पुरत्या असतात, स्थळही, वेळही आणि आपणही. त्यात सुद्धा अनेकपणा असतो आणि ह्या सर्व हालचालींची क्रिया भगवंताची शक्ती घडवून आणते, ती _कारण_ ठरते. 

मग काय साठवावे आणि कशाला आणि कुणासाठी? आणि काय सिद्ध करावे? सर्व भगवंत करतो, तर माझे कर्तृत्व काय?! हा महत्वाचा प्रश्न आहे आणि काही प्रमाणात तापदायक तर आहेच. उत्तर कळण्यासाठी मुद्दामून काही करणे, हे ही अभिप्रेत नाही. जाणीव शुद्ध होणे, हे अनुभवातून घडते आणि त्यात साखळी, घटक, संबंध, बदल, अर्थ हे गुढतेने वावरत असतात. आज इथे मी लिहिले तरी तो प्रयत्न स्थिर होण्यासाठीचा आहे. होईलच, अशी शाश्वती नाही. शाश्वती नाही, म्हणून श्रद्धेच स्थान आहे.  

मुख्य पाया जीवनाचा जो आहे, तो श्रद्धेचा असतो. त्याच्या कर्तृत्वावर काहीही करणे शक्य असते आणि समाधानी होणे हे ही शक्य असते. समाधान होण्याची दिशा एक रेघ किंव्हा सरळ मार्गाची असेल असे काही सांगता येत नाही. प्रारब्ध कसेही वाट्याला येऊ शकते, कधी देह सरळ जाईल, कधी वाकड्यात जाईल, कधी गचका खाईल तर कधी ताठ उभा राहील. परिस्थिती (देह/ आकार/ रूप) कसेही हालचालींमध्ये असले, तरीही समाधानी स्थितीत स्थिर राहायला हवे. म्हणून समाधानी होणे हे परिस्थितीवर अवलंबून _नसते_. 

ते कळण्यासाठी नामस्मरण करणे.

हरि ओम.

श्री

 श्री 


स्थळ, काळ आणि कृतीचे कुठलही _रूप_ प्रेमातून येतं किंव्हा त्यात प्रेम ही भावना केंद्रस्थानी असते किंव्हा प्रेमातून सर्व घडामोडी _प्रकट_ होत राहतात. दुसऱ्या अर्थाने प्रेम म्हणजे शुद्ध अस्तित्व किंव्हा अद्वैत किंव्हा अंतर्मुख असणे किंव्हा निरहेतू किंव्हा सूक्ष्म किंव्हा ज्याला रूप + आकार _नाही_. ते प्रेम होण्यासाठी तिथे मनाने ध्यान करायला लागतं. त्या प्रेम भावनेला शब्द दिला आहे *भगवंत*. आपण भगवंताचे ध्यान करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे शुद्ध प्रेम होण्याचा प्रयत्न करतो. 

स्मरण प्रेमाचे हवे, आपली मूळ अवस्था अस्तित्वात वावरण्याची. ती अशी स्थिती आहे की "मी" ह्याचं स्मरण देखील राहत नाही आणि जे काही माध्यम _उरतं_ ते असत फक्त प्रेम किंव्हा भगवंत. सर्व खटाटोप जो आहे तो ही स्थिती होण्याचा आहे. 

बऱ्याच लोकांच्या ध्यानी ही बाब येत नाही स्वतःच्या उतावळेपणाच्या रहस्य बद्दल. आणि जरी आली, तरी मार्गामध्ये स्वतःची वृत्ती बरेच अडथळे आणते. आणि ते अडथळे पार करण्यात अपार प्रयत्न, सैय्यम ठेवायला लागतो. हे करून देखील पूर्णपणे शरण जर गेलो तर भगवंताची कृपा होण्यात मदत होते. त्याचे परिणाम म्हणजे मन एकदम स्थिर होते. 

ह्या मार्गाचे महत्व पटायला लागते. त्या मार्गात जाताना अवस्था येतात. तेही शांतीने आत्मसात करायला लागतात. भगवंताचे किंव्हा उत्कंठ प्रेमाचे दर्शन व्हावे ही तीव्र इच्छा हवी, तरच हे साधेल. 

त्याची सुरुवात आणि शेवट म्हणजे नामस्मरण.

हरि ओम.


श्री 

बुद्धीने संकल्पना मांडणे आणि अनुभव घेणे ह्यात फरक असतो. संकल्पना जरी मांडता आली, तरी ते व्यवहारात येताना पूर्ण अस्तित्वाच्या साखळीत समवायला लागतात - म्हणजेच की ती बौद्धिक न राहता पूर्ण अंतःकरण व्यापायला लागतं. त्यात सर्व घटक आलेच. आणि त्यांचे एकमेकांशी असणारे संबंध गूढ असतात, ते शब्दात किंव्हा संकल्पनेच्या भाषेत नेहमी मांडता येतात असे नाही. म्हणून _श्रद्धा_ लागते. भगवंता बद्दल सांगणे आणि भगवंताचा _अनुभव_ घेणे हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सांगणे ही क्रिया सावली सारखी आहे - अनुभव घेतल्या नंतरचा टप्पा आहे. कुठलेही रूप किंव्हा दृश्यांची स्थिती सावली सारखी असते, जी भगवंतामुळे प्रकट होते किंव्हा नंतर येते (विघटित असते, अपूर्ण असते, रूप घेऊन असते, बदलत असते, अस्थिर असते, परावलंबित असते, वावरत असते)...

म्हणून सर्व दृश्यांच्या रूपाला भगवंताचा पाया असतो (उर्ध्व स्थिती - apriori). म्हणून ही हेतू ठेवणे ही सावली सारखी असते, तो सत्य भाव कसा असेल?! 

असो, भगवंताच्या इच्छेने प्रकृती कार्य करते - म्हणजे पदार्थांचे होणे, वावरणे, मोडणे, परत जोडणे वगैरे. त्या गुणांना चिटकून राहिल्यामुळे ते कार्य मी करतो हा भास होतो आणि त्यातून भोग अनुभवतो. 

हा सर्व प्रकार गूढ आहे. ते स्पष्ट होण्यास भगवंताचे चिंतन करणे हाच उपाय आहे. दृश्य रूप, त्याचे परिणाम, संबंध, वासना, बदल हे झेलणे आहे शांतीने. 

हरि ओम.

श्री

श्री 

आतील होणारे घडामोडी सोडवण्याचे किंव्हा बोलण्याचे अट्टाहास असू नये...ते भगवंत बघतो.

हालचालींचे संबंध (आत आणि बाहेर आणि दोघांमध्ये) कसे असतील आणि होतील, ह्याकडे चिंतेने बघू नये...ते भगवंत बघतो.

"मी", आत्ता, काळ, उद्या, स्थळ, काळ ह्याने काहीही ठरवू नये त्वरीत...ते भगवंत बघतो.

घडामोडी, वृत्ती, स्वभाव, परिस्थिती, बदल, संबंध, मनुष्य ह्याची चिंता करू नये...ते भगवंत बघतो.

जाणिवांचे पुढे उपयोग होईल की नाही, ह्याची चिंता करू नये....ते भगवंत बघतो.

मी असीन का नसीन, ह्याने काही फरक पडेल का, ह्याचा विचार करू नये...ते भगवंत बघतो. 

कार्य केल्यावर त्याचा परिणाम कसा बदलेल, ह्याचा विचार करू नये...ते भगवंत बघतो.

असलेला आयुष्यातला वेळ सत्कारणी पडेल का, ह्याची चिंता करू नये...ते भगवंत बघतो.

"मी" कुठून आलो, कसा झाली, कुठे जाणार, ह्याची चिंता असू नये...ते भगवंत बघतो.

गोळा बेरीज आयुष्याची काय होते, ह्याच्या विचारात पडू नये...ते भगवंत बघतो. 

भगवंताला आपली हाक जाते की नाही, ह्याचा विचार करू नये...ते भगवंत बघतो.

हरि ओम.

Saturday, April 26, 2025

श्री

 श्री 


भगवंताच्या विस्ताराला मर्यादा नाहीत. सूक्ष्म पासून ते अनेक स्तर ते चक्र, संबंध, साखळी, प्राण, आकार अशी ती शक्ती _प्रकट_ होत राहते किंवा कार्य करते. ते होत राहताना भाव होणे, अनुभव येणे, कृती करणे, जीवाची _संकल्पना होणे_ ह्या साऱ्या गोष्टी _होत राहतात._ म्हणजे माझ्या जन्माच्या पलीकडे आणि नंतरही हे कार्य चालू राहणारच आहे आणि अनुभवाचे परिणामही तसेच राहणार आहेत. प्रश्न तेच , शोध तेच, मार्ग तोच, बदल तेच, श्रद्धा ठेवणे आलेच, शांती होणे आहेच. 

पूर्वी काय आणि उद्या काय, हा निव्वळ संकल्पनेचा आभास आहे, वळवळ करण्याचा परिणाम. स्थिर होणे, सत्य जाणणे, सूक्ष्म होणे हा कायमचा अभ्यास आहे आणि संतांच्या मते _अनुभव सिद्ध मार्ग_ आहे. 

हरि ओम.

श्री

 श्री 


शंका आणि शोध हे शक्तीचे जागे होणे आहे. मूळ आहे ती जाणीव. जाणीवेच्या प्रभावाखाली सर्व संबंध, अनुभव, साखळी, दृश्याचा अर्थ, परिणाम आपण भोगतो. हे वेग वेगळे घटक जरी वाटले एकमेकात गुंतले गेलेले, त्याचे केंद्र बिंदू आहे जाणीव. म्हणजे जाणीव क्रिया अशी विस्तारलेली असते, ज्याला आपण घटक ह्या भाषेत समजून घेतो. 

म्हणून जाणीव मर्यादेची क्षमता किंव्हा पोच दर्शवते. जेवढी जाणीव शुद्ध, सूक्ष्म,  तितकी तिची पोच जास्ती, विचार जास्ती विस्तारलेले, घटकांचे dnyan अधिक प्रबळ वगैरे. 

म्हणून अभ्यास जो आहे, शोध जो आहे, तो जाणीव शुद्ध होण्याचा आहे. अभ्यास केला नाही, तर जाणीव आणि त्यावरून होणारा प्रभाव तोच राहतो आणि अधिक घट्ट होण्याची संभावना असते. म्हणून शंका घेण्याला महत्वाचे स्थान आहे, कारण त्याने आपण स्वतःच्या मर्यादांवर शंका घेतो आणि अधिक विस्तार होण्याचा प्रयत्न करत राहतो. तसे होणे आहे. 

पण हा प्रवास ज्याने त्याने हाती घ्यावा. कोण कधी घेईल, कुठल्या निमित्ताने घेईल आणि कसे त्याचे रेखाटन करेल आणि त्यावरून जात राहताना कसे अनुभव आत्मसात करेल, हे काळच ठरवेल. त्यासाठी प्रत्येक मानव जीवाला अमाप आशीर्वाद देऊन त्याच्यावर श्रद्धा ठेवावी आणि सैय्यम बाळगावा.

हरि ओम.

श्री

 श्री 


आतील गूढ विचार किंव्हा भावना अनुभवातून निर्माण होतात. ते बोलू नये किंव्हा सांगू नये किंव्हा ऐकू नये हे कसे शक्य आहे आणि काय केले की त्या गूढ भावना शांत होतील? 

एक तर आपण भाव धारण करून जन्म घेणे ही क्रिया असते. तो जन्म घेतल्यावर बदलांमुळे भावनेचे स्तर होतात आणि त्यांच्या आत गूढ संबंध होतो. तो ही होत राहणार. ते का होते, कसे होते, केव्हा होते हे सर्वस्वी भगवत कार्य आहे, म्हणून चिंता नसावी. त्या साखळीतील अनेक दृश्यांची स्थिती आणि अदृश्य प्रकारांचा समावेश असेल. ते ही संबंध कसा असतो, हे गूढ आहे.  म्हणजे मानवी अनुभव होत राहणार आणि त्यातून आपल्याला जायला लागणार, कुणी काहीही म्हणो. ते जे काही दर्शवते, ते बदलणारे, तात्पुरते असते आणि म्हणून आपण काही पकडू शकत नाही आणि ठेवायचे म्हणून काही राहत नाही. 

वासना कितीही तृप्त ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी ते बदलत राहते म्हणून त्यावरून परिस्थिती बदलत राहतात. म्हणून ध्येय वासनेवर स्थित नसावा, स्थिरतेच्या जाणिवांवर घडावा. 

हरि ओम

श्री

 श्री 


शांत आणि प्रेम आणि आपुलकी हे आत येण्यासाठी खूप अनुभवातून जायला लागते. अंतर्मुख होणे आणि शुद्ध होण्याची ती क्रिया आहे. अनुभव आपण टाळू शकणार नाही, किंव्हा ते टाळू ही नये. कारण प्रत्येक अनुभवेच प्रयोजन असते आणि ते स्वीकारले तर ते आत परिवर्तन घडवून आणू शकते. 

अनुभव बाहेरून आत जातो, संस्कार मधून जातो, लिखाण, ऐकण्यातून, बोलण्यातून जातो, विचारातून जातो, कृतीतून जातो. तसंच आतून बाहेर तो प्रकट होत राहतो. 

अनुभव किंव्हा वासना निर्माण करून त्याचे पर्यवसान कुठल्यातरी रूपात आणि कार्यात घडणे हा अस्तित्वाचा गुण आहे. हे होणार. निर्माण करत राहणे आणि हालचाली दर्शवणे असे असणार अस्तित्वात. 

प्रश्नाचा शोध देखील अनुभव निर्माण करतो. उत्तर मिळत नाही, ह्या विचारांनी देखील आपण शांतीच्या मार्गाला लागतो. म्हणजे शांती संक्रांत होणे हे विचारांच्या अधिक गूढ क्रिया आहे आणि ते होईल कालांतराने. ते कधी, कुठे, कसे, केव्हा, किती होईल हे भगवंताच्या गुण धर्मावर सोडणे. 

शांत होणे हे परिवर्तन घडून होते. परिवर्तनात खूप दुःख, त्रास, सैय्यम, सहनशीलता, त्रयस्थ गुण, शिव्या - शाप ह्या साऱ्यातून जायला लागू शकते आणि ह्यातून जाताना प्रतिक्रिया *न* देणे हे ठरवायला लागत. 

प्रतिक्रिया देऊन काय होतं असे स्वतःला विचारायला लागतं. त्यातून काय सिद्ध होतं? भसम्या रोग झाला असावा आपल्याला. जाणीवेच्या प्रभावाखाली आपण ते विचार आणतो, ते कृती करतो, ते संबंध जोडतो आणि ते अपेक्षा ठेवतो आणि शेवटी दुःखी होतो. सर्व अपुरे आहे, तर का कष्टी व्हावे? प्रश्न दृश्याचे रूप झगडत सुटतात का कधी? नाही सोडवले तर काय बिघडते? कुणाचे बिघडते? 

आपण स्वतः कुणाला पुरून राहणार आहोत? किती करणार आहोत? आणि कोण, कुठली वस्तू आपल्याला पुरणार आहे? प्रवाह आहे सगळा. जे येणार ते जाणार किंव्हा परिवर्तन पावणार. जे असणार, ते असणार. जे जाणार, ते जाणार. 

आपण शांत रहावे. आपल्याने काहीही अवलंबून असत नाही आणि कुणीही आपल्यावर अवलंबून असत नाही. लोकं आणि त्यांच्या स्वभावाचे मूळ त्यांनाही माहीत नसते. आपण असे का वागत राहतो, हे माहित नाही. सैय्यमाने घेणे आहे सर्व गोष्टी आणि जमेल तसे माफ करणे सगळ्यांना आणि स्वतःला. मोकळे व्हा.

हरि ओम.

Thursday, April 24, 2025

श्री

श्री 

भगवंत आपल्याला, कुठल्याही काळात आणि परिस्थितीत सोडत नाही. म्हणजे कुठल्याही दृश्याचा रूपात, भगवंताचा पाया असतोच, त्याचे कार्य असते, त्याची इच्छा असते. बदल जरी झाले, तरीही त्याची संकल्पना भगवंत देतो. म्हणून साखळीचे रूप गूढ असतात आणि ते त्याचे कार्य दर्शवतात, हे ध्यानात राहू देणे. 

नाम घेत असताना त्याचे परिणाम आणि त्याचे संबंध आपल्याशी आणि द्वैत प्रकरणाशी कसे होतील, त्याची चिंता करू नये. जे योग्य व्हायचे ते होतील. _नामाने मी ह्या संकल्पनेचा उद्धार होतो आणि त्याच बरोबर द्वैताचाही._  म्हणजे शांती भाव संक्रांत होते. 

हे जरी स्पष्टतेने हरिपाठ ह्या अभंगात संत Dnyaneshwar ह्याने सुचविले असले, तरीही "ते कसे होते" अशी शंका घेण्याची गरज नाही. आणि ती शंका जरी आली, तरी नाम घेणे सोडू नये. त्यातूनच श्रद्धेची वाढ होत राहील आणि गुंता सुटेल. मग उद्धार कसे होते, ह्याचा ही अनुभव स्पष्ट होईल. 

तात्पर्य हे, की नामावर श्रद्धा स्थिर ठेवणे. स्थिरावणे देखील क्रिया आहे जी सहज, कालांतराने साध्य होते. आज म्हणाल तर "पटकन" साध्य होणे अवघड, कारण अस्थिर राहण्याची आपल्याला सवय झाली असते. दृश्याचा परिणाम ढिले करण्यास अनेक जन्म प्रयास करायला लागतात, असे संतांचे म्हणणे आहे. परत, ढिले करणे म्हणजे पळून जाणे नाही, पण स्वस्थ होणे, शांत होणे, तळमळ थांबणे, श्रद्धा वाढणे, सत्य कळणे, जाणीव सूक्ष्म होणे असे सर्व सूचित आहे इथे. 

हरि ओम.

श्री

 श्री 


अस्तित्व - दृश्यात वावरताना एकमेकांशी, आकारांशी, वृत्तींशी, घटकांशी, रुपाशी, स्थळाशी, काळाशी _संबंध निर्माण होत राहतात._

बघा, म्हणजे _संबंध_ हे क्रियांचे परिणाम, ज्याच्यामुळे कितीतरी पदार्थ तैय्यार होत राहतात (स्थळ आणि काळ धरून), म्हणून सर्व पदार्थ होण्याचे बीज स्वतःमध्ये असावे, असे जाणून घेणे. 

त्या संबंधांचे परिणाम अनंत आहेत, प्रवाह कालीन आहेत, साखळीतील आहेत, बदलत राहणारे आहेत, भावात गुंतवणारे आहेत, विश्व रूप दाखवणारे आहेत, प्रश्न उद्भवणारे आहेत, भावना निर्माण करणारे आहेत, भीती देणारे आहेत, आनंद देणारे आहेत, कार्य घडवणारे आहेत, कष्ट देणारे आहेत, शांत बसवणारे आहेत, एकात एक होणारे आहेत, तात्पुरते ठेवणारे आहेत, वेगळे भासवणारे आहेत....

हे असणार आपल्या _अनुभवात_. त्या अनुभवाच्या मार्गातून स्थिर होणे, श्रद्धा वाढवणे, शांत होणे - हे आपले ध्येय किंव्हा शिकवणूक किंव्हा अभ्यास आहे. 

जग बदलत राहत. उद्या बद्दल का चिंता असावी? परिस्थिती कशीही असो, कुणी काहीही म्हणो, गोष्टी कसेही असो, _माझ्यावर परिणाम का करून घ्यावा?_ सर्व भगवंताचे कार्य, लीला, भाव, शक्ती, इच्छा असते. त्या कार्याला शरण जावे.

हरि ओम.

Monday, April 21, 2025

श्री

 श्री 


मनात ठेवलं तर आतल्या आत चक्र सुरू राहतं आणि हालचाली जाणवतात. बोललं गेलं तरीही हालचाली जाणवतात आणि दृश्याशी सरमिसळ होते. दृश्यांचे स्तर आहेत, म्हणून बाहेरील आकार बघणे काय किंव्हा आतील क्रियांवर, रुपावर लक्ष देणे काय - दोन्ही दृश्याचे रूप दर्शवतात. त्याला दुसरे नाव म्हणजे "संकल्पनेची स्थिती". म्हणजे _संकल्पना_ होऊ पाहणे ही _क्रिया_ आहे आणि त्या क्रियेचा _परिणाम_ असतो, जो भाव निर्माण करतो आणि त्यामुळे गुंतून ठेवतो "जीवाला". 

भावानेच स्वरूप किंव्हा संकल्पनाच रूप सार्वजनिक मूल्य घेऊन प्रकट होऊ शकत किंव्हा खाजगी मूल्य. वास्तुकलेत हा प्रवास बघितला जातो आणि एखादी कलाकृती सार्वजनिक मूल्य दर्शवते की खाजगी हे आपण पारखून घेऊ शकतो. खाजगी मूल्य उपयोगाचे का नाही कारण ती विघटित क्रियेतून, तात्पुरती संकल्पनेतून आणि स्वार्थी हेतूमुळे निर्माण झाली असते. काय दिसते ह्याचे बीज "हेतूवर" अवलंबून आहे आणि काय निर्माण करतो, ह्याचे परिणाम खूप खोलवर रुजू होतात - स्वतः त्या व्यक्तीला आणि समाजाला. म्हणून डोळस पद्धतीने कलाकृती काय मांडली जाते, ह्याकडे सगळ्यांनी बघावे. हा मुद्दा उडवण्याचा नाही आहे. 

त्या अर्थाने स्थळ आणि काळाशी आपले नाते असते - ते सार्वजनिक, दैवी उद्भवले आहे की खाजगी असते ते बघावे. पर्यावरण खाजगी वस्तू आहे की सार्वजनिक की दैवी उद्भवलेली? अगदी माणूस म्हणाला तर तो जीव खाजगी असतो की सार्वजनिक का दैवी उद्भवलेला?

हरि ओम.

श्री

 श्री 


जाणीव असणे हे शक्तीचे गुण आहे. शक्ती जिवंत आहे, ह्याचा अर्थ ती जाणीव रूप आहे, ती कार्य करते, ती गुंतून राहते, ती संबंधित राहते, ती अनुभव घेते, तिला भाव असतो आणि त्यावरून ती विचार करते. एका दृष्टीने शक्ती स्वयं सिद्ध असते, तिचे अस्तित्व असते, म्हणून तिचा _परिणाम_ असतो.  

शक्तीच्या क्रियेतून आभास होतो. आपल्यासाठी दृश्य जगाचे संबंध खरे वाटून येतात - ही प्रक्रिया गहन आहे आणि साखळीमुळे प्रत्ययास येते. प्रश्न असा आहे, ह्या प्रक्रियेत वावरताना की "आपण कोण आहोत आणि काय आहोत आणि कसे वावरत राहतो?"...ह्या प्रश्नाचे उत्तर ओळखणे म्हणजे शक्तीचे जागे होणे किंव्हा जाणीव अधिकाधिक शुद्ध होत जाणे, सूक्ष्म होणे. 

ज्याला "मी" असे म्हणतो, ते शक्तीचे कार्य आहे, भाव आहे, प्रक्रिया आहे, अनुभव आहे, चक्र आहे, परिणाम आहे, भोग आहेत...पुढची चिंता असणे आणि सतत प्रपंचात गुंतून राहणे हे ह्या शक्तीचे भाव आहेत. हा भाव _कुठून_ निर्माण होतो? तर ते शुद्ध स्थितीतून. प्रत्येक घटनेला _कारण_ आहे, ते आपल्याला कळत नाही एवढंच आहे. ते होण्याचे प्रयोजन काय, हा शोध आहे आपल्यासाठी. 

त्या शोधाला दुजारा द्यायला नामात राहण्याचा प्रयत्न करणे. 

हरि ओम.




श्री 

कोडी सोडवण्याचा अट्टाहास असू नये. म्हणजे जाणीव अशी होऊ देणे की सर्व हालचालींना शांतीने बघणे, स्थिरतेने बघणे. हे ही प्रयत्नाने, कृपेने आपोआप घडू देणे. श्रद्धा वाढवत राहणे. _कारण_ ही संकल्पना आहे आणि त्यातून गोष्टींची भूमिका आपण बघतो. गोष्टींचे होणे, येणे, वावरणे, जाणे , हे प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करतो. _मूळ असणे_ ही देखील संकल्पना आहे आणि त्याच्या शोधात आपण असतो. वरील दोन्ही गुण शक्तित असते, म्हणून हे प्रश्न आपल्यालाही असतात. 

शक्तीला गुण आहेत म्हणजे हे. तरीही गुणाचे वर्णन करणे म्हणजे शक्तीतून वेगळे असणे. आपण शुद्ध शक्तिरूप झालो, तर गुण सांगायला कोण असणार आहे आणि कुणाला?! थोडक्यात अंतर्मुख होणे, हा त्या प्रवासाचे ध्येय म्हणता येईल.

हरि ओम.

Friday, April 18, 2025

श्री

 श्री 


शक्ती माध्यम हे अस्तित्व आहे. जिथे अस्तित्व आहे, तिथे शक्तीचे कार्य होणार. शक्तीचे कार्य म्हणजे स्पंदन, साखळी, घटक, रूप, भाव, संबंध, आकार आणि जाणीव. अस्तित्व आणि शक्ती हे वेगळे नाहीत. शुद्ध जाणिवेला, किंव्हा शुद्ध शक्तीला भगवंताचे अस्तीत्व आपण स्वीकारतो. 

शक्तीचा परिणाम हा की आतून स्पंदने अदृश्य सूक्ष्म स्वरूपात बाहेर येताना स्थूल आणि दृश्यात परिवर्तन होतात. ते होताना बरेच आकार किंव्हा बदल किंव्हा हालचाली ते अनुभवात आणतात. त्याला आपण प्रतिक्रिया देतो आणि ते चक्र सतत चालू ठेवतो. म्हणजे सर्व संकल्पनेचा किंव्हा समजुतीचा खेळ आहे. शक्तीमुळे होणारे स्मरण किंव्हा जाणीव, ह्यामुळे एक प्रकारचे अस्तित्व आपण उपभोगतो. 

म्हणून नामावर श्रद्धा बसायला हवी. नाम ही शक्ती सर्व विश्व चालवते, असे पक्के मनात खोल रुजायला हवे. त्यासाठी होणारी प्रक्रिया म्हणजे अंतर्मुख होणे. 

तिसरी गोष्ट अशी की विश्वात रचना असते. म्हणून आपल्या कृतीचे फळ आपल्याला भोगायला लागते, त्यातून कुणाचीही सुटका नाही. हे जरी असले, तरी जाणीव शुद्ध केली तर येणारे अनुभव शुद्ध नजरेने स्वीकारून त्याकडे आपण 'निमित्त' म्हणून बघू शकतो, म्हणजे आकुंचित हेतूने दृश्याला पकडून ठेवण्याची गरज नाही. 

"मी" जाणीव खूप खोल गेली असते. तिचे रूप आणि परिणाम आत जाताना वेगळा होत राहतो, जो सामान्य दृश्यात पटकन कळणे अवघड असतं. म्हणून नामाची शक्ती आत जायला हवी, म्हणजे वासनेचे उच्चाटन होते आणि मन अतिशय शुद्ध होते. 

हरि ओम.

Sunday, April 13, 2025

श्री

 श्री 


जन्माच्या हालचाली अनुभवणे आणि दृश्यात वावरणे ही भगवंत इच्छा मानावी. त्यात भगवत शक्तीचे स्मरण विसरणे, म्हणजे साखळीला प्रकट करणे, त्यात गुंतून राहणे आणि परिणाम भोगणे आले. ते करत राहताना सत्याचा शोध आणि स्थिर होणे, हे ही आले. म्हणजे शक्ती परत जागी होणे आले. 

जशी भरती आणि ओहोटी होत राहते, बाकीच्या हालचाली होतात, चढण उतार होत राहतात, तसे काहीसे हे आहे - विस्मरण (म्हणून जन्म) आणि स्मरण (म्हणून स्थिरता). इथे पहिले काय येते, ह्या प्रश्नात अडकून काही उपयोगाचे नाही. दिलेल्या परिस्थितीतून समाधान भाव कसा प्रकट करावा ह्याकडे बघावे. परिस्थिती भगवंतांनीच निर्माण केली आहे, कारण कुठलही स्थळ आणि कुठलाही काळ त्याच्या इच्छा शक्तीतून प्रकट होतो आणि रूप धारण करतो. म्हणून सर्व घडामोडींना दिव्य पाया आहे आणि त्यात असा मार्ग आहे किंव्हा कळतो, की तो थेट भगवंताचे दर्शन घडवून आणतो. हे होणार. शांतीत आपण स्थिरावणार, कारण त्याचीच इच्छा आहे. आपण त्या इच्छेची आद्न्या पालन करत आहोत, त्याच्या कार्यात सामावले आहोत. 

म्हणून स्तर, स्थिती, साखळी, क्रिया - ह्या सर्वांना स्थान आहे आणि ते प्रकट होणार. बदल, रूप, हालचाली, अनुभव येणार, ते ही बदलत राहणार. पुढे काही जरी निर्माण झाले, तरी ते भगवंताचे देणे आहे, हे ओळखणे. दृश्यांची निर्मिती हे त्याचे कार्य आणि त्या निर्मितीचे परिणाम होणार, हे ही आले त्या ओघाने.

वास्तुकलेचा विचार असा करावा असे वाटते. कुठल्याही पद्धतीतून विचारांची साखळीतून कार्य करत, भगवत भाव कलाकृतीत आणणे. भगवत भाव प्रत्यक्षात आणणे, हा प्रवास आहे आपला. म्हणजे तो भाव आणण्यासाठी किंवा होण्यासाठी, परिस्थितीची किंव्हा कुठल्याही रुपाची पार्श्वभूमी पाहिजेच असे काहीही नाही. म्हणून न्यून बाळगू नका. There ought not to be any given condition or a precedent study or a precedent process to realize the truth through architecture. Truth is discovered as one's core centre. 

अभ्यास जो आहे तो स्वतःच्या अंतरंगाचा आहे आणि ते अंतरंग कसं उमटत हा आहे. स्पष्टीकरणाच्या भोवऱ्यात अडकू नये, कसे बदल होतात, का होतात आणि अर्थ कसा होतो हे ही पटवून देण्याच्या जबाबदारीत जाऊ नये. जे होते सगळ्यांसाठी, ते योग्यच होते अशी श्रद्धा वाढवावी. मूळ दृश्यात शोधण्यात जाऊ नये. सर्व स्वच्छ मनाने स्वीकारावे. 

हरि ओम.

श्री

 श्री 


भगवंत सर्व प्रकाराचे, सर्व स्तरातले, सर्व रुपातले, सर्व आकाराने, सर्व चक्रातले कार्य करतो. हे एकमेकांवर साखळी प्रमाणे जोडून ठेवणे ही त्याची लीला आहे, म्हणून एकातून एक, परिवर्तन होऊ पाहणारे, संबंधित असलेले गोष्टी किंव्हा पदार्थ किंवा रूपे प्रकट होतात. 

सर्व प्रवाह जोडले गेलेले आहे, कुठेही खंडित स्थिती किंव्हा "नाही" (vacuum) असत नाही. सर्व त्याच्या कार्याने "भरले" गेलेले आहे. असा काळ नाही किंव्हा स्थळ नाही किंव्हा स्थिती नाही, जिथे त्याचे अस्तित्व लोप पावते. म्हणजे आपण नेहमी त्याच्या संपर्कात असतो, फक्त ती जाणीव कमी - जास्त फरकाने सर्व पदार्थात असते.

साहजिकच त्याचा अर्थ असा निघतो की आपल्या कार्याला खूप साऱ्या स्तरांमध्ये वावरणाऱ्या शक्तीचे समावेश होते. मग चौकट कशासाठी?! हा प्रश्न महत्त्वाचा आहे. चौकट का केली जाते आणि ते केल्याने देखील सत्य पुढे जाणवेल हे ध्यानात ठेवावे. सत्य भगवंत प्रकट करतो. ते कधी येईल, कसे होईल, कुठल्या रूपात होईल हे शांतीने सैय्यम ठेवावे. 

शांत होणे म्हणजे स्थिरावलेली श्रद्धा. आपण जर एकच आहोत, तर एवढ विभक्त आणि विघटित विचार का करत राहतो?!

हरि ओम.

श्री

 श्री 


सत्य काय आहे, ही सांगण्याची, हेतू ठेवून वागण्याची गोष्ट नाही. किंबहुना ते कळायला हेतू हवाच असे नाही. हेतू नसले किंवा तिथं पर्यंत कसे पोहोचावे हे ठाऊक नसेल, तरी हरकत नाही. कारण सत्य होणे, हे आत्माचे विस्तारलेली क्रिया होणे, ही नैसर्गिक बाब होत असावी, त्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. ती होत राहणार, कारण जसे दृश्य होणे हा दिव्य भाव आहे, तसे भगवंत होणे हे ही दैवी कृपेचे कार्य आहे. The search for truth will eventually be realized. 

म्हणून दृश्याचे दडपण जरी ओघाने आले, तरी त्याची चिंता करू नये....कारण ते दडपण कायमचे नसते, ते विरघळून जाणार असतेच.   बदलांचे रूप ओळखणे, हा जाणिवेचा अभ्यास आहे. शांती होण्याला वेग येऊ शकतो, जर डोळसपणे त्या मार्गावर लागलो तर.

दुःख येणार नाही, असे काहीही नाही. किंबहुना ते महत्त्वाचे असावेत, कारण त्याचे प्रयोजन जीवनात आहे म्हणून. महत्व ह्या दृष्टीने की कुठलीही गोष्ट कायम नसते, ती बदलते आणि ती प्रकट होते एका गूढ कार्यामुळे आणि नंतर परिवर्तनही पावते. 

ते ओळखण्यासाठी नामस्मरण शांतीने करत राहणे. ते ही भगवंत आपल्याकडून करून घेतो, असा भाव आणणे मनात.

हरि ओम.

श्री

 श्री 


चिकित्सा ठेवून प्रयत्न करणे आपण करू शकतो. तेवढेच करणे. त्यावर साखळीतील ओवले गेलेले विचार न करणे, म्हणजे फळ, त्याचे रूप, संबंध, परिणाम, बदल वगैरे. इतर कुठलेही घटक आपल्या हातात नसतात किंव्हा ते गूढ असतात किंव्हा त्यावर गूढ पद्धतीतून दैवी स्वरूपाचे क्रिया होऊन रूप धारण होते आणि संबंध निर्माण होतो. Manifestation is realised in this way. 

Realization, therefore, has a specific, sacred, mysterious, process oriented meaning. 

त्याला जाणीव ही आपण म्हणू शकू. जाणीव ही आहे की वावरणे आणि त्यात अनेक क्रिया होत राहणे आणि बदल घडत राहणे, गती राहणे, हालचाली होणे, दृश्य दिसणे, निर्मिती होणे हे अस्तित्वात असणार. अस्तित्व माध्यम ही वस्तू नाही, ती असतेच. तिला बदल ठाऊक नाही, ती स्थिर असते, ती निवांत असते, ती शांत असते, ती एकच असते. ती कायम असते, आपल्या आत असते, म्हणून तिला गुणांचा किंवा परिस्थितीचा स्पर्श नाही. तिला कुठलही निमित्त लागत नाही, _मी_ ही नाही. तरीही तिला ओळखण्यासाठी स्वतःचे निमित्त _प्रमाण_ मानून तिच्या पर्यंत पोहोचायला लागते. I am the measure of truth, so this measure represents scale and proportion (relation) to the truth. 

Scale and proportion generates a sense of connection and belonging - mood is to steady oneself in bliss. Why a scale and proportion gets created in our actions is perhaps because of the need to establish this divine connection in material affairs. Materiality's "source" is Divinity. 

वासना, वृत्ती किंव्हा साखळी निर्माण होणे ही क्रिया _शांतीने_ बघणे. भाव निर्माण होतो. त्यात वृत्ती येतात आणि निघून जातात. त्या वृत्तीचे पर्यवसान विचार, भावनेत आणि देहात होत राहतात आणि दृश्याशी संबंध जोडतात. हे भगवत कार्य आहे. 

एका क्षणात मी अंतर्मुख असतो, मग बहिर्मुख होतो, मग विचारात गुंतून राहतो, मग भावना प्रकट होते, मग आकाराकडे लक्ष केंद्रित होते. म्हणजे ह्या प्रवाहातून सर्व अनुभवाचा _विस्तार_ घडतो. विस्तारातून स्थिर जाणीव होणे ही देवाची कृपा आहे. विस्तार त्या क्षणाचा असेल किंव्हा अनेक युगातून होईल किंवा अनेक स्तरातून. विस्तार होणे, म्हणजे स्थिर होणे. 

विस्तार होण्यासाठी निमित्त व्हायला हवे, आणि ते घडण्यासाठी नामस्मरण. 

हरि ओम.

Thursday, April 10, 2025

श्री

 श्री 


स्थिर होण्याचा मार्गात असे आढळून येईल की अदृश्य ते दृश्य अशी साखळी, घटक अस्तित्वात वावरत असतात, त्यातील काही दिसून येतात, कशी रुपात असतात, काही जाणवतात आणि काही आपल्या पलीकडे ही असाव्यात. प्रत्येक घटक मनोरचने प्रमाणे जाणून येते, म्हणून सूक्ष्म शक्ती अनुभवण्यास, तसे आपल्या मनाला बनायला लागते. 

मन ही शक्ती आहे, स्थिती आहे, साखळीचा परिणाम आहे, परावलंबित क्रिया आहे, भाव निर्मिती आहे, चक्र आहे, जाणीव आहे. त्यातून स्थिरतेची जाणीव होणे अभिप्रेत आहे. 

स्थळ आणि काळ वेगळे नसते किंव्हा बाहेरचे नसते. ते मनाच्या आतील स्पंदनातून _प्रकट_ होते. स्थळ आणि काळ दृश्याचाच भाग आहे, तर तो साखळीतून, क्रियेतून निर्माण होणार. 

कुठलीही परिस्थिती _संबंध_ दर्शवते, स्थळ आणि काळ दर्शवते. आपण ही स्थळ आणि काळ आहोत. _शांती भाव_ स्थळ आणि काळाची उत्तम आणि सूक्ष्म स्थिती समजावी. म्हणून बदल जो आहे, तो आतील मनोरचनेचा आहे, त्यातून "स्थळ आणि काळाशी" संबंध/ रूप/ अर्थ बदलेल. इथे भाव, संबंध, रूप, अनुभव, परिणाम आणि आकार *एकच* सूचित केलेलं आहे. 

हरि ओम.

श्री

 श्री 


आपण कुठलेही आपुलकीचे नाते धारण करू शकतो. हे शक्य आहे. प्रकरण अस्तित्व शक्तीच आहे, रूपाच नाही, आकाराच नाही, साखळीच नाही, दृश्याच नाही, भावाच नाही, अनुभवाच नाही.... कशाचेही नाही, कुणावरूनही नाही, परिस्थितीतूनही नाही. 

फक्त शांती धारण करावे. ते अस्तित्वाचे रहस्य आहे आणि ते सर्वात मोलाचे स्थिती आहे. अजिबात फिकीर करू नये झीज होण्याची, बदलांची, स्थळाची, काळाची, वृत्तीची, संकल्पनेची, रुपाची, काहीही घडण्याची. ते सर्व शांतीवरच अवलंबून आहे आणि शांतीच्या पुढे सर्व अतिशय दुय्यम बाब आहे. 

ती जाण होण्यासाठी नामस्मरण करणे. नामस्मरण ही क्रिया आहे शुद्ध होण्याची. 

हरि ओम.

श्री

 श्री 


सांगणे, विचार मांडणे आणि त्यातून सिद्ध होणे, हा अट्टाहास सोडून देणे. जे सांगणे असेल, ते दृश्यशीच मांडणी असेल, म्हणजे परावलंबन, परिस्थिती, साखळी, भाव, चक्र, विघटन, तात्पुरतेपण, परिणाम असे काहीसे घटक. सूक्ष्म होत जाताना हे घटक असतील, फक्त त्याचे रूप बदलतील. म्हणजे संबंध किंव्हा जाणीव बदलू पहिल. 

आपण करण्यासाठी, सांगण्यासाठी, ऐकण्यासाठी, अर्थ सिद्ध होत नसतो, किंव्हा तो हेतू धरून सिद्ध होऊ नये. हेतू धरणे आणि शांती लाभणे हे विभिन्न क्रिया आहेत. 

शांती धरण्यासाठी किंव्हा स्थिरावण्यासाठी हेतूचा *त्याग* करायला लागतो, म्हणजे जरी काहीही उमटलं किंव्हा प्रकट झालं, तरीही शांती स्पंदनाना धक्का लागता काम नये, त्यातून आपली नजर हटता कामा नये. शांती भावात कायम वावरायला हवे, तोच भाव अस्तित्वात *कायम असावा*.

हरि ओम.



श्री 

कार्य करणे महत्वाचे आहे. जीवासाठी कार्याचा अर्थ काय असतो, हे ओळखणे त्याचे ध्येय मानून घ्यावे. इथे "ध्येय" शब्द "जाणीव" ह्या अर्थाने वापरला गेला आहे. ध्येय जाणिवेपेक्षा वेगळी असावी का? किंव्हा ध्येयाची दिशा किंव्हा मार्ग जाणीव शुद्ध होण्यासाठी वापराव नाही का?

जाणीव शुद्ध होणे हे ध्येय राबवताना  अनेक गोंधळ जीवाला साहजिकच त्रस्त करतील. हे होणार. त्यातून स्थिरतेचे उत्तर किंवा अर्थ अनुभवणे अभिप्रेत आहे. प्रपंच तसा तापदायक आपली वृत्ती करते. म्हणून संबंध असे निर्माण करावे, की तो तापदायक न होता, शांतीतच स्थिरावेल.

हरि ओम.

Wednesday, April 09, 2025

श्री

श्री 

घडामोडींचा, लोकांच्या बडबडींचा, अडचणींचा, अर्थाचा परिणाम कसा करून घ्यावा, हा विवेक बुद्धीचा प्रश्न आहे. योग्य निर्णय किंव्हा योग्य "वावर" दृश्याचा साम्राज्यात होण्यासाठी स्थिर आणि शांत होण्याला गरजेचे आहे. स्थिर भाव असतो, तो "मी" नाही. तसेच, कुठलाही भाव असू शकतो, रुपात येऊ शकतो, तो "मी" नाही. म्हणजे आकार किंव्हा रूप सत्य नाही, ज्यावर मी निर्णय देईन किंवा द्यायला हवा. ही अपेक्षा ठेवणे ही गैर आहे. तरीही त्याचे आकलन ज्याला त्याला व्हायला लागते. त्यात तुम्ही किंव्हा मी काही विशेष करू शकत नाही. होणे, वावरणे, जाणे हे एक निमित्त आहे अस्तित्वाची लीला बघण्यासाठी. 

हरि ओम.

श्री

 श्री 


साखळीच्या कुठल्या घटक्याला धरावे?! एकही वस्तू, पदार्थ, बिंदू, घटक स्थिर नाही, किंव्हा "निर्मितीच्या" गुणांनी रूप घेऊन अवतरले असते, तर त्याला का धरावे? 

सत्य माहित नाही, म्हणून हे धरणे, धारण पावणे, सतत प्रतिक्रिया देणे, अपेक्षा ठेवत राहणे, कृती करणे, पटकन हालचाली करणे, बेचैन होणे वगैरे गोष्टी होतात आणि त्याचे संस्कार मनात रुजू होतात. आपण चिंता, त्रास, तळमळ करून घेतो कारण दृश्यात वावरणाऱ्या क्रियाशी आपण एकजीव होतो. त्या क्रियांचे स्मरण ठेवतो, त्यातून अहं वृत्ती घट्ट करतो आणि कष्टी होतो. हे त्या शक्तीचे परिणाम. 

जो काही दृश्याचा अनुभव घेतो, गिळतो, आत्मसात करतो, त्यातून संस्कार होतात आणि त्यात आपण गुंतून राहतो. मग कुणीही काहीही म्हणा, आपण साखळीच्या वर्तनाला धरून ठेवतो. साखळी, सध्या, आपलं अस्तित्व घडवते. हा विचार करतांना, आतील अमूर्त क्रियाना आपण मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो आणि योग्य मार्ग निवडतो.  It is all a part of the process of _imagination_.  

नक्की साखळी आहे आणि त्यात अनेक चक्र किंव्हा घटकांचा संबंध होत दृश्य जगाचा अनुभव तैय्यार होतो - त्याला "द्वैत" ही उपमा दिली आहे. साखळी गूढ आहे आणि दैवी उद्भवलेली आहे, म्हणून सत्य हे आहे, की त्या होण्याला, त्या कार्याला हेतू नाही. मग आपण हेतूची व्याख्या तात्पुरतेपण ह्यावर का अवलंबून करावी?! बदल हा नैसर्गिक, किंव्हा अस्तित्वाचा गुण धर्म आहेच, तर त्याला शांतीने का नाही बघावे? 

मी, म्हणे एक अस्तित्वच बदलणारं, परावलंबित राहणार, तात्पुरतं रूप. त्यावर इतर गोष्टी समोर येतात आणि निघून जातात. त्याचा कसा अनुभव घ्यावा?! 

तसंच, वृत्ती किंव्हा वासना कुठली, काय, कधी, कशी प्रकट होईल ते सांगता येत नाही आणि ते पूर्णपणे भगवंताच्या स्वाधीन आहे. पुढची वासना माहीत नसते, म्हणून कार्य भगवंताचे असते, आपले नाही..

खूप बोलून किंव्हा गप्प बसून किंव्हा कृती करून योग्य परिणाम होतील असे नाही. तरीही कार्य करायला आणि भगवंत जाणून घ्यायला कुणी कुणाला थांबवत नाही. आपण आलोत, तर आपण भगवंत जाणून घेण्यासाठी. ते शक्य आहे.

हरि ओम.

श्री

 श्री 


आपण अस्तित्वात असतो, म्हणून एक भाव _धरलेला_ असतो. धरणे ही भगवंत इच्छा आहे, अस्तित्वाचा परिणाम आहे, होणे आहे, वावरणे आहे, जाणे आहे, अनुभव प्रकट होणे आहे, परिणाम आहे, चक्र आहे, प्रश्न आहेत, शोध आहे...

दृश्य निर्माण होणे (निर्मिती - ही क्रिया), असतेच. सत्य वेगळ्या पद्धतीने दिसणे, हे असणार. त्यातून स्थिरता काय आहे, हे ओळखणे, असणार. दृश्याला खरे मानून त्याचा परिणाम भोगणे, हे असणार. त्या परिणामांना चक्र म्हणून स्वीकारणे ही असणार. त्यात आणखीनच गहन प्रश्नांना सामोरे जाणे होणार. त्यातून गुदमरून बाहेर पडून घेणे होणार. त्यातून सर्व स्वच्छ दिसणे होणार. 

हरि ओम.

श्री

 श्री 


अस्तित्वाची सत्य स्थितीची जाणीव होणे हे नैसर्गिक ध्येय किंव्हा प्रगती मानली हवी. त्या मार्गात अर्थात जे रूप होऊ पाहतील, त्याला समाधानाने स्वीकारावे लागते. 

दृश्य ही स्थिती आहे, जी सत्यातून, शांती भावनेतून, स्थिरतेतून प्रकट झाली आहे. प्रकट शब्द खूप मोठा आहे आणि गूढ आहे. त्यात अनेक स्तर, साखळी, हालचाली, गतींचा समावेश होत असतो. त्यातील एक रूप म्हणजे आपण. अर्थात हा सर्व प्रकार आकाराचा गुंतागुंतीचा असणार, ह्यात शंका नाही आणि तो परिणामही करू पाहणार. 

सर्व _कार्य_ भगवंताच किंव्हा अस्तित्व शक्तीचे आहे. भगवंत आहे, म्हणून दृश्य जग आहे, आपण आहोत, बदल आहे, साखळी आहे, स्तर आहे, येणे आहे, जाणे आहे, क्रिया आहे, भाव आहे, जाणीव आहे. इथे "आहे" म्हणजे existence or apriori किंव्हा त्या असण्याला कुठलाही हेतू असत नाही, तो नुसता असतो. 

म्हणजे सर्व संकल्पनांच्या आणि हेतूच्या पलीकडे जी स्थिती वावरते, असते, तिला भगवंत म्हणतात. तशी जाणीव स्वतःची झाली की भगवंत स्वतः मध्ये प्रकट होतो. 

हरि ओम.

श्री

 श्री 


स्पष्टीकरण देणे म्हणजे आतील क्रियाना "मूर्त" स्वरूप देऊ पाहणे आणि ते होताना साखळी, प्राण, बुद्धीची शक्तीच्या पार्श्वभूमीवर दृश्यात आणणे. म्हणजे दृश्यात येऊ घालणं ही विशिष्ठ क्रिया म्हणता येईल, ज्यामुळे बऱ्याच स्थळांची साखळी जोडून अमूर्त स्वरूप "प्रकट" होऊ पाहत. म्हणजे अमूर्त स्थितीत सर्व बीज असतात, ज्याच्यामुळे मूर्त शक्तीचे परिणाम, हालचाली दिसून येतात. ते _दिसून_ आल्यामुळे त्याचा "परिणाम भोगला जातो". एक चक्र होऊ पाहत.

म्हणजे चक्र कायम राहणे ही अस्तित्वाची क्रिया म्हणायला हरकत नाही! ते "कायम" राहते, म्हणजे ती क्रिया (action) स्वतः सिद्ध आहे, म्हणून त्याला _कार्य_ ही उपमा दिलेली आहे. त्याचा दुसरा अर्थ असाही होतो की ही क्रिया "निर्हेतू" होत असावी, किंव्हा ती कुठल्याही हेतूवर, रुपावर, गुणावर, परिस्थितीवर अवलंबून *नाही*. म्हणजे ती क्रिया शांती भावातुन प्रकट होऊ पाहते/ शांती भाव _कारण_ बनते. 

हा सर्व प्रकार कसा समजून घ्यावा?! कसा?...

हरि ओम

Friday, April 04, 2025

श्री

 श्री 

 आपल्याला जे जाणून घ्यायचे आहे किंव्हा जाणीव प्रकट होऊ द्यायची आहेती आहे अस्तित्व _माध्यमाची_. त्या माध्यमाचे कार्य काय (pattern), ते कसे क्रिया करतेक्रियेत कोण कोणते घटक प्रकट होतातत्याने साखळी कशी निर्माण होतेत्याचा परिणाम कसा असतो आणि त्यावरून प्रत्येक स्थितीचा भाव आणि जाणीव काय होऊ पाहतेती दृश्याशी संबंधित कशी राहतेदृश्याचे रूप कसे घडवतेस्मरण कसे निर्माण करतेअहं वृत्ती कशी बनवतेत्यात आपण (आपली शक्ती) कुठल्या चक्रात वावरत राहते - हे सर्व जाणणे आहे.

 आपण चक्राला (pattern), ह्याला "धरून" असतो - त्याच्यावरून निर्माण होणारा भावाला "खरे" मानतोतिथे मन चिकटून राहते आणि ज्या संकल्पना ते निर्माण करते त्यात आपण वावरत राहतो. हे सर्व काही करणारा (मूळ तत्व) कोण आहेइथे आपल लक्ष जात नाही किंव्हा ते कळून घेण्याची तीव्र इच्छा आणि प्रयत्न आपल्या हातून घडत नाही. म्हणून जन्म आणि मरणाच्या अनंत चक्रात आपण वावरत राहतो. 

 थोडक्यात शोध जो आहेतो अस्तित्व माध्यम ओळखण्याचा आहेतशी जाणीव होण्याचा आहेपरिवर्तन करण्याचा आहेशांत होण्याचा आहे. 

 लोकांची बडबडविचारांची सतत वावरणारी साखळीमनाच्या हालचालीप्रकट होणाऱ्या वासना - कुठल्या ना कुठल्यातरी घटकेत आपला भाव गुंतलेला असतो. म्हणून त्यावरून आपण स्वतःची व्याख्याअर्थक्रियाकोडी सोडवण्याची धडपडविशेषतः प्रक्रिया _देतराहतो. गोष्टी त्याने थांबत नाही. कुठल्याही घटकेत _संकल्पनाआहे आणि संकल्पनातून होणारे क्रियाभावचक्रसंबंध ते सुचविते. म्हणून संकल्पना शेवटी शांत व्हायला हवी. 

 इथे संकल्पनाजाणीवभगवंत एकाच अर्थाने शब्द वापरले गेले आहेत. जेव्हा हे तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी मिळताततेव्हा भगवंतमीअस्तित्व एकच होतो.

 हरि ओम.


Thursday, April 03, 2025

श्री

 श्री 


श्री द्न्यानेश्वर म्हणतात की भगवंत असा भाव आहे की दही घुसळून लोणी काढण्या प्रमाणे आहे.

ह्या दृष्टांताचे बरेच अर्थ निघून येतात. 

एक म्हणजे लोणीला वेगळया प्रमाणे (वेगळा भाव) बघितले तर ते दही वाटते. किंव्हा दहितच लोणी असते (शांती भाव दृश्यात असतोच). काही प्रयासाने ते लोणी बाजूला करायला लागते (मनाचे संस्कार आणि अभ्यास).

 _दही_ म्हणजे अनेक वेगवेगळ्या वस्तू दिसत राहणे. त्यातील सत्य किंव्हा एकमेव परम तत्व म्हणजे _लोणी_ . ते परम तत्व जाणवायला लागते, तशी स्वतःची नजर व्हायला लागते. मला वाटतं की phenomenology, philosophy, culture हे शास्त्र एका प्रकारे तशी जाणीव निर्माण करते. म्हणून त्या शास्त्राचा अभ्यास महत्वाचा ठरू शकतो. 

दह्याला महत्व दिले तर ते दिसत राहील. म्हणजे तिथे विवेक बुद्धी वापरून त्यातच लोण्याचे संबंध किंव्हा अस्तित्व निर्माण करायला लागते. एकदा ते झाले, की दही दिसत नाही आणि जे दिसते ते म्हणजे फक्त लोणी. म्हणून भाव तो जीवाचा असेल किंव्हा भगवंताचा. भगवंत कळून घेण्यात जीवाच्या भावाचा त्याग आहे.

म्हणजे जी वस्तू (दही) भावते किंव्हा दिसते ती अदृश्यापासून (लोणी) ते दृश्य (दही) पर्यंतची साखळी दर्शवते. किंव्हा दही दिसण्यामध्ये लोण्याचा अस्तित्वाचा समावेश आहे. दही होण्याचे _कारणच_ लोणी आहे.

लोण्या पर्यंत जाण्यासाठी मार्ग असावा. जाणीव प्रखर करण्यासाठी काहीतरी खटपट आवश्यक आहे. त्याचं चिंतन करावं. 

दह्यात लोणी दिसून येणे म्हणजे अनेकपणात एकमेव तत्व जाणवणे.

 _मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया तू दुर्गामा न घाली मन_ 

आपल्या समजुतीला ज्या गोष्टी क्लिष्ट वाटत असतात, त्याच्या नादी लागू नये, कारण ते बाधक ठरू शकेल. भगवंत _सहज साध्य_ व्हायला हवा. In the most natural way.

हरि ओम.

श्री

श्री 

शुद्ध जाणिवेला हेतूचा रंग नसतो, हेतूच्या पलीकडे वावरत असते. म्हणून अहं, अट्टाहास, परिणाम, साखळी, भाव असे कुठल्याच घटकांशी त्याचे संबंध राहत नाही. म्हणजे कुठलाही घटकेशी जाणिवेच तादात्म्य राहत नाही. 

तादात्म्य राहील, तर हेतूच कुठलतरी रूप निर्माण होत राहत आणि त्यातून दृश्याशी संबंध जोडला जातो (मन तिथे चिकटून राहतं). 

जाणीव जीवाची जो पर्यंत असते, तो पर्यंत वरील परिणाम होत राहतात. ती जाणीव शुद्ध होत जाणे ह्याचे नाव भक्ती. 

हरि ओम.